Sourabh Zunjar

Shubham Patil

स्थलांतरित मजुरांच्या समस्यांसाठी पश्चिम भारत मजदूर अधिकार मंच सज्ज

India
स्थलांतरित मजुरांच्या समस्यांवर देशपातळीवर काम केलं जावं यासाठी पश्चिम भारत मजदूर अधिकार मंच या स्वयंसेवी संघटनांच्या नेटवर्कची निर्मिती करण्यात आली आहे. या नेटवर्कमधला महाराष्ट्राचा सहभाग अधोरेखित करणारी पहिली बैठक आज पुण्यात पार पडली.
Shubham Patil

पंजाब: १५० एकर पिकं कापून शपथविधी

India
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी खातकर कलान येथील सुमारे १५० एकर जमिनीवरील गव्हाच्या पिकाची कापणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या एकूण खर्चासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. पंजाब राज्यावर असणाऱ्या कर्जाकडे बघता अशाप्रकारे शपथविधी कार्यक्रमावर इतका खर्च करणं हे येऊ घातलेल्या मान यांच्या सरकारसाठी तोट्याचं ठरण्याची शक्यता आहे.
इंडी जर्नल

मायावती: उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला दलित मुख्यमंत्री ते अस्तित्वाचा प्रश्न

India
२००७ मध्ये सत्तेत आलेले असताना बसपाला एकूण मतांच्या ३०.४३ टक्के मतं मिळाली होती. २०१२ मध्ये ही टक्केवारी थोडी कमी होऊन २६ टक्क्यांवर आली. २०१७ मध्ये २२ टक्के मतं, तर आत्ताच्या निवडणुकीत ही टक्केवारी आत्तापर्यंतच्या टक्केवारीच्या बरीच खाली जाऊन दुपारच्या मतमोजणीपर्यंत १२.८४ टक्क्यांवर पोहोचली.
Shubham Patil

राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

India
उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं गेल्या २ दिवसांपासून हजेरी लावलेली आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणजेच जळगाव, नंदुरबार आणि धुळे या भागाला अवकाळीचा मोठ्या प्रमाणवर फटका बसलेला असून अनेक ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला. राज्यभरात कांदा, द्राक्ष, गहू, केळी, हरभरा, मका, इ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
Shubham Patil

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मितीत लक्षवेधी वाढ

India
यावर्षी महाराष्ट्रात साखर उत्पादनाबरोबरच हंगाम संपायला सात महिने बाकी असताना इथेनॉल निर्मितीमध्ये साखर कारखान्यांनी लक्षवेधी वाढ केलेली आहे. याचाच परिणाम म्हणून मागच्यावर्षीचा हंगाम संपल्यानंतर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची जी ८.१ इतकी टक्केवारी होती ती या हंगामाच्या फेब्रुवारीपर्यंतच ९.०७ टक्क्यांपर्यंत गेलेली आहे.
इंडी जर्नल

परभणी: गंगाखेडमध्ये देवस्थान जमिनीला ट्रस्टमध्ये रूपांतरित करण्यावरून वाद

India
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथे देवस्थानच्या जमिनीवरून वाद निर्माण झाला आहे. गावातील काही जणांनी ग्राम पंचायतीमार्फत या जमिनीसाठी ठरव घेण्याचे प्रयत्न केले असता त्यांच्यातील एका युवकाला ब्राम्हण संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी फोनवरून त्या कुटुंबाविरुद्ध असं न करण्याची 'सूचना' दिल्यामुळे या प्रकरणाला थोडं वेगळं स्वरूप येऊन गावात तणाव निर्माण झाला.
Prathmesh Patil

एक्स्क्लुजिव्ह: राज्यातले ६ जलविद्युत निर्मिती प्रकल्प जाणार खाजगी कंपन्यांच्या घशात?

India
महानिर्मितीच्या ताब्यात असणारे सहा जलविद्युत प्रकल्प खाजगी कंपनीकडे देण्यात येणार असून या कंपन्यांकडून वीजनिर्मिती केली जाणार आहे. आत्तापर्यंत शासनाच्या अख्यातीत असणारी वीजेची निर्मिती खाजगी कंपनीकडे गेल्यामुळं सामान्य माणसाला कधी ना कधी याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अजून हा निर्णय झाला नसला तरी पुढच्या काही महिन्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
इंडी जर्नल

