Akshay Shelar

इंडी जर्नल

‘डार्लिंग्स’: सिम्पथी फॉर लेडी वेन्जिअन्स

Quick Reads
‘डार्लिंग्स’ का समयोचित आहे, या प्रश्नाचे उत्तर हिंदी (तसेच भारतीय) चित्रपटांच्या इतिहासात व काही अंशी वर्तमानातही दडलेले आहे. चित्रपटीय इतिहासाचा विचार करता, आपण गेली कित्येक दशके घरगुती हिंसाचारामध्ये प्रेमाचे भग्नावशेष शोधत मोडकळीला आलेले नातेसंबंध जोडण्याच्या भारतीय संस्कृतीचे पालन केलेले आहे.
इंडी जर्नल

‘सेव्हरन्स’: कॉर्पोरेट जगातील ‘फ्री विल’चा उहापोह

Quick Reads
भांडवलशाही किंवा कॉर्पोरेट जगाचे समर्थन करीत असताना असे म्हटले जाते की, काहीही असले तरी या व्यवस्थेत प्रत्येकाकडे ‘निवडीचे स्वातंत्र्य’ असते. ‘सेव्हरन्स’ या मालिकेत ‘निवडीचे स्वातंत्र्य’ आणि ‘फ्री विल’ या संकल्पनांचा मुळापासूनच विचार केला जातो आणि त्यातून एक डिस्टोपियन जग समोर उभे केले जाते.
Indie Journal

‘पॉंडीचेरी’: एक रंगीबेरंगी शहर आणि काही माणसे

Quick Reads
लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकरचे चित्रपट हे कायमच व्यक्तिकेंद्री राहिले आहेत. केंद्रस्थानी असलेला मुद्दा हा बऱ्याचदा व्यक्तीची स्वओळख (सेल्फ-आयडेन्टिटी) आणि कौटुंबिक, सामाजिक स्तरावरील ओळख, अपेक्षा यांतील संघर्षाच्या स्वरूपात अस्तित्त्वात असतो. ‘पॉंडीचेरी’देखील त्याला अपवाद नाही.
Shubham Patil

मनुसंगडा: मरणोपरांत परात्मता

Quick Reads
‘मनुसंगडा’ चित्रपटाचा नायक कोलाप्पण आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चेन्नईतून गावात येतो. अंत्यविधीची सगळी तयारी होते, मात्र त्याच्या कुटुंबाने त्याच्या वडिलांची अंत्ययात्रा घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरून नेऊ नये, असे गावातील उच्चजातीय रहिवाश्यांकडून सांगण्यात येते. ‘मनुसंगडा’चे कथानक कोलाप्पणने आपल्या पित्याची अंत्ययात्रा त्याच रस्त्यावरून काढण्याचा हक्क मिळविण्याभोवती फिरते.
Indie Journal

‘मी वसंतराव’: चाकोरीबाहेरच्या कलोपासकाचा प्रभावी चरित्रपट

Quick Reads
‘मी वसंतराव’ मध्ये वसंतराव देशपांडे यांच्या जन्मापासून ते ‘कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध नाटकाच्या यशापर्यंतचा काळ दिसतो. (त्यानंतरचा भागही आहे, पण तो एपिलॉगच्या स्वरूपाचा आहे.) साधारण सहा दशकांचा दीर्घ काळ उभारत असताना केलेली पटकथेची रचना (पटकथा - निपुण धर्माधिकारी आणि उपेंद्र सिधये) अशी आहे की, वसंतरावांचे जीवन काही टप्प्यांमध्ये समोर मांडले जाते.
Shubham Patil

‘हृदयम’: परिचित संकल्पनांचे कल्पक व प्रभावी सादरीकरण

Quick Reads
विनीत श्रीनिवासन दिग्दर्शित ‘हृदयम’ या चित्रपटाची संकल्पना आणि पात्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा फारच साधासोपा आहे. एक पुरुष आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया, त्यांचे नातेसंबंध आणि त्यातील चढ-उतारांमुळे या पुरुषाच्या जीवनात, जगाकडे (तसेच स्वतःकडे) पाहण्याच्या दृष्टिकोनात घडणारे बदल – या इथल्या काही महत्त्वाच्या संकल्पना.
Indie Journal

झुंड: अस्वस्थ तरीही आशावादी

Quick Reads
‘झुंड’मध्ये जात, धर्म, आर्थिक-सामजिक परिस्थिती यांवरून होणाऱ्या भेदाभेदाला स्थान असले तरी या चित्रपटातून मंजुळे मांडू पाहत असलेला मुद्दा ‘फॅन्ड्री’ किंवा ‘सैराट’पेक्षा काही प्रमाणात वेगळा आहे.
इंडी जर्नल

‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’: भूतकाळाची भुतं आणि रहस्याचा मागोवा

Quick Reads
लोकांना ट्रू क्राईम पॉडकास्ट्सच्या असणाऱ्या आकर्षणामुळे अशा पॉडकास्ट्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. ‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ची मध्यवर्ती संकल्पना अमेरिकी लोकांना पछाडून टाकणाऱ्या ट्रू क्राईम पॉडकास्ट्सभोवती फिरणारी आहे.
Gehraiyaan movie review

‘गहराइयाँ’: प्रेम आणि अप्रामाणिकतेचे समकालीन चित्र

Quick Reads
प्रेम ही मुळातच क्लिष्ट संकल्पना आहे. आणि प्रेमामध्ये जेव्हा खोटेपणाचा समावेश होतो, तेव्हा या संकल्पनेच्या क्लिष्टतेत अधिकच भर पडते. असे असूनही प्रेमाची क्लिष्टता पुरेशा गंभीरपणे आणि सखोलीने समोर मांडली जात नाही. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गहराइयाँ’ मात्र याबाबत ठळक अपवाद मानावा असा आहे.
Indie Journal

‘झोंबिवली’:एक चांगला मराठी झॉम्बीपट

Quick Reads
‘झोंबिवली’ या चित्रपटाबाबत बोलण्यापूर्वी या चित्रपटाचा प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. हा चित्रपट नुसता भयपट नाही, तर ‘विनोदी भयपट’ या उपप्रकारात मोडणारा आहे. मराठीमध्ये मुळात भयपटांची संख्या कमी आहे, त्यामुळे साहजिकपणे हा उपप्रकार आपल्याकडे फारसा हाताळला गेलेला नाही.
Indie Journal

‘अनपॉज्ड: नया सफर’: ‘वॉर रूम’ आणि ‘वैकुंठ’

Quick Reads
अँथाॅलॉजीच्या गर्दीत खरोखर उत्तम लघुपट सापडणे काहीसे अवघडच असते. अशात ‘अनपॉज्ड: नया सफर’ या ॲमेझाॅन प्राइमवरील अँथाॅलॉजी सिरीजमधील अय्यप्पा केएम. दिग्दर्शित ‘वॉर रूम’ आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘वैकुंठ’ हे दोन अतिशय उत्तम लघुपट पाहण्यात आले. कोविड-१९ पँडेमिकच्या काळात घडणाऱ्या या दोन्ही लघुपटांची ही शिफारस…
इंडी जर्नल

