Asia

सगळं जग लॉकडाऊन असताना जपान मात्र सामान्य आयुष्य जगत आहे, हे कसं?

फ्रान्स, इटली आणि अमेरिकेचा भाग लॉकडाऊनमध्ये आहे. रस्ते ओस आहेत, दुकानं बंद आहेत, भीती कायम आहे. पण जपानमध्ये मात्र तसं दिसत नाही.

Credit : अल जझीरा

फ्रान्स, इटली आणि अमेरिकेचा भाग लॉकडाऊनमध्ये आहे. रस्ते ओस आहेत, दुकानं बंद आहेत, भीती कायम आहे. पण जपानमध्ये मात्र तसं दिसत नाही.

जपानमध्ये कोरोनाव्हायरसच्या ९०० पेक्षा जास्त संसर्ग झालेल्या व्यक्ती आहेत. पहिल्या व्यक्तीपासून दोन महिन्यांच्या कालावधीत ९०० लोकांची नोंद झाली आहे. वुहान वरून आलेल्या एका व्यक्तीला १० ते १५ जानेवारी दरम्यान जपानी रूग्णालयात असताना हा आजार असल्याची खात्री झाली.

जपानच्या टोकियोभोवती आपल्याला असं कोणतंही दृश्य नाही दिसणार. क्रीडा कार्यक्रम रद्द असूनही, शाळा बंद आहेत आणि काही, परंतु सर्वच मोठ्या मनोरंजन स्थळं बंद न करताही जपानमधील बर्‍याच भाग सर्वसाधारणपणे सुरू आहेत. इथं कोणतंही क्वारंटाईन नाही आणि बार किंवा रेस्टॉरंट्सची सक्तीची बंदी नाही. अगदी क्लब (बर्‍याच वेळा आजारी पडण्यासाठी सोपी जागा) देखील खुली आहेत.

जेव्हा आपण कोरोनाव्हायरस किती वेगानं आणि सहजपणे इतरत्र पसरला आहे या बाबीकडे लक्ष देतो, तेव्हा जपान त्या सर्व निकषांमध्ये बसतो. त्याचा चीनशी जवळचा संपर्क आहे, जिथून हा रोग उद्भवला. जपानची शहरं विस्तीर्ण आणि दाट लोकसंख्येची आहेत. लोक छोट्या छोट्या अपार्टमेंटमध्ये जगतात आणि ट्रेनमध्ये एकत्र पिळले जातात. ३ कोटींच्या जवळपास लोकसंख्या असलेलं टोकियो कायम व्यस्त असतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार इटलीला इतका वाईट फटका बसला आहे त्याचं कारण तिथं वृद्धांची जास्त संख्या आहे: इटलीत युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त सरासरी वय आहे, आणि कोरोनाव्हायरसची ज्येष्ठांना लगेच लागण होते, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसमुळे उद्भवणार्‍या न्यूमोनियापासून दूर ठेवू शकत नाही. याबाबतीतही जपान इटली च्या पुढे आहे, त्यांच्या लोकसंख्येत वृद्धांचा वाटा एक तृतीयांश इतका मोठा आहे.

तर पुन्हा प्रश्न पडतो इतका फरक कसा आहे? जपान इतक्या कमी संख्येचा अहवाल कसा देत आहे?

याचं उत्तर देशाच्या कमी चाचणी दरामध्ये आहे. जपानने इतकी कमी प्रकरणं नोंदविली आहेत कारण ते चाचणी करत नाहीयेत. अर्थात त्यातच यावर्षी इथं आयोजित ऑलिम्पिकवर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आणि सरकार संक्रमीत असलेल्यांची संख्या कमी ठेवण्याचा (दाखवण्याचा) प्रयत्न करीत आहे, अशी शंका नाकारता येत नाही जेणेकरून खेळ ठरल्याप्रमाणे पुढे जाईल.

जपान काही प्रमाणात नशीबवानही आहे. आधीच इथली परिस्थिती आणि इतर आरोग्यविषयक सवयीमुळं हा आजार तितक्या प्रमाणात इथं पसरत नाही: इतर देशांच्या तुलनेनं कमी सामाजिक जवळीक (हाथ न मिळवता वाकून आदर व्यक्त करणे), आजारी असताना मास्क घालण्याची एक सवय, इथं या कोरोनायरसला थांबवायला मदत करत आहे. वृद्धांमध्ये आधीच अलगावचे उच्च दर आहेत आणि त्याचा अर्थ असा आहे की जपान खरोखर सक्रिय प्रयत्नाशिवाय कोरोनाच्या वाढीचा वक्र (curve) सपाट करीत आहे.