Dnyaneshwar Bhandare

Indie Journal

राफेल डीलची चौकशी करण्यासाठी फ्रान्सची मोठी कारवाई

Europe
भारताशी झालेल्या सुमारे ५९,००० कोटी रुपयांच्या राफेल करारामधील कथित "भ्रष्टाचार उघडकीस आल्यानं", याची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. २०१६ मधील आंतर-सरकारी कराराची अत्यंत संवेदनशील तपासणी औपचारिकरित्या १ जून रोजी सुरू केली गेली.
Indie Journal

नेट-सेट, पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीचं आंदोलन मागे, भरतीचं आश्वासन

India
नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीनं २१ जून २०२१ पासून विविध मागण्यांच्या संदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन सुरु होतं. कोरोनाच्या काळात थांबलेली ३ हजार ६४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असं आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलं. यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Indie Journal

सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी नेट-सेट, पीएच.डी.धारकांचं २१ जूनपासून आंदोलन

India
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १०० टक्के सहाय्यक प्राध्यापक भरती सुरू करावी, शोषण करणारं तासिका तत्त्व कायमस्वरुपी बंद करावं आणि पदभरती करताना संवर्गनिहाय आरक्षण उच्च शिक्षण विभागात लागू करावं यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे साकडं घालण्यासाठी २१ जून रोजी पुणे येथे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केलं जाणार आहे.
Indie Journal

लग्नसमारंभ करून कोव्हिड नियम तोडल्याबद्दल आमदार लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल

India
महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचं येत्या ६ जून रोजी लग्न होतं. लग्नातील मांडव टहाळी कार्यक्रम नुकताच पार पडला. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
Dnyaneshwar Bhandare

परभणी: अवैध वाळू उपश्याला आशीर्वाद कुणाचे ?

India
वाळूची किंमत बाजारात १० हजार रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे.
Representational image

महाराष्ट्राची ग्रामीण आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर; प्रशासन हतबल

India
वाढती रुग्णसंख्या आणि पर्याप्त आरोग्य सुविधेच्या अभावामुळे आता आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Facebook

पंढरपुर निवडणुकीत प्रचार सभांना गर्दी, कोरोनाच्या संकटाचं भान विसरुन प्रचार

India
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत तुफान गर्दीमुळं कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचं विदारक चित्र पंढरपूर मध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला पोटासाठी धडपड करणाऱ्या गोरगरीब टपरीवाल्यांना पोलीस आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम दाखवत त्रास दिला जात आहे. दुसरीकडे नेत्यांच्या सभेत मात्र सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत राहत असल्याचा आरोप होत आहेत.
Twitter/Prakash Javadekar

बहुप्रतीक्षित फलटण-पुणे थेट रेल्वे सेवा अखेर सुरु

India
फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट रेल्वे सेवेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा ३१ मार्चपासून सुरू होईल.
Sources

नांदेड: धार्मिक मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानं शीख तरुण आणि पोलिसांमध्ये संघर्ष

India
महाराष्ट्रात व नांदेडमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश काढला गेलेला आहे. मात्र या आदेशाची पायमल्ली करत नांदेड शहरात शीख समुदायाच्या हल्लामोहल्ला मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली.
PTI

बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ, विरोधी आमदारांना पोलिसांची बेदम मारहाण, विरोधकांचा तीव्र संताप

India
बिहार विधानसभेत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या विधेयकावरून जोरदार राडा पाहायला मिळाला. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन (bihar special armed police bill 2021) तुफान गोंधळ झाला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला.
इंडी जर्नल

'खिसा' ला राष्ट्रीय पुरस्कार, लेखक कैलास वाघमारेंशी गप्पा

Quick Reads
"खिसा" या सिनेमाला नॉन फिचर फिल्म कॅटेगरी मधून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यात लेखन आणि अभिनेत्याची भूमिका साकारलेल्या कैलास वाघमारे शी इंडिजर्नलचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भंडारे यांनी केलेली बातचीत.
Devendra Fadnavis Twitter