‘टेड लॅसो’: दिलासादायक पलायनवाद

Quick Reads
गेल्या काही काळातील अनेक लोकप्रिय कलाकृतींमध्ये दोषैकवृत्ती आणि निराशावाद दिसून येतो. चित्रपट, मालिका आणि अगदी बातम्यांमधून सातत्याने दिसणारा गडद आशय आणि नकारात्मकता एका ठरावीक टप्प्यानंतर उबग आणणारी बनू शकते. मग, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याचं उत्तर म्हणून ‘टेड लॅसो’ सारख्या मालिका समोर येतात.
indie journal

‘द किड डिटेक्टिव्ह’: प्रसिद्धीच्या सावलीचं प्रभावी विडंबन

Quick Reads
‘चाइल्ड प्रॉडिजी’ ही संज्ञा अनेकांनी यापूर्वी ऐकली असेल. ही संकल्पना म्हणजे अल्पवयात असामान्य बुद्धीचातुर्य दाखवणारी आणि प्रौढांनाही मागे टाकणारी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती. सहसा अशी मुलं आपल्या आयुष्यातील पुढील टप्प्यातही उत्तम कामगिरी करतात. मात्र, लहान वयात विलक्षण प्रतिभा बाळगणारी सगळीच मुलं आयुष्यात यशस्वी होतीलच असे नसते.
Indie Journal

‘पिग’: जॉन विकचा अँटीथीसिस

Quick Reads
चित्रपट रसिकांनी ‘मॅन्डी’सारख्या (२०१८) सूडपटांमध्ये निकलस केजला त्याच्या हिंसक अवतारात पाहिलेलं आहे. त्यामुळे या पारंपरिक सूडपटांहून वेगळा मार्ग अवलंबणाऱ्या या चित्रपटात केजला त्याच्या काही उत्कृष्ट भूमिकांमध्ये मोडणारी कामगिरी करताना पाहणे नक्कीच सुखद आहे.
इंडी जर्नल

‘जून’: बिटरस्वीट समकालीनत्व

Quick Reads
आपल्याकडे खूप साऱ्या घडामोडी, प्रसंग घडणाऱ्या चित्रपटांचे प्रस्थ आहे. ज्यात अनेकदा एकामागून एक प्रसंग घडत राहतात आणि शेवटी काहीच हाती लागत नाही. मात्र, काही सिनेमे या रूढ प्रकाराला छेद देणारे असतात. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी सह-दिग्दर्शित केलेला (तसेच दोघांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला) ‘जून’ अशाच चित्रपटांमध्ये मोडतो.
Indie Journal

बो बर्न्हम: ‘इनसाइड’: मिलेनियल्सच्या मनातील कोलाहलाचे दस्तऐवजीकरण करणारे बिटरस्वीट सेल्फ-पोर्ट्रेट

Quick Reads
इनसाइड’च्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे, चित्रीकरण आणि निर्मितीतील मर्यादांमुळे त्याच्या दृश्यचमत्कृतीपूर्ण ठरण्यासोबतच नानाविध भावनांचे चित्रीकरण करणे शक्य होते. या भावना आणि मनोवस्थांपैकी पुढील अवस्था ठळकपणे आणि वारंवार दिसतात.
इंडी जर्नल

‘दिठी’: अमर्याद पाऊस आणि (अ)शाश्वत शोक

Quick Reads
अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेमुळे सगळं चित्र धूसर आणि काहीसं अस्पष्ट होण्याची शक्यता असते. ‘दिठी’ या सुमित्रा भावे दिग्दर्शित चित्रपटामधील मध्यवर्ती पात्राच्या आयुष्यात अशीच घटना घडलेली असते.
इंडी जर्नल

द डिसायपल’: नैतिकतेच्या 'गुरु'त्वाची कक्षा

Quick Reads
विरोधाभास हा चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’मधील स्थायीभाव आहे. हा विरोधाभास अनेक प्रकारचा, अनेक कंगोरे असलेला आहे. इच्छा-आकांक्षा आणि त्या पूर्ण न झालेले आयुष्य, स्वप्न आणि वास्तव यांच्यातील तफावत, आदर्श जीवन आणि रुक्ष वास्तव यांच्यातील संघर्ष, भूतकाळ आणि वर्तमानाची केलेली विरोधाभास असणारी मांडणी – अशा बऱ्याचशा गोष्टी इथे अस्तित्त्वात आहेत. या सगळ्या विरोधाभासाच्या केंद्रस्थानी आहे कला आणि कलोपासना.
Netflix

एके वर्सेस एके: मिस्टर इंडिया: ऑर द अनएक्स्पेक्टेड वर्च्यू ऑफ इग्नरन्स

Quick Reads
विक्रमादित्य मोटवानेचा ‘एके वर्सेस एके’ हा चित्रपट ‘सिनेमाविषयीचा सिनेमा’ या विधेचा विचार नव्या आणि रंजक दृष्टिकोनातून करतो. मोटवाने हा निःसंशयपणे भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या काही प्रयोगशील दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला या प्रकारच्या चित्रपटाच्या संकल्पनेने आकर्षित करणं काहीसं साहजिक आहे.
Netflix

‘लुडो’: बसूचा अ-वास्तववाद आणि सिनेमाची जादू

Quick Reads
‘लुडो’ हा ‘हायपरलिंक सिनेमा’ या चित्रपट प्रकारात मोडतो. या प्रकारात वेगवेगळ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारी वेगवेगळी कथानकं समांतरपणे उलगडत जातात आणि चित्रपट जसजसा पुढे सरकतो तशी एकत्र येतात. क्वेंटिन टॅरेंटिनो, अलेहान्द्रो गोन्झालेझ इनारितु, पॉल थॉमस अँडरसन, इत्यादी दिग्दर्शकांचे चित्रपट या प्रकारच्या चित्रपटांची गाजलेली उदाहरणं आहेत.
ToI

२०२० आणि बदललेला सिनेमा

Quick Reads
कोविड पॅन्डेमिक दरम्यान सिनेमा हे माध्यम आणि त्याच्याच जवळच्या मालिका, ऑडिओ-व्हिज्युअल पॉडकास्ट्स यासारख्या कंटेंटचे प्रकार जगभरातील बहुतांशी लोकांच्या कामी आले. सर्व स्पोर्ट्स मॅचेस पुढे ढकलल्या गेल्या किंवा मग रद्द तरी झाल्या. याखेरीज चित्रपटगृहं देखील बंद होती. अशात मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून राहणं आलं.
Gemini Studios

‘उंडा’: वेगळा मार्ग पत्करणारी 'कॉप फिल्म'