'न्यूड' फोटोग्राफीचं कारण देत फोटो प्रदर्शनावर सेन्सरशिप

India
अक्षय माळी या फोटोग्राफी कलाकारानं दिनांक ७, ८ आणि ९ जानेवारी या तीन दिवसांमध्ये आयोजित केलेल्या 'न्यूड' सेल्फ पोर्ट्रेट्स प्रकारातील छायाचित्र प्रदर्शनावर काही 'लोकांनी' आक्षेप घेतल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाच्या व्यवस्थापनानं परस्पर त्याचं प्रदर्शन सेन्सर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
Prathmesh Patil

आंदोलनांनी भारावलेलं वर्ष

Quick Reads
संपूर्ण जगानं अनेक ठिकाणी त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि आणि अन्यायाचा निषेध करणाऱ्या लोकांचं आंदोलनाच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण पाहिलं. जगाच्या तुलनेत भारतामध्येही आंदोलनाचं प्रमाण यावर्षी जास्त होतं.
Indie Journal

ख्रिस्तमसनं युद्धाला हरवलं होतं त्या दिवसाची गोष्ट!

Quick Reads
जेव्हा एखादं युद्ध सुरु असेल, त्यातही ते लाखो सैनिकांचा जीव घेणारं आणि हिंस्त्र असं पहिलं महायुद्ध असेल, तर दिवस सणाचा असो किंवा नसो, युद्धभूमी हेच तुमचं वास्तव आहे आणि समोर शत्रू आहे, तुम्ही त्यांना मारा, किंवा मारले जा, हेच तुमचं सत्य. मात्र डिसेंबर १९१४ चा ख्रिस्तमस, या मानवतेच्या काळोखाच्या अंधारात मानवी करुणेची एक प्रचिती घेऊन आला होता!
इंडी जर्नल

गोदाकाठ: गोदावरीचा प्रवाहीपणा घेऊन वाहणारा सिनेमा

Quick Reads
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित गोदाकाठ या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं. यंदाच्या मराठी चित्रपटांच्या पिफमधील चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. प्रिती (मृण्मयी गोडबोले) या शहरातल्या, आयटी सेक्टरमध्ये उच्च पदी काम करणाऱ्या आणि स्पर्धेच्या जगात धावता धावता, अनेक ठेचांचा मार खाऊन आयुष्य संपवून टाकण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या तिशीतल्या एका तरुणीची ही गोष्ट.
Indie Journal

केंद्राच्या धोरणानं हैराण सोयाबीन, कापूस शेतकरी करतायत ऑनलाईन कॅम्पेन

India
#SaveSoyaCottonFarmers #StopFarmerExploitation हॅशटॅग वापरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन फेसबुक , ट्विटरच्या माध्यमातून केलं जातंय.
Indie Journal

फ्रान्सनं इजिप्ती सैन्यासह नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचं उघड: फ्रेंच शोधपत्रकारिता वेबसाईट

Europe
२०१६-१८ मध्ये झालेल्या इजिप्तकडून लिबिया सीमेवर केलेल्या हवाई हल्ल्यात फ्रान्सचा छुपा सहभाग असल्याचा खुलासा डिस्क्लोज या इन्वीस्टीगेटीव्ह संकेतस्थळाने लीक झालेल्या काही कागदपत्रांआधारे केला आहे. यावेळी एकूण १९ हवाई हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिक मारले गेले असल्याची बाब यामधून समोर आलीये.
Indie Journal

एसटी महाराष्ट्रासाठी इतकी महत्त्वाची का आहे?

India
एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन अजूनही चालूच आहे. या आंदोलनाचा परिणाम सर्वात जास्त फटका बसतोय तो ग्रामीण दळणवळणाला. महाराष्ट्रात अशी असंख्य गावं आहेत ज्या गावात कोणतीही खाजगी दळणवळण व्यवस्था पोहोचलेली नाहीये किंवा पोहोचली असेल तरी एसटी एवढ्या माफक आणि सवलतीच्या दरात ती उपलब्ध नाहीये. म्हणून प्रश्न पडतो, महाराष्ट्रासाठी एसटी इतकी महत्त्वाची का आहे?
शुभम पाटील

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील कथित चमत्कारावर अंनिसचा आक्षेप

India
१६ नोव्हेंबरच्या रात्री आणि आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध कार्यक्रमात डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्काराचा प्रयोग दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी या गोष्टीचं कौतुक केल्यामुळे भोंदूगिरीचा प्रचार समाजात झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केला आहे.
इंडी जर्नल

सोयाबीनचे दर आणखी पाडावेत यासाठी सुरू असलेले प्रयत्न खपवून घेणार नाही: डॉ. अजित नवले