Allegations of Rs.1250 crore 'tree plantation' scam under Fadnavis government

India
The ambitious tree plantation campaign of the former Fadnavis government in Maharashtra has come under the radar of the joint committee inquiring into plantation drive. The committee has found that the actual expenditure was hidden in the 33 crore trees plantation campaign conducted by former Forest Minister Sudhir Mungantiwar.
Marathwada Crop Loss

पूर्व महाराष्ट्रात पाऊस-गारपिटीनं शेतकरी हवालदिल, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान

India
मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना आणि बीड आदी भागांत, उत्तर चाळीसगाव तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही भागांत पावसाची नोंद झाली. पावसामुळे जनावरांचा चारा भिजला असून, काढणीस आलेला गहू, हरभरा, द्राक्षे, कलिंगड, पपई अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Indie Journal

सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचं आत्मक्लेश आंदोलन

India
सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसंच मृत पावलेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
Namdev Bhamare

शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळं पिकांचं नुकसान

India
अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह आंबा, केळी आणि फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं.
Indie Journal

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

India
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, सक्तीची वीजबील वसुली थांबवावी, मागील वर्षाची शेतीपंपाची वीज बिलं माफ करावी, तसंच पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी बीड शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
Indie Journal

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं देशभरात चक्काजाम

India
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज देशभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
Shubham Patil

२ ग्रामपंचायतींमध्ये 'नोटा'चा विजय

India
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना नाकारून ‘नोटा’ ला सर्वाधिक पसंती दिल्यामुळं प्रशासन सतर्क झालं. वरिष्ठांच्या आदेशानंतर अखेर ‘नोटा’ नंतर सर्वाधिक मतं मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.
विप्लव विंगकर

ग्रामपंचायतींमध्ये कुठं प्रस्थापितांची सरशी तर कुठं अनपेक्षित धक्का

India
गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. १५२३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.
इंडी जर्नल

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत अचानक रद्द केल्यानं गोंधळ

India
प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांच्या सोडतीवरुन पिंपरी चिंचवड मध्ये आज बरेच नाट्य घडले. उपमुख्यमंत्र्यांना डावलून भाजपने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन केले. सोडतीच्या ठिकाणी महापौरांसह भाजप पदाधिकारी आले, तरी प्रशासनाचा एकही अधिकारी हजर नव्हता. आरोप होतोय की दरम्यानच्या काळात मंत्रालयातून सुत्रे हलली आणि सोडतच रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले.
Deccan Herald

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा

India
राज्यातील चौदा हजार गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडला असून, या निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण ढवळून निघालं आहे.
DD News

खाजगीकरणाच्या प्रयत्नांविरोधात रेल्वे कामगार संघटनांची 'महायुती'

India
रेल्वे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारतीय रेल्वेच्या सर्व संघटना, एकत्रित निषेध करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. २ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये सर्व संघटनांचे प्रमुख आणि कॅटेगेरीकल संघटनांचे राष्ट्रीय नेतृत्व एकत्र आले होते.
Mumbai Live

न्यूजलॉंड्रीच्या प्रतीक गोयल यांच्यावरील दडपशाहीचा बृहन्मुंबई पत्रकार संघाकडून निषेध, अर्णबच्या अटकेवरही नोंदवली चिंता

India
दिवसेंदिवस राज्यात तसेच देशात पत्रकारांवर होणारे हल्ले वाढतच आहेत. नागरिकांकडून किंवा प्रशासकीय यंत्रणांकडून होणारा दबाव हा नेहमीच असतो. परंतु, माध्यमाने अब्रुनुकसानीचा दावा करत पत्रकारांवर दबाव आणण्याची घटना पुण्यात घडली आणि याचा बृहन्मुंबई पत्रकार संघाचे निषेध नोंदवला आहे.
NDTV

महाविकास आघाडीचंही येरे माझ्या मागल्या, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न

India
स्वतःचं पद शाबूत ठेवण्यासाठी एकिकडे अनेक मराठी शाळातील शिक्षक धडपडत असताना दुसरीकडे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याच्या हलचालींना वेग आला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
Indian Express

ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांवरून बीड जिल्ह्याचे राजकारण बदलण्याचे संकेत?