Quick Reads
अलीकडील काळात आपल्याकडे ‘कॉप फिल्म’ अर्थात पोलिसांवरील चित्रपट या चित्रपटप्रकारात बरंच काम घडत आहे. निर्माण होत असलेले चित्रपट चांगले की वाईट हा भाग अलाहिदा. पण, चित्रपट बनत आहेत, इतकं मात्र खरं. या चित्रपटांनी आत्यंतिक मर्दानी नि निर्भीड पोलिस अधिकारी आपल्यासमोर उभे करण्याचं काम केलेलं आहे. ‘उंडा’मध्येही मामुट्टी पोलिसाच्या भूमिकेत असला तरी प्रत्यक्ष चित्रपट हा वर उल्लेखलेल्या प्रकारच्या चित्रपटांहून वेगळा मार्ग निवडतो.
Indie Journal

फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ आणि ‘पीपली लाइव्ह’: प्रसारमाध्यमांसंबंधित भाकितं आणि भाष्यं

Quick Reads
वर्तमानातील प्रसारमाध्यमांनी नीतीशास्त्राला दिलेला फाटा आणि त्यामुळे झालेला नैतिक मूल्यांचा ऱ्हास याबाबत बरीच चर्चा घडून आलेली आहे. वादविवादाच्या नावाखाली आरडाओरड आणि गोंधळ घातला जाणं, मीडिया ट्रायल, २४ तास चालणाऱ्या चॅनल्ससाठी सातत्याने बातम्यांचा शोध घेत राहणं, इत्यादी बऱ्याच मुद्द्यांच्या निमित्ताने हे चर्वितचर्वण घडू आलं आहे.
USA network

कोविड-१९ पॅन्डेमिक आणि ‘मंक’

Quick Reads
विचार करा की, कोविड-१९ नंतर आता बहुतांशी लोक ज्या चिंता आणि भीती उराशी बाळगून जगत आहेत, तसं जगणं म्हणजे एखाद्या व्यक्तीकरिता नेहमीचं आयुष्य आहे. ‘मंक’मधील एड्रियन मंक (टोनी शाल्हुब) या मुख्य पात्राचं जगणं म्हणजे याच विचाराचं प्रत्यक्ष रूप.
20th Century Fox

रुबी स्पार्क्स: प्रेम आणि लेखनकामात असलेलं साम्य

Quick Reads
एखाद्या व्यक्तीने अगदी कमी वयात अनपेक्षित आणि अविश्वसनीय काम करत यश संपादन करणं कौतुकास्पद असतंच. मात्र, कमी काळात नि कमी वयात अतियशस्वी झाल्यानंतर ती व्यक्ती ‘त्या’ यशाच्या पुढे जाईलसं काहीच काम करू शकली नाही तर? आपणच पूर्वी करून ठेवलेलं काम आपली मर्यादा ठरलं तर?
Hulu

पाम स्प्रिंग्ज: एक दिवस आणि दोन समदुःखी जीव

Quick Reads
मानवी जीवनातील निरर्थकता, या निरर्थकतेच्या जाणिवेतून आलेला निराशावाद आणि प्रेम या संकल्पनांचा एकत्रितपणे विचार करणाऱ्या बऱ्याचशा कलाकृती यापूर्वी निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या चित्रपटांतून - मानवी जीवन हे किंचितही सुखकर नाही. मात्र, आपल्याइतक्याच दुःखी आणि असमाधानकारक असलेल्या व्यक्तीसमवेत हे जीवन किमान सुसह्य बनू शकतं - हा विचार मांडला गेल्याचंही दिसलेलं आहे.
Fox

एमीझचे वारे: ब्रूकलीन ९९

Quick Reads
‘एनबीसी’च्या लोकप्रिय पोलिसी प्रक्रियात्मक नाट्य असणाऱ्या ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’ला यावेळीही एमी पुरस्कारातील ‘कॉमेडी सिरीज’ श्रेणीमधून डावललं गेलं आहे. असं असलं तरी, अभिनेता आन्द्रे ब्रॉअरने चौथ्यांदा ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ या श्रेणीत नामांकन मिळवलं आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान एमी पुरस्कारातील या श्रेणीत सलग तीनदा नामांकन मिळवणारा अभिनेता ठरूनही तीनही वेळा त्याचा पुरस्कार हुकला आहे.
Netflix

एमीजचे वारे: ‘स्ट्रेंजर थिंग्ज’

Quick Reads
आपल्याकडील बरीचशी जनता ही वयाच्या पंचविशीत ते पस्तिशीत आहे. या पिढीने मोठं होत असताना नव्वदीचं दशक जवळून पाहिलं. ज्यामुळे भारतीय संदर्भांत नव्वदीच्या दशकातील स्मरणरंजन घडताना दिसतं. तर, अमेरिकन संदर्भांत तिथला मोठा जनसमुदाय हा वयाच्या पस्तिशी ते पंचेचाळीशीत असल्याने तिथे ऐंशीच्या दशकाचं स्मरणरंजन घडत असल्याचं पहायला मिळतं.
ऍमेझॉन प्राईम व्हिडियो

स्पॉटलाईट: अंधारात सत्य चाचपडणाऱ्या पत्रकारितेला साद घालणारा सिनेमा

Quick Reads
या आठवड्यात ‘स्पॉटलाईट’ सदराला एक वर्षं पूर्ण झालं. या सदरात लेख लिहिण्यामागे जो उद्देश होता त्या उद्देशाला, म्हणजे उत्तम देशी-विदेशी चित्रपटांवर प्रकाश टाकत त्यावर चर्चा घडवून आणण्याला साजेशा नावाचा शोध ‘स्पॉटलाईट’ या नावापाशी येऊन थांबला. ज्यामागे साहजिकच टॉम मॅकार्थीने दिग्दर्शित केलेल्या याच नावाच्या चित्रपटाचा संदर्भ होता. वर्षपूर्तीचं औचित्य साधून या चित्रपटावर लिहित आहे.
Arun Karthick

नसीर: हे एक समयोचित व्यक्तीचित्रण

Quick Reads
कल्पित कलाकृतींमध्ये असलेला जीवनाचा, वास्तवाचा अंश हा अधिक नाट्यमय असण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष जीवन मात्र तितकं नाट्यमय असतेच असं नाही. एखाद्याच्या जवळपास क्रियाशून्य आयुष्याकडे अतिशयोक्ती टाळून पाहिल्यास ते कसं दिसेल हे चित्रपटांमधून अनेकदा दिसत आलेलं आहे. अरुण कार्तिक दिग्दर्शित ‘नसीर’मध्येही शीर्षक पात्राचं असंच काहीसं जीवन दिसतं.
Sony LIV

