Mid West

इराणच्या निवडणुकीत चौरंगी लढत, कट्टरपंथी रैसी यांच्या विजयाची शक्यता

इराणच्या निवडनुकीत ४ अधिकृत उमेदवार आहेत.

Credit : Indie Journal

शियाबहुल असणाऱ्या इराण देशात आज १८ जून रोजी मतदान पार पडले आहे. ६ कोटी मतदार असणाऱ्या इराण मध्ये राष्ट्रपति स्पर्धेत ४ उमेदवार मैदानात असून पुराणमतवादी नेते इब्राहीम रईसी हे स्पर्धेत पुढे आहेत. इराण ची झालेली आर्थिक अडचण सध्या सर्वात मोठा मुद्दा असून इराणी लोक ह्या निवडणुकीबद्दल आशावादी नसल्याचे चित्र दिसत आहे तसेच कमी मतदानाची शक्यता आहे. इराण ची आर्थिक स्थिति गेल्या ८ वर्षा पासून एकसारखी घसरत आहे, त्यात करोना च्या प्रादुर्भावणे आर्थिक  परिस्थिति अधिकच चिघळले आहे त्यामुळे बेरोजगारी आणि दारिद्रयात असाधारण भर पडली आहे. तसेच आरोग्य, शिक्षण आणि नागरी स्वतंत्र ह्यांची ही घसरण सुरूच आहे. लोक हसन रौहणी ह्यांच्या कारभाराला त्रस्त आहेत तसेच ते सुधारणावादी व उदारमतवादी सरकार असावी म्हणून अपेक्षित आहेत.   

इराणच्या निवडनुकीत ४ अधिकृत उमेदवार आहेत.

इब्राहीम रैसी 

६० वर्षीय इब्राहीम रैसी हे पुराणमतवादी नेते, ते इस्लामिक कायदेपंडित तसेच इराणचे सरन्यायाधीश आहेत. २०१९ ला त्यांची इराणचे सर्वेसर्वा अध्यक्ष अली खोमेनी ह्यांनी नेमणूक केली होती, या आधी त्यांनी वेगवेगळी पदं भूषवली आहेत. रैसी हे २०१७च्या राष्ट्रपती निवडणुकीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इस्लामिक रेव्होल्यूशन संघटने कडून ते उभे होते व ते तत्कालीन मवाळ नेते हसन रुहानी यांच्या कडून पराभूत झाले. पण या निवडणूकीत त्यांचा विजय जवळपास निश्चितच आहे असं मानलं जातंय. जर ते निवडून आले तर ते पहिले इराणी राष्ट्रपति असतील ज्यांच्यावर अमेरिकेनं निवड व्हायच्याही आधीच प्रतिबंध लावले आहेत. 

मोहसेन रेजी

हे पुराणमतवादी नेते असून ते रेझिस्टंट फ्रंट ऑफ इस्लामिक इराण संघटनेशी संलग्नीत आहेत. रेजी ही १९८० ते १९९७ पर्यंत इराणचे सेनाप्रमुख होते तसेच ते १९८९ च्या इराणी इस्लामिक क्रांतिच्या आधी ते बंडखोर संघटनेत होते. ते नंतर मोजाहिदीन ऑफ इस्लामिक रेव्होल्यूशनकडून २००९-२०१३ च्या निवडणुकीतही उमेदवार होते. 

अब्दलनासेर हेम्मती 

६५ वर्षीय एक इराणी शैक्षणिक, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी सन २०१८ ते २०२१ या काळात सेंट्रल बँक ऑफ इराणचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. ते पूर्वी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगचे उपाध्यक्ष होते. तसेच ते काही काळ चीनमध्ये इराण चे राजदूत होते.

सय्यद अमीर-होसेन गाझिजादेह हाश्मी

इराणचे पुराणमतवादी राजकारणी आहे जो २००८ पासून इराणच्या संसदेत मशद आणि कलाट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते फ्रंट ऑफ इस्लामिक रेव्होल्यूशन स्टेबिलिटीचे सदस्य होते आणि पक्षाचे प्रवक्ता म्हणून त्यांनी काम पाहिले.

आज, शुक्रवार १८ जून रोजी इराण इस्लामिक क्रांतीनंतरच्या १३व्या अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जात आहे. लोक या निवडणुकीला निरर्थक आणि कंटाळवाणी गोष्ट, ज्याचा काहीच उपयोग नाही, असं म्हणत आहेत. जनतेमध्ये अशी गंमतवजा अफवा पसरली आहे की निवडणूकीत मतदान केले तरच कोविड-१९ ची लस दिली जाईल. तसेच ज्या लोकांना निवडणुकीचा सरळ फायदा होणार आहे तेच या निवडणुकीला गंभीरपणे घेत आहेत, सामान्य लोकांचा प्रत्यक्ष असा सहभाग दिसत नाही, असं तिथून होणाऱ्या वार्तांकनातून दिसून येतं. विविध प्रतिगामी गटांमध्ये चढाओढ, राजकीय-भांडवली घटकांचे विविध डावपेच, चिरडले जाणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अमेरिकच्या वैमनस्यातून ओढवलेली आर्थिक मंदी, आरोग्य सुविधा, शिक्षणसंस्था, यांची झालेली दुर्दशा या सर्वांना इराणी लोक कंटाळलेली आहेत. त्यात त्यांना कोणताच पर्याय काहीतरी बदल घडवून आणेल अशी अपेक्षा नाही. जुन्या क्रांतीत रमाणाऱ्या लोकांना सोडून या देशात कोणीच सुखी नाही, अशी प्रतिक्रिया इराणी लोक समाज मध्यमावर देत आहेत.