India
मजुरांच्या दरवाढीपासून त्यांना कारखान्यांवर मिळणाऱ्या सुविधांचा अभाव, आरोग्याच्या सुविधा असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी नेहमीच आंदोलने होतात. पण, अद्याप तरी ऊसतोड मजुरांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळालेला नाही. मात्र, हा प्रश्न घेऊन राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी लढत आहेत, असतात. यातून होणारे राजकारणदेखील सर्वपरिचितच आहे.
The Week

अनेक मिस कॉलनंतर खडसेंचा नंबर पोर्ट, भाजपचं नेटवर्क सोडून राष्ट्रवादीचं कनेक्शन

India
गेली ३ वर्षे आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Indie Journal

वादळी पावसानं शेतकऱ्याचं उसनं अवसानही गळालं, सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त फटका

India
परतीचा मान्सून आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा तडाखा महाराष्ट्राला बसला. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. गार वारा आणि जोरदार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
Indie Journal

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याच्या मार्गावर

India
धनगर आरक्षण लढा समन्वय समितीची राज्यव्यापी बैठक रविवारी (दि.०४) लोणावळ्यात पार पडली. या बैठकीला राज्यभरातून सकल धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरिता समाजाची दिशा निश्चिती करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.
इंडी जर्नल

मुलाखत: यांच्या प्रयत्नाने हिंदीमध्येही मराठीतला 'ळ' तसाच वापरावा लागणार

India
हिंदीमध्ये 'ळ' ऐवजी 'ल'चा वापर करणे चुकीचे ग्राह्य धरले जाणार आहे. भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांनी केंद्र सरकारकडे वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या विषयी त्यांच्याशी इंडीजर्नलने केलेली बातचीत.
www.afternoonvoice.com

काँगो तापाच्या साथीनं गुजरात-महाराष्ट्र सीमाभागात प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा

India
कोरोनाच्या महामारीत अनेकजण व्हायरल फ्लू, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करत आहेत. आता काँगो तापाने लोकांची चिंता वाढवली आहे. कोरोना संकटाचा तडाखा सुरू असतानाच 'क्रिमीयन काँगो हॅमोरेजीक फीवर'(सीसीएचएफ) हे आणखी एक संकट डोक्यावर घोंघावत आहे. 'काँगो फिवर' म्हणूनही ओळखल्या जाणा-या या आजाराने जनावरे बेजार आहेत.
Indie Journal

शेती विधेयकांविरोधात शेतकऱ्यांची राज्यात आक्रमक आंदोलनं

India
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी आज (शुक्रवारी) देशभरासह महाराष्ट्रातही 'भारत बंद' आंदोलन झालं.
Source

विविध विद्यापीठांच्या कर्मचारी संघटनांचे सुधारित वेतन संरचना त्वरीत लागू करणे व इतर मागण्यांसाठी लेखणी बंद सह ठिय्या आंदोलन

India
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीच्या वतीने सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले सुधारित शासन निर्णय पुनर्जिवित करून ते पुन्हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरीत लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी गुरुवार पासून विविध विद्यापीठांच्या कर्मचारी संघटनांनी लेखणी बंद सह ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे.
Free Press Journal

आरटीईच्या 'प्रतीक्षा यादीची' प्रतीक्षा संपेना

India
प्रवेश प्रक्रिया राबवताना पालकांनी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. परंतु मुदत संपूनही प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी कोणतीही पूर्वसूचना आली नाही. त्यामुळे पालक मुलांच्या प्रवेशासंदर्भात संभ्रमावस्थेत आहेत.
दिव्य भारत

नव्या शेतकरी विधेयकांमुळे देशभर शेतकऱ्यांची नाराजी, अनेक शेतकरी नेत्यांचा पाठिंबा, काही मुद्द्यांना विरोध

India
केंद्र सरकारने सुरवातीला ५ जुनला तीन अध्यादेश काढले. तेव्हापासून शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. विशेषतः पंजाब आणि हरियाणातील शेतकरी संघटनांनी या अध्यादेशांना विरोध करत आंदोलन सुरु केले. कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली आहेत.
Bar and Bench

तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या विनंतीमुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर बाजू मांडली नाही: महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी

India
बुधवारी (९ सप्टेंबर) न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, हेमंत गुप्ता आणि एस. रवींद्र भट यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाची तरतूद नाकारत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याच्या मर्यादेची आठवण करून दिली. सध्यातरी शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी व प्रवेशासाठी हा कोटा लागू होणार नाही, असे म्हणत मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
PTI edited

रायगड इमारत दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण?