‘कडक’: परिणामकारक ब्लॅक-कॉमेडी

Quick Reads
नैतिकता आणि तिचं स्वरूप हा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. जर समाजाचं किंवा कायद्याचं भय मनात नसतं, तर नैतिकतेचं स्वरूप कशा प्रकारचं राहिलं असतं, हा वेळोवेळी चर्चिला गेलेला मुद्दा आहे. रजत कपूर दिग्दर्शित ‘कडक’मध्ये समोर उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने नैतिकतेचे निरनिराळे कंगोरे दाखवले जातात.
Sony Liv

भोंसले: विरोधाभासांचा समांतर प्रवास

Quick Reads
‘भोंसले’मध्ये अगदी सुरुवातीपासूनच विरोधाभासी संकल्पना समांतरपणे समोर येत राहतात. विरोधाभास हा इथला स्थायीभाव आहे. तो जितका दृश्य पातळीवरील आहे, तितकाच संकल्पनांच्या पातळीवरील आहे. हा विरोधाभास जे दिसतं त्यातील परस्परसंबंध दाखवणारा आणि त्यातून एकसंध चित्र निर्माण करणारा आहे.
Indie Journal

‘गेट आऊट’ आणि ‘अस’: दृश्य असूनही अदृश्य राहिलेल्या वंशाधारित शोषणाला उजागर करणारे सिनेमे

Quick Reads
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जॉर्डन पील लिखित-दिग्दर्शित ‘गेट आऊट’ या चित्रपटामध्ये बऱ्याचशा रूपकांचा वापर करीत समकालीन अमेरिकेतील वर्णद्वेषावर भाष्य केलं गेलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये आलेल्या पीलच्याच ‘अस’मध्ये वर्णद्वेषासोबत वर्गाचं समीकरणही विचारात घेतलं गेलं होतं. सध्या सुरु असलेल्या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या जगव्यापी चळवळीच्या निमित्ताने अमेरिका, वर्णभेद आणि शोषण हे मुद्दे सर्व माध्यमांच्या केंद्रस्थानी आलेले आहेत.
The Federal

प्राइड मंथच्या निमित्ताने: सिनेमा आणि समलैंगिकता

Quick Reads
समाजाचा आरसा मानल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून या प्रकाराविरुद्ध भाष्य करणे, या विषयाला वाचा फोडणे, या विषयाचं अस्तित्व घराघरात पोहोचवणे अपेक्षित होते. कायदेशीर - सामाजिक बंधनांमुळे आणि चित्रपट निर्मात्यांनी निवडलेल्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे काही मोजके अपवाद वगळता असं होऊ शकलं नाही.
Na Ma Productions

ईब आले ऊ: व्यवस्थेच्या भयावह अमानुषतेच्या बळी ठरलेल्या नागरिकांची कथा

Quick Reads
‘ईब आले ऊ’ हा आपल्या व्यवस्थेकडे एका चित्तवेधक दृष्टिकोनातून पाहतो. हे करत असताना दिल्लीमध्ये उभ्या राहिलेल्या एका वेगळ्याच व्यवसायाकडे आणि व्यवस्थेकडे पाहिलं जातं. हा व्यवसाय आणि ही व्यवस्था दिल्लीमध्ये माकडांनी मांडलेल्या उच्छादाभोवती फिरणारी आहे.
Indie Journal

‘वुई आर वन’ या ऑनलाईन चित्रपट महोत्सवातील महत्त्वाच्या सिनेमांची ओळख: ‘क्रेझी वर्ल्ड’

Quick Reads
जगभरातील नामांकित चित्रपट महोत्सवांनी एकत्र येत ‘वुई आर वन’ या नावाने एक ऑनलाईन चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात काही निवडक नवे आणि जुने चित्रपट युट्युबवरील ‘वुई आर वन’ याच नावाच्या चॅनलवर मर्यादित कालावधीकरिता मोफत स्ट्रीम होत आहेत. येत्या काळात या महोत्सवातील महत्त्वाच्या अशा काही चित्रपटांविषयीच्या, मुख्यत्वे त्यांची ओळख करून देणाऱ्या लिखाणाची सुरुवात ‘क्रेझी वर्ल्ड’ या चित्रपटापासून करतोय.
Amazon

पाताल लोक: समकालीन समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि माध्यमव्यवस्था यांचं प्रभावी चित्रण करणारी सिरीज

Quick Reads
मालिकाकर्त्यांची उदारमतवादी धोरणं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मालिकेत प्रतिबिंबित झालेली आहेत. मुळातच मालिकाकर्ते हे त्यांच्या विचारांबाबत जागरूक आहेत. त्यामुळेच मालिकेत ‘वुई लिबरल्स आर सच अ क्लिशे. ऑल वुई नीड फॉर अ ह्युमन स्टोरी इज अ मुस्लिम क्रिमिनल ऑर अ एलजीबीटी कॅरेक्टर’ असे मेटा डायलॉग्ज येतात.
Netflix

आफ्टर लाईफ: नैराश्यपूर्ण, तरीही विनोदी

Quick Reads
अमेरिकन कलाकृती व्यक्तीपेक्षा घटनेला महत्त्व देतात, तर ब्रिटिश कलाकृती आपल्या पात्रांना अधिक महत्त्व बहाल करणाऱ्या असतात. त्यामुळे ब्रिटिश मालिकांमधील विनोदाच्या गडद छटा पात्रांच्या उपजत स्वभावातून निर्माण होणाऱ्या असतात. ही पात्रं अनेकदा आयुष्याकडे नीरस दृष्टिकोनातून पाहणारी, निराशावादी आणि तीक्ष्ण अशी विनोदबुद्धी असलेली असतात. ‘आफ्टर लाईफ’ आणि ‘फ्लीबॅग’ या दोन्हींमध्ये ब्रिटिश कलाकृतींची ही वैशिष्ट्यं दिसून येतात.
Tri Star

इट्स अ ब्युटीफुल डे इन द नेबरहूड: नैराश्यपूर्ण काळात मनात सौंदर्य निर्माण करणारा सिनेमा

Quick Reads
या सगळ्याचा परिणाम असा होतो की, सध्याच्या काळामध्ये निराशावाद, उपाहासवृत्तीचा उद्रेक झालेला असताना एक प्रचंड आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगून असणारी कलाकृती समोर येते. जी तिच्या नावाला जागते. इतकं की, कधीही निरुत्साही वाटत असल्यास हा सुखदायक चित्रपट पाहून जरा बरं वाटून घेण्याइतपत विश्वास या चित्रपटावर ठेवता येऊ शको.
Studio 24 & Roy Andersson Production

