Pradeep Biradar

Business Today Delhi AAP

'आप'चा राजकीय, मात्र भाजपचा डावपेचात्मक विजय

Opinion
फक्त दिल्लीतील निवडणुका समोर ठेवून भाजपच्याच वैचारिक भूमिकेला दुजोरा देत केजरीवाल यांनी आयडिया ऑफ इंडियाचं जतन करण्यापेक्षा राजकीय संधीसाधूपणातच आपल्याला स्वारस्य असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे निवडणूक जरी आम आदमी पक्षाने जिंकलेली असली तरी निवडणुकीचा अजेंडा ठरवण्यात आम्हीच यशस्वी ठरलो असल्याचं भाजपनं दाखवून दिलं आहे.
Telegraph

अर्थसंकल्पातील 'मनरेगा'चं दुखणं - डावं की उजवं?

India
कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नरेगा संघर्ष मोर्चाच्या सर्वेक्षणानुसार मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी किमान वार्षिक किमान १ लाख कोटींची तरतूद आवश्यक आहे. निधीच्या कमतरतेमुळे काम करूनही वेतन थकवण्याचे प्रकार वाढले असून चालू आर्थिक वर्षातील थकलेल्या निधीचं प्रयोजन आता आधीच कमी करून देण्यात आलेल्या या पुढच्या वर्षीच्या ६० हजार कोटींमधूनच करावं लागणार आहे.
sabrang

कुपोषित भारताचा स्वप्नरंजनात रमलेला अर्थसंकल्प

India
उपासमार आणि कुषोपण या बालकांना भेडसावणाऱ्या मुख्य दोन समस्यांसाठी भाजपप्रणित एनडीए सरकारच्या पोषण अभियान आणि मध्यान्ह भोजन या दोन प्रमुख योजना आहेत. कुपोषणाच्या वाढत्या समस्येशी या दोन्ही योजनाचं थेट कनेक्शन असताना कालच्या बजेटमध्ये सरकारनं या दोन्ही योजनांसाठीची आर्थिक रसद कमी करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय.
vanessa nakate

'वर्णद्वेष काय असतो हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं'

Europe
५ खंडांचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या या ५ तरूणींच्या फोटोमधून वृत्तांकन करताना असोसिएटेड प्रेसनं नेमका अफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी आलेल्या युगांडाच्या व्हेनेसा नकाटेलाच वगळल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पाश्र्चात्य माध्यमांच्या या वंशभेदी पूर्वग्रहाबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत असून, झालेल्या प्रकारचं गांभीर्य ओळखत असोसिएटेड प्रेसनं तात्काळ माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
आफ्रिका इलेक्शन

२०२० ठरणार आफ्रिकेतील देशांसाठी निवडणुकांचं वर्ष

Africa
२०२० हे वर्ष अफ्रिकेतील निवडणूकांचं असणार आहे. तिसऱ्या जगाचा भाग असलेले अफ्रिकेतील अनेक देश यावर्षी निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. अफ्रितेलील बहुंताश देशांमध्ये (तोडकीमोडकी का होईना) अध्यक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे. तर उरलेल्या देशांमध्ये भारताप्रमाणे संसदीय लोकशाहीचे मॉडेल अस्तित्वात आहे.
NRC

धक्कादायक: देशभर NRC राबवण्याची प्रक्रिया आत्तापासूनच सुरु?

India
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (National Population Register) अर्थात NPR ची सुरूवात देशात झाली असून NRC राबवण्याचं हे पहिलं पाऊल सरकारने विरोधाच्या लाटेवर स्वार होत उचलल्याचं स्क्रोलने केलेल्या शोधपत्रकारितून समोर आलेलं आहे.
Amit Shah

हिंदूराष्ट्राची फॅन्टसी : भाजप आणि काऊ बेल्टमधला रोमान्स

Quick Reads
अशा प्रकारची नागरिकत्वाची कसोटी जगाच्या इतिहासात जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा झालेली आहे, तेव्हा तेव्हा स्टेटनेच हजारोंच्या संख्येनं आपल्याच नागरिकांच्या कत्तली केल्या आहेत. सुरूवातीला अशा मुस्लीमांना भारतातही ठेवू नये आणि स्वतंत्र भूभाग म्हणजे देशही देऊ नये, असं अलौकिक मत सावरकर बाळगून होते. त्यावर मग गोळवलकर गुरूजींनी आपल्या We or our nationhood defined या पुस्तकात तोडगा काढला, की अशा लोकांना वेगळा भूभाग न देता दुय्यम दर्जाचा नागरिक म्हणून भारतातच ठेवावं.
modi bullet

भाजपला देणगी देणाऱ्या कंपन्यांना मिळाले बुलेट ट्रेनसंबंधित काँट्रॅक्ट

India
बुलेट ट्रेन प्रकल्पातील गुजराततमधील विविध कामांचं टेंडरिंग ज्या चार खासगी कंपन्यांना मिळालेलं आहे त्या चारही कंपन्यांनी योगायोगानं मागच्या काही वर्षात भाजप या एकाच राजकीय पक्षाला राजकीय अनुदान दिलं असल्याचा खुलासा अहवालात केला गेला आहे.
gunda trashy