India
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या इमारत दुर्घटनेतील मदत व बचावकार्य अखेर ४० तासांनी पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे.
पंजाब सरकार कृषी विभाग

गुलाबी बोंडअळी प्रकरणी तीन विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती

India
खरीप २०१७-१८ च्या हंगामात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात १४ लाख हेक्‍टरवरील कपाशी क्षेत्र बाधित झाले होते. सुमारे १४ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आयुक्तालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर केले होते. या अनुषंगाने कृषी आयुक्तालयात महासुनावणी घेण्यात आली.
गोपाळ पाटील. (प्रातिनिधिक छायाचित्र)

महिन्यांच्या वेतन कपातीनंतर आता हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर नोकरी गेल्यानं उपासमारीची वेळ

India
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने पैसा वाचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे, याचा मार कर्मचाऱ्यांना बसतो आहे. आधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावली गेली. आता रोजंदार गट-१ च्या कर्मचाऱ्यांची सेवा अधिकृतरित्या खंडित करण्यात आली. काही आगारांमध्ये या कर्मचाऱ्यांची सेवा आधीच बंद केली गेली होती.
Youtube

मुलाखत: राज्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी

India
२०१५ मध्ये झालेल्या स्वाइन फ्लूच्या धर्तीवर कोरोनाबाधितांवर उपचार झाले तर जनसामान्यांचे प्राण तरी वाचतील, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे मत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख, तसेच महात्मा फुले योजना समिती व धर्मादाय रुग्णालयाच्या समितीचे माजी सदस्य ओमप्रकाश शेटे यांनी मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडिजर्नलने ओमप्रकाश शेटे यांची घेतलेली सविस्तर मुलाखत.
DNA

कोरोनाच्या काळात रेशनचा काळाबाजार, दुकानदार पळवताहेत राशन

India
कोरोनाच्या साथीने राज्यासह देशात थैमान घातले आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय अधिक कडक केले आहेत. कोणीही घराच्या बाहेर न येण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. त्यामुळे गरीब व हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य लोकांना एकवेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.
The Indian Express

Crop insurance companies reluctant to seven 'loss-making' districts of the state

India
Apparently, no crop insurance company has been appointed yet in the Aurangabad, Beed, Sangli and four other districts of Maharashtra since the Rabbi season of 2019. Although the 2019 Kharif was sown despite millions of farmers being deprived of crop insurance, no crop insurance company has been appointed yet as the tender process has been completed.
Newsd.in

जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्तीस मान्यता, अन्नधान्य, कडधान्य आणि कांदा यासह अन्नधान्याचे नियमन रद्द

India
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अन्नधान्य, कडधान्य आणि कांदा यासह अन्नधान्याचे नियमन रद्द करण्याच्या साडेसहा दशकाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्तीस मान्यता दिली. यामुळे कृषी क्षेत्राचा कायापालट होईल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल, या दृष्टीने मंत्रिमंडळाने कृषी उत्पादनात अडथळामुक्त व्यापार सुनिश्चित करण्यासाठी 'शेती उत्पन्न व्यापार व वाणिज्य (पदोन्नती व सुलभता) अध्यादेश, २०२०' यांना मान्यता दिली.
The Federal

राज्यात रोज संक्रमण वाढत असताना राज्य सरकारचा शाळा चालू करण्याच्या विचाराबाबत संभ्रम

India
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील १५ जूनलाच शाळा सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. असे असले तरीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे शिक्षणाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे 'शाळा नक्की कधी सुरू होणार' याबाबत पालकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.
Best Media Info