‘लिव्हिंग’ ट्रिलजी: माणूस असण्याचा अर्थ शोधणारा रॉय अँडरसनचा सिनेमा

Quick Reads
या चित्रत्रयीतील चित्रपटांची रचना अशी की, त्यांमध्ये पात्रांच्या विशिष्ट संचाला समोर ठेवत पारंपारिक तऱ्हेची कथा सांगितली जात नाही. या तिन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या सेल्फ-कन्टेन्ड स्केचेसचा समावेश होतो. अगदी या चित्रत्रयीचा भाग नसलेल्या त्याच्या ‘अबाऊट एंडलेसनेस’ (२०१९) या चित्रपटाची रचनाही अशाच तऱ्हेची आहे. या चित्रपटांमध्ये क्वचित काहीएक पात्रं वारंवार समोर येतात, पण तितकंच.
MUBI

पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर: उत्कटतेची सिनेमॅटिक अभिव्यक्ती

Quick Reads
पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ या फ्रेंच चित्रपटामधील दोन महत्त्वाच्या दृश्यांत विवाल्डीच्या याच अरेंजमेंटमधील ‘समर’ भागातील एका तुकड्याचा वापर केला जातो. ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’मध्येही नेमकी विवाल्डीच्या संगीताचीच गुणवैशिष्ट्यं आहेत. ‘फोर सीझन्स’ जर उत्कटता आणि मूर्तिमंत सौंदर्याचा सांगीतिक नमुना असेल, तर ‘पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ म्हणजे अशाच उत्कटतेचं सिनेमॅटिक समतुल्य मानता येईल.
नेटफ्लिक्स

द प्लॅटफॉर्म: आजच्या व्यवस्थेत मानवतेवर कटाक्ष टाकणारा चित्रपट

Quick Reads
‘द प्लॅटफॉर्म’ ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाल्याझाल्याच त्यातील कालसुसंगत राजकारण हा चर्चेचा विषय बनण्यामागे चित्रपटातील हेच घटक कारणीभूत आहेत. इथली पात्रं, ती ज्या व्यवस्थेचा भाग आहेत ती व्यवस्था, या पात्रांची आणि व्यवस्थापनाची कृत्यं आणि त्यांच्या नैतिकतेवर उभी राहणारी प्रश्नचिन्हं अशी अनेक अंगं इथे आहेत.
Amazon

‘एजंट साई श्रीनिवास अत्रेय’ : विनोदी हेरपट

Quick Reads
कुठलाही चित्रपटप्रकार हाताशी घेऊन त्याला विनोदाची जोड देणं म्हणजे तसा ओळखीचा प्रकार आहे. असं करत असताना त्या प्रकारात पूर्वी होऊन गेलेलं काम आणि त्यातून तयार झालेले संकेत, शैली आणि तांत्रिक बाबींचे संदर्भ विचारात घ्यावे लागतात. हेरगिरी आणि गुन्ह्याचा तपास हा ‘एजंट साई श्रीनिवास अत्रेय’मधील विषय आहे.
bojack horseman

नायक जगलेल्या अभिनेत्यांच्या अस्तित्ववादाचा उहापोह

Quick Reads
आत्मपूजा आणि आत्मद्वेष या संकल्पना द्विध्रुवीय वाटत असल्या तरीही अनेकदा त्या एकाचवेळी अस्तित्त्वात असू शकतात. आत्मप्रौढी आणि अतिआत्मविश्वासामुळे निर्माण झालेल्या महत्त्वाकांक्षांची पूर्ती न झाल्याने त्यातून स्वानुकंपा (self-pity) किंवा मग आत्मद्वेषाची निर्मिती होऊ शकते.आणि बऱ्याचदा स्वानुकंपेचा मार्ग एक्झिन्स्टेशियल किंवा मग मिड-लाइफ क्रायसिसच्या माध्यमातून जातो.
मेगामाईंड

मेगामाइंड’ : अस्तित्त्ववादाने ग्रासलेला खलनायक

Quick Reads
सत्प्रवृत्तीचा विजय आणि दुष्प्रवृतीचा पराजय या चित्रपटातील ठरलेल्या संकल्पना आहेत. अनेकदा ड्रीमवर्क्स अॅनिमेशन स्टुडिओने निर्माण केलेल्या अॅनिमेटेड चित्रपटांत काही इंटरेस्टिंग संकल्पना असतात. ‘मेगामाइंड’ आणि ‘कुंग फु पांडा’ चित्रपट मालिकेतील चित्रपटांत या ठराविक संघर्षाच्या पलीकडे जात सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती या संकल्पनांचा ऊहापोह केला जातो.
shortlist

नव्या पिढीसाठी एकांत ही विशेष नवी गोष्ट नाही, परिचित आनंद आहे

Quick Reads
‘वुई आर अ जनरेशन ऑफ ब्रोकन हार्ट्स अँड ब्रोकन पीपल’. झाकिर खान या कमेडियनच्या ‘हक से सिंगल’ या स्टॅण्ड अप कॉमेडी स्पेशलमधील हे एक वाक्य. अलीकडील काळातील माध्यमांतील पॉप्युलर कंटेंटकडे पाहिल्यास आपण हल्ली एकटेपणाला अंतर्भूत करत तो साजरा करायला शिकलो आहोत. याचं कारण मिलेनियल्स म्हणवल्या जाणाऱ्या, १९८० चं दशक आणि १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धादरम्यान जन्मलेल्या पिढीच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडलेलं आहे.
axone

आखुनी (Axone): सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणात आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा चित्रपट

Quick Reads
‘विविधतेत एकता’ असं म्हणत प्रत्यक्षात मात्र संकुचित दृष्टिकोन बाळगून असणं, भेदभाव करणं, देशाच्या नैऋत्य भागातील नागरिकांना निंदानालस्ती करीत हिणवणं, दक्षिणेकडील विविध राज्यांतील सर्व नागरिकांची भाषा, राज्य एकच आहे असा समज बाळगून असणं हे एक खास भारतीय वैशिष्ट्य आहे. ‘आखुनी’ मधील प्रमुख पात्रांचा संच हा मूळच्या भारताच्या नैऋत्येकडील रहिवाश्यांच्या दिल्लीतील वास्तव्याचं प्रतिनिधित्व करणारा आहे. त्यामुळे साहजिकच त्याला विशिष्ट असा प्रादेशिक आणि सामाजिक संदर्भ आहे.
kamyaab

कामयाब: जे चित्रपट पाहत मोठे झालो त्यात पाहिलेल्या चेहऱ्यांची वैश्विक कथा

Quick Reads
‘कामयाब’बाबत बोलताना ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ आठवण्याचं कारण म्हणजे या दोन्ही चित्रपटांच्या मध्यवर्ती पात्रांमध्ये एकेकाळी यशस्वी असलेल्या दोन अभिनेत्यांचा समावेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही चित्रपटांचा आशय आणि आवाका वेगळा असला तरी या विशिष्ट दृश्यांची तीव्रता मात्र सारखीच आहे.
Metanormal Motion Pictures