India
अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. यातच ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केंद्र सरकारला सोयाबीनचे खरेदी दर अजून कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी करणारे पत्र लिहिलं आहे.
Shubham Patil

पीक नाही, विमादेखील नाही

India
मागच्याच आठवड्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलं. मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचा असणारा पिक विमा हा यावर्षी एवढं नुकसान होऊनही अजून शेतकऱ्यांच्या हातात मिळालेला नाहीये. नुकसानीच्या काळात सर्वात मोठा आधार असणारा पीक विमा हाच त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी होऊन बसलीये.
इंडी जर्नल

केंद्र सरकार पाळलेल्या शांततेतून शेतकऱ्यांच्या हत्येचं समर्थन करतंय का?

India
गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष यानं थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरीविरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारबद्दल असंतोष निर्माण झालेला असतानाच या दुर्घटनेमुळे देशातील वातावरण अजूनच चिघळलेलं आहे.
इंडी जर्नल

रिपोर्ताज: पूरपरिस्थितीनुसार भरपाई देण्यासाठी मराठवाड्यात वाढती मागणी

India
पूर्व किनारपट्टीवर तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलं. गोदावरी नदीवर असणाऱ्या जायकवाडी धरणाबरोबरच इतर धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असताना अतिवृष्टीग्रस्त म्हणून नाही तर ते 'पूरग्रस्त' म्हणून करावेत, अशी मागणी काही सामाजिक आणि शेतकरी संघटनाकडून केली जातीये.
Indie Journal

शेतमाल आणि बाजारात शेतकऱ्यांना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचाच पर्याय

India
सोयाबीन दरांच्या पार्श्वभूमीवर एक असाही सूर उमटत आहे की शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न समितीसोबतच आजूबाजूला असणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मिळणाऱ्या फायद्याकडे येत्या काळात लक्ष दिलं पाहिजे.
इंडी जर्नल

शुगर बेल्ट, शेतकरी आंदोलन आणि निवडणुकांसाठी भाजपचं जात-गणित

India
पश्चिम उत्तर प्रदेशच्या जाट पट्ट्यावर असणारा शेतकरी आंदोलनाचा प्रभाव हा भाजपसाठी अडचणीचा विषय ठरत आहे. त्यामुळं या एफआरपीवाढीचा थेट संबंध उत्तरप्रदेश निवडणुकीशी आहे का? तो असलाच तर त्याचा खरंच परिणाम इथल्या शेतकऱ्यांवर होणार आहे का?
Indie Journal

मुसळधार पावसात शेतीचं प्रचंड नुकसान होताना पिकविमा कंपन्या 'नॉट रिचेबल'

India
राज्याच्या बऱ्याच भागात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अशातच पिकविमा कंपन्यांचे फोनच लागत नसल्यामुळं अनेक शेतकरी पिकविम्याविना अडचणीत सापडले आहेत.
Shubham Patil

स्वतः कर्जात राहून शाळा चालवणारे नामदेव यादव

Quick Reads
गणेशवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेलं साधारण ४,००० लोकवस्तीचं गांव. या गावातले नामदेव यादव हे एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. नोकरीवेळी शाळेमधली वेगवेगळी कामं करत असताना त्यांना हे जाणवू लागलं की या भागातील आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचंदेखील शिक्षण देण्याची गरज आहे. २००८ पासून नामदेव यादव गावात स्वतःची शाळा चालवतायत.
pmc.gov.in

पुणे शहरात फक्त १४ अग्निशामक केंद्रं

India
पुणे शहराला तब्बल ७२ अग्निशामक केंद्रांची गरज असताना, सध्या शहरात फक्त १४ केंद्रं कार्यान्वित आहेत. म्हणजेच पुण्याच्या गरजेच्या तुलनेत फक्त २० टक्के केंद्रं शहरात आहेत. २०११-१२ पासून भरती न झाल्यामुळे मनुष्यबळा अभावी बरीचशी केंद्रं इमारती असूनदेखील बंद आहेत.
इंडी जर्नल

पीक विमा प्रश्नी किसान सभेचे शेती आयुक्तालयावर आंदोलन

India
हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील शेती आयुक्तालयावर किसान सभेने आंदोलन करून पीक विमा प्रश्नी कृषी आयुक्तांची भेट घेतली. गेले अनेक दिवस निवेदनं देऊनदेखील पीक विमा प्रकरणी कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नसल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
Sourabh Zunjar