कोरोनाव्हायरससमोर वृत्तपत्र बेजार, जगाला न्याय देणारा पत्रकार बेरोजगार

India
कोरोना विषाणूचा संसर्ग व सोबत वाढत जाणाऱ्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे, तसाच मराठी माध्यमांनाही बसला आहे. वृत्तपत्रांचे छापील अंक वितरण करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अंक प्रिंट करायचाही म्हटला तर अजिबात जाहिराती नाहीत, त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र याचा सर्वात मोठा फटका वृत्तपत्र माध्यमकर्मीना सोसावा लागत आहे.
द हिंदू

लॉकडाऊनमुळं कापूस खरेदी दोन महिन्यांपासून बंद, शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन

India
लॉकडाऊनमुळे शासकीय व खासगी खरेदी बंद असल्याने कापूस विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी कापूस व्यापाऱ्यांऐवजी सीसीआयला विकणे पसंत करतात. त्यातच नॉन एफएक्यू कापसाच्या खरेदीबाबत सीसीआय व पणन महासंघाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत.
rural

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती, ग्रामीण उद्योग, स्थावर मालमत्ता व्यवहार बाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर

India
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदीचे (लॉकडाउन) काटेकोर पालन सुरू राहील, मात्र जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात. शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरू व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी २० एप्रिलपासून होणार आहे.
एबीपी माझा

वांद्र्यात झालेली गर्दी ही फक्त एका पत्रकाराची जबाबदारी?

India
दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या एका नोटीसच्या आधारे वृत्त दिल्याचं एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावा देखील करण्यात आला. मात्र काहींच्या मते याला अनेक पैलू आहेत.
UNI

केंद्र सरकारने गर्भलिंग निदान चाचणीसाठीचा कायदा शिथिल केल्याने गैरवापर होण्याची शक्यता

India
कोविड -१९ (साथीचा रोग) आणि देशभरातील लॉकडाऊनमुळे 'आणीबाणीची परिस्थिती' असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्रालयाने चार एप्रिलच्या अधिसूचनेत जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध, नियम १९९६ (Prohibition of Sex Selection Rules, 1996) च्या अंतर्गत काही नियम ३० जून पर्यंत स्थगित केले आहेत. तशी अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे.
DH

कोरोना विषाणूच्या साथीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर

India
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्याचा परिणाम थेट देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. सार्वजनिक बाजारपेठा बंद ठेवल्याने मार्केटमध्ये येणारा माल उचलला जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारातही शुकशुकाट असल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागत आहे. जगभरात कोरोना विषाणूने पाय पसरले असून आता त्याने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे.
पारगड

'तान्हाजी'च्या यशापासून पारगड किल्ल्यावर पर्यटकांची वाढती हुल्लडबाजी, स्थानिकांची तक्रार

India
'तान्हाजी' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पारगड (जि. कोल्हापूर) किल्ल्यावर वाढत चाललेली हुल्लडबाजी आणि पर्यटनाच्या नावाखाली होणारा तळीरामांचा हैदोस, यांचा त्रास किल्ल्यावरच्या स्थानिकांना व तानाजी मालुसरेंच्या व इतर मावळ्यांच्या वंशजांना होत आहे.
इसलक

अहमदनगरचं इसळक ठरलं NRC-CAA विरोधात ठराव मंजूर करणारी पहिली ग्रामपंचायत

India
इसळक (ता. जि. नगर) या गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विशेष सभेत सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी या कायद्याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाला याबाबत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे.
gunman

जामिया हल्लेखोराच्या गुणपत्रिकेचा घोळ, नकली असल्याचा संशोधकांचा दावा

India
अवघ्या काही तासांत एएनआय सारख्या वृत्तसंस्थेने या विद्यार्थ्यांच्या सीबीएसई मार्कशीट चा तसेच त्याच्या कुटुंबीयाचाही तपास लावला. गोळीबार करणारा तरुण उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, त्यावेळी तो दिल्लीत राहत नव्हता, जरी राहत असला तरी त्याच्याजवळ कागदपत्रे असण्याची शक्यता कमीच आहे.
शिर्डी