‘आमिस’ : अभौतिक प्रेमातली विलक्षण उत्कटता

Quick Reads
‘तोंडीमुथलम द्रिक्साक्षीयम’ (२०१७) या मल्याळम चित्रपटात एक संवाद आहे. तो म्हणजे ‘इझन्ट हंगर द रीजन फॉर एव्हरीथिंग?’ हे वाक्य एका अर्थी इथे घडणाऱ्या घटनांनाही लागू पडतं. इथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, काहीशी रूपकात्मक अशा दोन्ही तऱ्हेची क्षुधा सुमन आणि निर्मालीच्या कृत्यांना कारणीभूत ठरते.
Netflix

द बिग सिक: प्रेम आणि प्रेमासमोरची आव्हानं

Quick Reads
‘द बिग सिक’ हा कुमैल नान्जियानी आणि एमिली गॉर्डन या दोघांच्या खऱ्याखुऱ्या प्रेमाच्या गोष्टीवर आधारलेला आहे. स्टॅन्ड अप कॉमेडीच्या विश्वात त्याचा स्ट्रगल सुरु असताना त्याची एमिलीशी भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असताना कुमैलच्या पाकिस्तानी पार्श्वभूमीमुळे एमिलीच्या नकळत समांतररीत्या काही गोष्टी घडत होत्या.
uncut gems

अनकट जेम्स: नावाजलेल्या रांगेत बसणारा थरारपट

Quick Reads
साफ्दी ब्रदर्सच्या ‘अनकट जेम्स’कडे केवळ आणखी एक क्राइम थ्रिलर म्हणून पाहणं त्यावर अन्यायकारक ठरणारं आहे. इथे क्राइम थ्रिलरमध्ये असणं अपेक्षित असलेले सगळे घटक आहेत. भावनिक आणि नैतिकदृष्ट्या अधःपतन झालेली पात्रं आहेत, गुन्हेगारी आणि हिंसा आहे. हिंसेच्या अस्तित्त्वात गडद छटा धारण करणारा विनोद आहे.
jojo rabbit

जोजो रॅबिट: कट्टरतावादाचा निरागस उपहास

Quick Reads
जोजोचा एक मित्र आहे किंबहुना खरंतर काल्पनिक मित्र आहे, तो म्हणजे अडॉल्फ हिटलर (टाइका वैटिटी). हा हिटलर जोजोला त्याची गरज असते तेव्हा प्रकट होणारा, साहजिकच हिटलरचं एक विनोदी आणि एका अर्थी बालिश रूप असणारा आहे.
Neal Street Productions

१९१७: अंगावर येणारा युद्धपट

Quick Reads
युद्धपट दोन प्रकारचे असतात. पहिले म्हणजे युद्धाला आणि युद्धातील शौर्याची स्तुती करणारे, आणि दुसरे म्हणजे युद्धातील क्रौर्य दाखवणारे युद्धविरोधी चित्रपट. अनेकदा आपल्याकडील युद्धपट हे पहिल्या प्रकारातील असतात, तर युद्धात पोळलेल्या पाश्चिमात्य देशांतले युद्धपट दुसऱ्या.
Only Lovers left behind

ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह: कल्पकतेतून बहरणारा आधुनिक व्हॅम्पायरपट 

Quick Reads
‘ओन्ली लव्हर्स लेफ्ट अलाइव्ह’ हा पदोपदी मोहक वाटत राहतो. ही मोहकता जितकी तो ज्या पद्धतीने समोर मांडला जातो त्यात, आणि त्यातील संकल्पनांमध्ये दडलेली आहे, तितकीच जारमुश इथलं विश्व ज्या नजाकतीनं रचतो यात दडलेली आहे.
Netflix

‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ : व्यवस्था आणि पात्रांमधील परस्परसंबंध

Quick Reads
‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’ आणि ‘माइंडहंटर’ या नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या दोन्ही मालिकांमधील मानसिक पातळीवर विलक्षण साम्य आहे. दोघेही समाज आणि व्यवस्थेच्या नियमांनुसार वागत नाहीत. ‘मॅनहंट : यूनाबॉम्बर’मध्ये तर याचा आढावा अधिक विस्तृतपणे घेतला जातो. व्यवस्था आणि पात्रांमधील परस्परसंबंधांचे परिणामकारक रेखाटन करणाऱ्या या मालिकेवरील लेखाचा हा पहिला भाग.
Marriage Story

मॅरेज स्टोरी: एका नात्याच्या अंताची नाजूक गोष्ट

Quick Reads
कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, नात्यांतील तणाव, एकल जगणं या नोआ बॉमबाखच्या चित्रपटांमधील काही नेहमीच्या संकल्पना आहेत. अनेकदा तो त्याच्या चित्रपटांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनात चाललेला भावनिक, मानसिक कोलाहल, वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव अशा अमूर्त भावना आणि संकल्पना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नातेसंबंध मग ते प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नीमधील असोत की भावंडं, पालकांशी असलेले, या नात्यांची गुंतागुंत तो मांडू पाहतो.
Irishman

द आयरिशमन: मैत्री, विश्वासघात, हतबलता

Quick Reads
‘द आयरिशमन’ हा रूढ अर्थांनी गँगस्टर फिल्म या प्रकारात मोडणारा चित्रपट नाही. त्याच्या केंद्रस्थानी गुन्हेगारी विश्व जरूर आहे, पण मार्टिन स्कॉर्सेसीचे इतर सिनेमे, मुख्यत्वे ‘मीन स्ट्रीट्स’ (१९७३), ‘गुडफेलाज’ (१९९०) किंवा ‘कसिनो’ (१९९५) यांत गुन्हेगारी विश्व ज्या पद्धतीने दिसते तशा चित्रणाचा इथे अभाव आहे.
Downfall

डाऊनफॉल: एका साम्राज्याचा अस्त आणि पडझड

Quick Reads
‘डाऊनफॉल’ हिटलरला त्याच्या सर्वाधिक कमकुवत आणि असुरक्षित अशा रुपात समोर आणतो. हिटलरच्या आत्महत्येपूर्वीच्या, त्याच्या बंकरमधील शेवटच्या दीड आठवड्यात असलेली त्याची आणि थर्ड राइखमधील अधिकाऱ्यांची मनःस्थिती इथे दिसते.
Netflix

'लूक हूज बॅक': हिटलरचा व्यंगात्मक पुनर्जन्म

Quick Reads
सदर चित्रपट टिमुर वर्म्सच्या ‘लूक हूज बॅक’ याच नावाच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारलेला आहे. चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना अशी की काही अस्पष्ट, अतर्क्य कारणांमुळे अडॉल्फ हिटलर (ऑस्कर माझुकी) २०१४ येऊन पोचला आहे. दुसऱ्या महायुद्धात त्याचं बंकर ज्या ठिकाणी होतं, बर्लिनमधील त्याच ठिकाणी उठलेला हिटलर त्याचा बदललेला सभोवताल पाहतो. आणि मग सद्यपरिस्थितीत त्याचे आक्रमक आणि समस्यात्मक विचार घेऊन जगणाऱ्या हिटलरचा मागोवा चित्रपटात घेतला जातो.
Midnight in Paris

मिडनाईट इन पॅरिस: पॅरिस आणि प्रणयरम्यता

Quick Reads
पॅरिस आणि प्रणयरम्यता (मग ती शहरापासून ते व्यक्ती, कालखंड अशी कशाबाबतही असू शकते) या दोन गोष्टी इथल्या सर्व घटनांचं, भौतिक आदिभौतिक संकल्पनांचं केंद्रस्थान आहेत. इथल्या पहिल्याच माँटाजमध्ये पॅरिस या शहराचा, त्याच्या गतीचा, त्याच्या अस्तित्वाचा सगळा अर्क एकवटला जातो.
justice cinemas

व्हॉट मेक्स अस इंडियन्स?

