India

युजीसीचे निर्देश, लस मिळाली, आता 'धन्यवाद मोदीजी' म्हणा…

भारताने सोमवारी १८ वर्षावरील वरील सर्व नागरिकांसाठी कोविड-१९ लसीकरणाची मोहिम सुरु केली आहे.

Credit : DU Twitter/Indie Journal

द डायलॉग या ऑनलाईन वृत्त पोर्टलच्या एका रिपोर्टनुसार सोमवारी सुरु होणाऱ्या लसीकरण मोहमेची अंमलबजावणी करण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), जी भारताची सर्वोच्च शिक्षण संस्था आहे, तिने सर्व भारतीय विद्यापीठांना, आयआयटी संस्थांना आणि सर्व कॉलेजना आदेश दिले आहेत की, मोफत लस मोहीमेबद्दल आपल्या संस्थांनामध्ये ”धन्यवाद मोदी जी” असा आशय असलेले बॅनर लावावे आणि ते समाज माध्यमाद्वारेदेखील प्रसारित करावेत.

 

 

भारताने सोमवारी १८ वर्षावरील वरील सर्व नागरिकांसाठी कोविड-१९ लसीकरणाची मोहिम मोठ्या उत्सहाने सुरु केली आहे. देशातील युवक या निर्णयाची गेले कित्येक दिवस वाट बघत होते. यापुढे तरुणांनाही सरकारी केंद्रात मोफत लस मिळणार आहे. या मोहिमेची घोषणा पंतप्रधान मोदींनी ७ जून च्या ‘राष्ट्र के नाम संदेश’ च्या माध्यमातून दिली होती.’  विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याकरीता बॅनरचे  डिजिटल स्वरूप(फॉरमॅट) हिंदी आणि इंग्रजीत तयार केलेलं आहे आणि ते सर्व संस्थांनाना पाठवलेलं आहे. आणि सर्व संस्थानाना तोच फॉरमॅट किंवा स्वरूप वापरायचं आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षा सर्वेक्षण (ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर ऑफ हायर एजुकेशन) जे केंद्रीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत येतं, त्यांनी ह्या स्वरूपाची इमेल केलेले आहे. 

तसेच शिक्षण संस्थानांना आज सोमवारी दिवसाअखेर बॅनर लावल्याचा अहवालदेखील पाठवावा लागणार आहे. देशातील काही विद्यापीठांनी आज बॅनर लावल्याचं वृत्त आहे, ज्यात दिल्ली विश्वविद्यालयचा ही समावेश आहे. 

विद्यापीठं आणि इतर शिक्षण संस्थाने कोविड निर्बंध मुळे मोठ्या प्रमाणात बंद आहेत. परीक्षा आणि शिक्षण संसंथांची कामेदेखील ऑनलाईन झालेली असताना शिक्षण संस्थानामध्ये बॅनर लावण्याचे काय प्रयोजन असावे असा प्रश्न लोक समाज माध्यमांवर विचारात आहेत. केंद्रीय बोर्डाच्या १२वी च्या परीक्षा रद्द केल्यानंतर असाच काहीसा ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान समाज माध्यमांवर चाललेला होता