ट्रॅशी सिनेमा आणि भारतीयांचं ट्रॅशी आसण्याचं गमक

Quick Reads
जगाकडे बघण्याचा भारतीय म्हणून आपला जो कुत्सित दृष्टिकोन आणि त्यामागे लपलेला डार्क हृयूमर समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय माणूस त्याच्या आजूबाजूला डोळ्यांदेखत घडणाऱ्या खऱ्या घटनांकडे फिक्शन म्हणून पाहतो. त्यातूनच मग त्यामध्ये अतिरंजितपणा आणत त्यातून स्वतःची करमणूक करायला बघतो. यातून तो एकूणच व्यवस्थेविषयी त्याला आलेल्या नैराश्याला वाट मोकळी करून देतो.
Dhoni

धोनी: मिडल क्लासचा शेवटचा हिरो

Quick Reads
सध्याच्या भारतीय संघातील धोनी वगळता एक मिडलक्लास भारतीय तरुण म्हणून मी स्वत:ला कोणाशीच तसा रिलेट करू शकत नाही. अर्थात हे सगळे आपल्याच देशाचे प्लेअर आहेत हे माहितीये पण त्यांच्यावर ठरवलं तरी असं प्रेम करू शकत नाहीत जसं धोनी किंवा त्याच्या अगोदरच्या खेळाडूंवर करायचो. उदाहरणादाखल विराट कोहली आणि त्याची अलमोस्ट परफेक्ट बॉडी बघितल्यानंतर काही केलं तरी माझ्यासारख्या मिडल क्लास पोराला तो आपल्यातला वाटत नाही.
झंजीर-मोदी

जाओ जाकर पेहले नेहरू-गांधी से पूछो..

Quick Reads
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत दोन्ही सभागृहात भाषण केलं. प्रत्येकी तासाभराच्या दोन्ही भाषणात ते बरेच हैराण झालेले दिसून आले. भाषणादरम्यान प्रत्येक मुद्द्याला हात घालताना त्याची सुरुवात ते 'लेकिन मै हैराण हू' या वाक्यानेच करताना दिसले. पण नेहमीप्रमाणे त्यांची प्रभावी शब्दफेक, शाब्दिक कोट्या, तर्काला बगल देण्याची क्षमता यामुळे त्यांचं भाषण ऐकणारेही तेवढेच हैरान झाले असतील.
चर्चिल

इतिहासकारांनी लपवलेला क्रूरकर्मा चर्चिल

Europe
हिटलर आणि चर्चिल यांच्या कृत्याची तीव्रता कमी अधिक असली तरी त्यात मूल्यात्मक फरक करणे अशक्य आहे. मात्र इतिहासाच्या कथानकांनी ते शक्‍य करून दाखवलं आहे.
Caster Semenya

बाईच्या ‘पुरुषी’ असण्याचा खेळखंडोबा

Quick Reads
या जेंडर टेस्टनं रूढार्थानं स्त्री नसणाऱ्या, स्त्री-पुरुष या जेंडर बायनरीत न बसणाऱ्या इतकंच नव्हे तर पूर्ण स्त्री असणाऱ्या खेळाडूंचं देखील करिअरच नव्हे तर आयुष्य बरबाद झाल्याच्या अनेक कथा आहेत. याची पुन्हा आत्ता चर्चा होण्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेची स्टार अॅथलिट कास्टर सेमेन्या.
Khajuraho

त्या रिक्षातल्या प्रेमाचं पॉर्न कोणी केलं?

Quick Reads
तुम्ही व्हिडिओ एवढ्या चवीनं का बघताय हा प्रश्न स्वतःला विचारा. एवढं करूनही पण त्या दोघांनी उघड्यावर असं करायला नको होतं असं म्हणत बारीक पिन टोचणाऱ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण उघड्यावर हागायला बसू शकतो तर उघड्यावर प्रेम तर करूच शकतो.
GullyBoy

‘गलीबॉय’- धारावीतून साउथ बॉम्बेवर उडालेला चिखल

India
ही फक्त मुरादची गोष्ट नाही. धारावीसारख्या गटारातून आलेला, नाही रे वर्गातला तरुण, रॅपच्या माध्यमातून आपल्या अंगाला चिकटलेली घाण घेऊन ‘आहे रे वर्गात येतो’ आणि ही गटार ‘तुम्हीच’ तुंबवून ठेवलीय, हे कवितेतून ठासून सांगतो.
Sexual Harassment

भारतीय पुरुषाची (अव) लक्षणे

India
स्त्रियांवरील बलात्कार, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांवर काय प्रतिक्रिया द्यावी, याबाबत सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी एकसंधता आहे. मग, वरील प्रत्यक्षरित्या शारिरिक इजा न करणाऱ्या घटनांवर रिअॅक्ट होण्यात आपल्यालाच काय पीडित महिलांमध्येही एकवाक्यता दिसत नाही.
Africa Climate

हवामानभेद

Africa
तापमान वाढीची जी किंमत आफ्रिकन लोकांना चुकवावी लागतेयेे व भविष्यात त्याचे असमान परिणाम बघता #Blacklivesmatters ही चळवळ हवामान बदलाबाबतही तेवढीच लागू होईल.
Yaba

Yaba menace in Bangladesh

Asia
Bangladesh is facing a fierce problem in the recent times.The small pill named 'Ya ba’, which literally means the madness drug is on the verge of destroying Bangladeshi youth.
sterlite protest

स्टरलाईट प्रकल्प: कोर्पोरेट, सरकार आणि १२ जीवांची व्यवसाय सुलभता

India
वेदांताच्या २०१४ च्या वार्षिक अहवालानुसार स्टरलाईट इंडस्ट्रीकडून भाजपाला १५ करोड तर वेदांताच्याच मालकीच्या केर्न इंडियाकडून ७.५ करोड रुपये एवढ्या राजकीय देणग्या २०१७ च्या वित्तीय वर्षात मिळाल्या.