Quick Reads
परवा ६ डिसेंबर रोजी बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरच्या घटनेमुळे न्याय, न्यायव्यवस्था आणि संविधान या संकल्पना आणि काही मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या तिन्ही बाबींशी निगडीत अशी दोन निरनिराळ्या चित्रपटांतील दृश्यं अशावेळी आठवतात. ज्यातून न्याय, न्यायव्यवस्था आणि संविधान या संकल्पना कायद्याच्या राज्याचा विचार करता का महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येतं.
Asuran

असुरन: हंट, चेझ, रिव्हेंज

Quick Reads
‘असुरन’चं मध्यवर्ती कथानक तसं साधंसोपं आहे. गावातील एका बड्या प्रस्थाची, वडकुरन नरसिम्हनची (आडुकलम नरेन) हत्या झालेली आहे. या हत्येमागे शिवासामीचं (धनुष) कुटुंब असल्याचं लागलीच स्पष्ट केलं जातं.
Ford V Ferrari

फोर्ड व्हर्सेस फरारी: पीपल, हाय ऑन कार्स. कार्स, हाय ऑन गॅस

Quick Reads
‘फोर्ड व्हर्सेस फरारी’ हा चित्रपट म्हणजे बरंच काही आहे. नाव सुचवतं त्याप्रमाणे फोर्ड आणि फरारी या दोन कंपन्यांमध्ये कार रेसिंगवरून एकेकाळी सुरु झालेल्या आर्थिक, व्यावसायिक गणितं नि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं कथानक इथे केंद्रस्थानी आहे. मात्र त्यासोबत प्रत्यक्ष वाहन निर्मितीची प्रक्रिया, रेसिंगची गणितं, स्टीअरिंग व्हीलच्या मागे असलेल्या माणसाचं महत्त्व, रेसिंगचं रोमँटिसाइजेशन असं बरंच काही आहे.
Utopia

‘युटोपिया’ : डिस्टोपियन कॉन्स्पिरसी थ्रिलर

Quick Reads
रंजक सिद्धान्तांनी किंवा त्यांच्या खऱ्या-खोट्या असण्याच्या नुसत्या कल्पनेनं कलाजगताला भुरळ घातली नसती तरच नवल! त्यातूनच वेळोवेळी अशा काल्पनिक-अकाल्पनिक सिद्धांतांवर आधारित पुस्तकं, चित्रपट, मालिका, माहितीपट अशा अनेकविध प्रकारांमध्ये साहित्य-कलाकृतींची निर्मिती झाली आहे. ‘युटोपिया’ ही ब्रिटिश मालिका याच संकल्पनेभोवती फिरणारी (काही एक प्रमाणात सत्याचा अंश असणारी) कलाकृती आहे.
परियेरुम पेरुमल

परियेरूम पेरूमल: भाबडा तरी गरजेचा म्हणावासा आशावाद

Quick Reads
शिकून, संघटीत होऊन संघर्ष करण्याच्या गरजेमागील मूळ इथे आपल्याला पदोपदी दिसत असतं. किंबहुना खरंतर त्याच्या अस्तित्त्वाच्या जाणीवेनं बोचत असतं. ही अस्वस्थता निर्माण करणं हाच खरंतर मारी सेल्वाराज दिग्दर्शित ‘परियेरूम पेरूमल’चा खरा उद्देश आहे, नि ही अस्वस्थता निर्माण होणं हे त्याचं यश आहे.
yesterday cover

यस्टर्डे: अ वर्ल्ड विदाऊट द बीटल्स इज अ वर्ल्ड दॅट्स इन्फानाइटली वर्स

Quick Reads
‘यस्टर्डे’च्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना अगदीच कल्पक नि रंजक आहे. ती अशी की चित्रपटाचा नायक वगळता जवळपास सगळं जग ‘बीटल्स’ या म्युजिक बँडचं अस्तित्त्व विसरून जातं. मग नायकाआसपासच्या कुणालाच या बँडची गाणी न आठवणं, नि नायकाने त्यांची गाणी स्वतःची म्हणून खपवणं सुरु होतं.
jagga jasoos

जग्गा जासूस: बसूचा अ-वास्तववाद

Quick Reads
आपल्याकडे गाण्यांच्या माध्यमातून कथानक पुढे नेण्याचा सांगीतिका नामक प्रकार कधी त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोचला असं म्हणताच येत नाही. याउलट अलीकडे तर गाणी ही लोकप्रिय कलाकृतीमध्ये लोकांच्या समाधानासाठी, किंवा व्यावसायिक कारणांसाठी अशा कथाबाह्य घटकांपायी अधिक येतात, ना की कथनाचं माध्यम म्हणून. मुळातच अनेक चित्रपटकर्त्यांना हा धोका पत्करावा वाटत नाही, तर जे पत्करतात त्यांचं अपयश (मग ते कलात्मक असो वा आर्थिक) आधीच दुर्मिळ असणाऱ्या या प्रकाराकरिता अधिक हानीकारक ठरतं.
joker

जोकर: अस्वस्थ करणाऱ्या क्रौर्य आणि खिन्नतेतील सिनेमॅटिक सौंदर्य

Quick Reads
इथे चित्रपटाला संकल्पनात्मक पातळीवर सामाजिक, आर्थिक आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय कंगोरे प्राप्त होतात ते त्याच्या लेखनाच्या माध्यमातून. तर, दिग्दर्शक टॉड फिलिप्स आणि छायाचित्रकार लॉरेन्स शेर मिळून समोर आणत असलेली दृश्यं चित्रपटाला गरजेचा असा एक गडद दृष्टिकोन प्राप्त करून देतात. सोबतच त्यांना मिळत असलेली पार्श्वसंगीताची किंवा काही वेळा नीरव शांततेची, अचूक निवड म्हणता येईलशा गाण्यांची जोड यातून एक नितांतसुंदर अशी सिनेमॅटिक सिंफनी तयार होते.
Once a year

