फ्रान्स, इटली आणि अमेरिकेचा भाग लॉकडाऊनमध्ये आहे. रस्ते ओस आहेत, दुकानं बंद आहेत, भीती कायम आहे. पण जपानमध्ये मात्र तसं दिसत नाही. जपानमध्ये कोरोनाव्हायरसच्या ९०० पेक्षा जास्त संसर्ग झालेल्या व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीपासून दोन महिन्यांच्या कालावधीत ९०० लोकांची नोंद झाली आहे. वुहान वरून आलेल्या एका व्यक्तीला १० ते १५ जानेवारी दरम्यान जपानी रूग्णालयात असताना हा आजार असल्याची खात्री झाली.