खिलराज रेगमी, सुशील कोईराला, ओली, प्रचंड, देवा ओली, देउबा, दहल ही नेपाळमधील गेल्या अकरा वर्षातील पंतप्रधानांची यादी आहे. ‘नेपो किड्स’ बद्दल जनतेत प्रचंड संताप आहे. दुसरीकडे, नेपाळमध्ये साधा चहादेखील पिण्यासाठी ५०-५० रुपये मोजावे लागत आहेत. दूध, ब्रेड, तांदूळ, गहू या सर्व गोष्टी अत्यंत महाग आहेत आणि तरुणांना नोकरी नाही.