मुख्यमंत्रांच्या निधीनंतर पाथरी आणि शिर्डीमध्ये साई बाबांच्या जन्मभूमीचा वाद

India
पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर साई जन्मभूमीचा वाद निर्माण झाला आहे. कोणतेच संत महापुरुष आपोआप प्रकट होत नाहीत. त्याला आईची कुसच लागते. हे सर्वज्ञात आहे. पाथरी हीच साई बाबा यांची जन्मभूमी आहे़, असा दावा पाथरीकरांनी केला आहे़ या संदर्भात पाथरीकरांकडून श्री साई बाबा यांच्या जन्मासंदर्भातील पुरावेही देण्यात येत आहेत. पण शिर्डीकरांकडून फक्त तर्क केले जात आहेत.
rajndra patil

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीमुळे सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर

India
नुकताच 'तान्हाजी' चित्रपटाला कन्नड एकीकरणं समितिने विरोध दर्शवून तानाजीचे शोज बंद पाडले होते. त्यावेळीही वाद चिघळला होता पण पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. बेळगाव आणि सीमा भागात १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रातले नेते येऊ नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी सकाळपासूनच महामार्गावर तपासणी सुरू केली होती.
एकनाथ शिंदे

'सारथी' च्या कारभारावर नाराज होऊन मराठा संघटनांचं आंदोलन

India
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत आणि सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकलेले विद्यावेतन सुरु करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सारथीचा लाभ घेणारे विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आली आहे . त्याविरोधात आज शनिवारी (दि. 11) एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
Medicines

पिंपरी-चिंचवडमध्ये नदीकिनारी 'भाजप' योजनेतील वैध औषधांचा खच

India
पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी. जलपर्णी, कचरा, प्लॅस्टिकने, दूषित पाण्याने तिचा श्वास कोंडत आहे. रोजचा कचरा, निर्माल्य, हॉटेलमधील उरलेले अन्न असे बरेच काही यामध्ये टाकले जाते. आता तर चक्क मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन इ. नदी पात्रात टाकली गेली आहेत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Farmers

महाराष्ट्रात कर्जमाफीवरून शेतकरी नाराज, ६५ टक्क्यांहून अधिक शेतकरी राहणार लाभापासून वंचित?

India
राज्यातील ३५ टक्के शेतकरी अधिकृत अशा बँकांकडून कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार, बाजार समितीतील दलाल आदींकडून कर्ज घेतात. त्यामुळं या कर्जमाफीचा फायदा फक्त ३५ टक्के शेतकऱ्यांना होणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, या सरकारच्या दाव्यात तथ्य नाही.
Kolhapur

व्यवस्थेच्या अपयशाला वैयक्तिक उपक्रमांची ठिगळं

India
काही तरुणांनी मिळून सोशल मीडियावर सेफ इंडिया, सेफ वुमन, साथ तुमची साथ आमची अशा प्रकारे मोहीमा राबवल्या. त्यातुन महिलांना एक श्वाश्वत विश्वास निर्माण होणार असला तरीही महिलांवरील अत्याचार आणि त्यावरच्या उपायांचा किचकटपणा अजूनतरी निस्तरता येत नाहीये याची गरज अधोरेखीत होत राहते.
ht

पाणीकपातीमुळं नागरिक त्रस्त तर टँकर माफियांची चांदी

India
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण शंभर टक्के भरलेले आहे. चोवीस तास पाणी पुरवठा, बंद पाईप लाईन योजना आणि अमृत योजने सारख्या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च झाले तरी देखील यापुढे पिंपरी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला पवना तर दुसऱ्या बाजूला इंद्रायणी नदी अशा दोन्ही बाजूनी नद्या असतानाहि फक्त ढिसाळ कारभारामुळे आवाज नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.
मस्ती कि पाठशाळा

वस्ती शाळेतून मजुर महिला व मुलांना मिळतंय शिक्षण

India
विकासाला हातभार लावणारे मजूर महाराष्ट्राच्या व इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून येतात. त्यांच्या राहण्याची सोय तर होते परंतु त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड, याबाबत मात्र प्रशासनाची उदासीनतेची भूमिका असते. विविध प्रांतातुन येऊन इथे हे कामगार कष्टाने पोट भरतात.