अंगणवाडी सेविकांच्या फोनवापसी आंदोलनाची राज्यशासनाकडून दखल

India
अखेर अंगणवाडी सेविकांच्या फोनवापसी आंदोलनाची दखल घेतली गेली असून २ सप्टेबर रोजी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन केलं आहे. संपूर्ण देशभरात काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना दिलेल्या फोनबद्दल आणि पोषण ट्रॅकर या केंद्राच्या अॅपबद्दल तक्रारी चालू आहेत. अनेक महिने तक्रार करूनदेखील याची दखल घेतली जात नसल्यामुळे महाराष्ट्रातून १७ ऑगस्ट रोजी सीटू आणि इतर काही संस्थांमार्फत या सेविकांनी फोनवापसी आंदोलानाला सुरुवात केली होती.
इंडी जर्नल

तंत्रशिक्षण गळतीतले ७० टक्के विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातून!

India
आयआयटीमध्ये शिकत असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील ड्रॉपआउट विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याचं काल एका आकडेवारीमधून समोर आलं. राज्यसभेत काल विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देत असताना शिक्षण मंत्रालयाने सांगितलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये भारतामधील नामवंत आणि अव्वल अशा सात आयआयटी शिक्षणसंस्थांमधून पदवीच्या वर्षांमध्ये शिक्षण सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ६३ टक्के विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातील आहेत.
Sourabh Zunjar

पूर आणि कोव्हिडच्या संकटातून सावरायचं कसं; कोल्हापूरच्या चर्मकारांची व्यथा

India
कोल्हापुरी चपला हातावर बनवणारे काही कुशल कारागीर आजही कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये आणि शहरातदेखील आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अडचणींचा जो भला मोठा डोंगर या कारागिरांवर ढासळलाय, त्यातून काळाच्या ओघात हा व्यवसाय किंवा हे कारागीर या व्यवसायाकडे पाठ फिरवतील की काय अशी शंका निर्माण झालीये.
Indie Journal

दूध दरात तातडीनं वाढ, साखरेप्रमाणेच दुधाला एफआरपीचा कायदा करणार

India
दूध दराबद्दल राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी आज किसान सभा, शेतकरी संघटना व दूध संघांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक घेतली. लॉकडाऊनपूर्वी मिळत असणारा दर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी दूध खरेदी दर वाढविण्यात येतील, आणि पुन्हा असं संकट शेतकऱ्यांवर कोसळू नये म्हणून उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी लागू करणारा कायदा केला जाईल.
इंडी जर्नल

जनुकीय परावर्तीत बियाणांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई करा; ७० संस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

India
महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊन शेतीची लगबग सुरू झालीये. मात्र याच काळात अनेक ठिकाणी निर्बंध असलेल्या जनुकीय परावर्तीत (Genetically Modified) बियाणाची मोठ्या प्रमाणात बेकायदेशी विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील ७० सामाजिक बहुउद्देशीय संस्थांनी केलीये.
Indie Journal

ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या खाजगीकरणाविरोधात डाव्या-उजव्या युनियन्स एकत्र

India
केंद्र सरकारच्या व्यावसायीकरणाच्या धोरणाला सेंट्रल ट्रेड युनियन आणि सेक्टोरल फेडरेशनच्या वतीनं निषेध करण्यात आला. केंद्र सरकार देशाच्या संरक्षण उद्योगाचं व्यावसायीकरण करत असून राष्ट्रीय मालमत्तेची सोप्या पद्धतीनं विक्री व्हावी या कारणानं ४१ आयुध निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा संपूर्ण कारभार ७ खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेलेला आहे.
Shubham Patil

दूध दर प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनांची आवर्तनं  

India
दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणींना घेऊन अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उपादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र यांच्याकडून आज १७ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आलं. उद्या दि. १८ जून रोजी लाखगंगा गावामध्ये ग्रामसभा घेऊन यातील पहिला ठराव मंजूर केला जाणार आहे.
Indie Journal

बदलाल तर टिकाल: नियतकालिकांसमोर पॅनडेमिकनं उभं केलं आव्हान

Quick Reads
कोरोनाकाळात नियतकालिकांच्या छपाईवर परिणाम झाला असून डिजिटल वितरणाकडे कल वाढल्याचं दिसून येतंय. आधीच परवडत नसलेला छपाई खर्च, तसंच वितरकांचं भरमसाठ कमिशन आणि बदललेल्या वाचनाच्या सवयी यामुळं छापील नियतकालिकांना उतरती कळा लागलीच होती. पॅनडेमिक आणि लॉकडाऊननं त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा केला.