वन्स अ इयर : एका नात्याचा मागोवा

Quick Reads
एरवी ज्यांची भेट होणं कधीही शक्य होणार नाही अशा दोन लोकांची भेट होण्याचे चित्रपटांतील आणि अगदी खऱ्या आयुष्यातीलही प्रसंग आपल्याला नवीन नाहीत. मात्र, अशा भेटीनंतर तितक्याच अशक्यप्रायरीत्या होणारी नात्याची सुरुवात, आणि त्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये उपजत सहजता टिकवून ठेवणं सोपं नसतं. अगदी खऱ्या आयुष्यातही आणि चित्रपट/मालिकांतही. गौरव पत्की लिखित आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ इयर’ या छोटेखानी मालिकेला नेमकं हेच साध्य करणं जमलेलं आहे.
Cosmo Films

सिनेमा: सिंग स्ट्रीट

Quick Reads
जॉन कार्नीच्या तीन चित्रपटांविषयीच्या लेखत्रयीतील हा तिसरा आणि शेवटचा लेख. या तीन लेखांच्या माध्यमातून माझ्या प्रचंड आवडत्या चित्रपटकर्त्यांपैकी एक असलेल्या जॉन कार्नीविषयी, आणि त्याच्या या तीन चित्रपटांविषयी पुरेशा सविस्तरपणे बोलण्याचा, या नितांतसुंदर कलाकृतींची प्रशंसा करण्याचा उद्देश बऱ्यापैकी सफल झाला आहे असं वाटतं.
Begin Again

सिनेमा: बिगीन अगेन

Quick Reads
प्रेमाकडे अपारंपरिकरीत्या पाहण्याचा विशिष्ट असा दृष्टिकोन म्हणजे लेखक-दिग्दर्शक जॉन कार्नीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. संगीत आणि योगायोगानं माणसं जोडली जातात. पण, कार्नी त्यांच्या भविष्याचा निकाल लावत नाही. तो त्या पात्रांना एक प्रकारच्या आशावादी वळणावर आणून सोडतो.
once

सिनेसमीक्षण: ‘वन्स’

Quick Reads
तूर्तास ‘वन्स’ या त्याला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या इंडी चित्रपटाचा विचार करूयात. ‘वन्स’मधील पुरुष (ग्लेन हॅन्सर्ड) हा एक गिटारवादक आहे. डब्लिनमधील रस्त्यावर उभं राहून स्वतः लिहिलेली गाणी वाजवत त्यातून तुटपुंजी कमाई करणं, नि आपल्या वडिलांसोबत राहून त्यांच्या व्हॅक्युम क्लीनर दुरुस्तीच्या दुकानात काम करणं या दोन गोष्टींभोवती त्याचं आयुष्य फिरतं.
lalaland1

स्पॉटलाईट: ला ला लँड

Quick Reads
‘ला ला लँड’ पारंपरिक प्रेमकथांमधील घटक वापरून मुळातच त्यातील प्रेम या मध्यवर्ती संकल्पनेचा पुनर्विचार करताना दिसतो. इथे नायक आणि नायिका दोघांनाही समान महत्त्व आहे. कुठल्याही नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा, तिचीही काहीतरी बाजू असेल याचा विचार न करता खटके कसे उडू शकतात, ही अगदीच मूलभूत गोष्ट त्याच्या कथनाच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येते.
Maheshinte Pratikaram

अ लव्ह लेटर टू महेशिन्ते प्रतिकारम

Quick Reads
ही कुणाला तरी प्रत्युत्तर देण्याची भावना मानवात उपजतच असावी. मग भलेही ते शारीरिक पातळीवर असो, किंवा मग शाब्दिक स्वरूपाचं. त्यातून मिळणारा आनंद, एक जेता असण्याची, समोरच्यावर कुरघोडी केल्याची भावना अनुभवणं यातच या उपजत अशा भावनेचं मूळ दडलेलं असावं.
jaaon khaan

स्पॉटलाईट: जाऊँ कहाँ बता ऐ दिल

Quick Reads
आदिश केळुसकर एकूण चित्रपटाची हाताळणी कशा प्रकारे करतो, यामध्ये चित्रपटाचा परिणाम दडलेला आहे. मरिन ड्राइव्ह, सिंगल स्क्रीन थिएटरपासून ते लॉजपर्यंत गर्दीने गजबजलेल्या शहरात प्रेमी युगुलांना आसरा देणाऱ्या अनेक जागांना तो जिवंत करतो.
Fan art

टॅरेंटिनोमय: क्वेंटिन टॅरेंटिनो आणि सिनेमा

Quick Reads
फिल्म स्कूलमध्ये न जाता थेट तिथे शिकवला जाणारा एक स्वतंत्र विषय बनलेल्या टॅरेंटिनोचा नववा चित्रपट, ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ आलाय. भारतातील त्याच्या चाहत्यांना त्याच्याच प्रदर्शनाचे वेध लागले आहेत. नि त्यामुळेच तर त्याला सेलिब्रेट करणारी, त्याला प्रेमपत्र म्हणून लिहिलेली ही लेखमाला तुमच्यापुढे आणत आहोत.
super deluxe

‘सुपर डिलक्स’ : एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव

Quick Reads
स्वतः निर्माण केलेल्या विश्वाशी सुसंगत अशा तार्किकतेला थारा देणारे व्यावसायिक चित्रपटही फॅसिनेटिंग असूच शकतात. ‘मर्द को दर्द नहीं होता’ प्रदर्शित झाला, त्याच्याच पुढच्या आठवड्यात आलेला ‘सुपर डिलक्स’ अशाच काही फॅसिनेटिंग आणि प्रभावी चित्रपटांमध्ये मोडतो.
kumbalangi

‘कुंबलंगी नाईट्स’ : भारतीय कुटुंबव्यवस्था आणि पौरुषत्वाचं प्रभावी विच्छेदन

Quick Reads
मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील कौटुंबिक नाट्य मात्र अपवादानेच या रटाळ चौकटींतून बाहेर पडलं. अलीकडील काळात मात्र सर्वच प्रादेशिक भाषांमधील चित्रपट या पारंपरिक चौकटींतून बाहेर पडत, अकार्यक्षम कुटुंबांचं (डिसफंक्शनल फॅमिली) कथन समोर मांडताना दिसू लागले आहेत. ‘कुंबलंगी नाईट्स’ हा मल्याळम चित्रपट याच बदलाचं एक अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप आहे.
shoplifters

स्पॉटलाईट:शॉपलिफ्टर्स

Quick Reads
जगप्रसिद्ध जापानी दिग्दर्शक हिरोकाझु कोरे-इडाचा कान चित्रपट महोत्सवातील मानाचा पुरस्कार, पाम’डि ऑर विजेता चित्रपट ‘शॉपलिफ्टर्स’ हा जपानमधील एका अकार्यक्षम कुटुंबावर आधारित आहे. मात्र, तो या मूलभूत संकल्पनेच्या पलीकडे जात मानवी स्वभाव आणि कुटुंबसंस्थेचा परामर्श घेणारा आहे.