Asia

'औरत मार्च'नं ढवळून निघतोय पाकिस्तान

औरत मार्च 'परदेशी अजेंडा' आहे म्हणून याला खूप वाईट पद्धतीनं 'ट्रोल' केलं गेलं.

Credit : International Center on Nonviolent Conflict

पकिस्तनचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्कार आणि लैंगिक हिंसाचारातील वाढीचा संबंध 'फहाशी (fahashi)' सोबत जोडला आणि ते जोडताना महिला ह्या अंग झाकून (purdah) न ठेवण्याशी जोडला. संपूर्ण जगातच महामारीच्या काळात महिला  हिंसाचारासाचे प्रमाण वाढले आहे. त्यात काहीतरी मूलभूत बदल होईल ह्या दिशेने काम करण्या ऐवजी कपड्याचा मुद्या बनवून महिलानाच दोष द्यायचा ही सध्या त्यांची कार्य प्रणाली विकसित झाली आहे.

इमरान खान यांचं हे वाक्य अश्यावेळी आलंय जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारण्याची धमकी आणि ईश्वरनिंदेच्या किंवा "फहाशी" च्या बनावट एफआयआरमुळे लपून रहावं लागतं. ह्याला न जुमानता काही महिला पुढे येतात आणि त्यांच्या हक्काची मागणी करतात. अश्यावेळेस न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्यावरचा अत्याचार योग्य कसा आहे दाखवून त्यांनादेखील गप्प करायचा हा प्रयत्न आहे.

मार्चमध्ये महिला हिंसाचारचे वाढते प्रमाण ह्याला कोणाचं तरी उत्तरदायित्व दाखवून द्यावं म्हणून आणि  घरात, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी हिंसाचार किंवा छळ ह्या विरुद्ध आवाज उचलायचा म्हणून १० मार्चला "औरत मार्च" काढण्यात आला होता. हा औरत मार्च 'परदेशी अजेंडा' आहे म्हणून पाकिस्तान मध्ये याला खूप वाईट पद्धतीनं 'ट्रोल' केलं गेलं. ते करताना अत्याचारात्मक भाषा आणि द्वेषपूर्ण शब्दांचा वापर केला गेला. याची तीव्रता इतकी होती की त्याविरुद्ध  #StopHateAgainstAuratMarch असेही हॅशटॅग सुरु करावे लागले.

५ एप्रिल रोजी "दैनिक उम्मत" ह्या अतिउजव्या आणि कट्टर इस्लामी, उर्दू भाषिक वर्तमापत्रांमधून 'औरत मार्च' काढणाऱ्या महिला, 'या वैश्या आहेत' ह्या प्रकारची हेडलाईन देण्यात आली. त्यात ही बातमी वर्तमानपात्राच्या पहिल्या पानावरुन दिली होती आणि त्या बाजूला इम्रान खान यांचा फोटो ही वापरला होता. हे कोणत्याही देशासाठी लाजिरवाणं ठरायला हवं.

या दोन्ही बाबीतून हे स्पष्ट होतं की 'रेप कल्चर'चा जो प्रसार पाकिस्तान मध्ये होत आहे, त्यात पाकिस्तानी सरकार तसेच संस्कृतीचा स्वयं-नियुक्त संरक्षणाचा ठेका घेणारे, हे दोघेही जबाबदार आहेत. आणि ह्यामुळेच महिलांवर होणाऱ्या हिंसाचारचे प्रमाण कमी होत नाही, आणि पुरुषप्रधान समाज पूर्णपणे वाचतो. हक्क मागणाऱ्या स्त्रियांच्या कपड्यावरून प्रश्न निर्माण कराचा किंवा त्यांना वर्तमानपत्रातून, त्या कश्या 'वेश्या' आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा.

एकत्र येणं, संघर्ष करणं किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उचलणे म्हणजे खूप चुकीचं आहे हे दाखवणं सध्या पाकिस्तान मध्ये चालू आहे, तेही एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सकारात्मक चळवळीला दाबण्यासाठी.