मांग (मातंग) जातीत जन्मलेले राणोजी, फकीरा, सावळा आणि एकूण एक धाडसी आणि शूर वीर मांगाचे चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या 'फकिरा' या कादंबरीत केले आहे. फकीरा कादंबरीत अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला संदेश समजून घेतला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. परंतु मांग समाजातील लेखक, विचारवंत, बुद्धिमान मंडळींनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, संघर्षाचे तत्त्वज्ञान जरासे नीटपणे समजून घेतला पाहिजे.