Mid West

२८८ दिवसांच्या उपोषणानंतर तूर्कितील क्रांतिकारक गायिकेचं निधन.

ग्रूप योरुम' हा गट आपल्या क्रांतिकारी स्वरूपाची आणि चळवळीची गाण्यासाठी ओळखला जातो.

Credit : MbS News

तुर्की मध्ये बंदी घालण्यात आलेल्या लोकसंगीत गटाच्या एका सदस्याचे शुक्रवारी उपोषणाच्या २८८ व्या दिवशी निधन झाले आहे. गायिका हेलेन बोलेक आणि गटातील इतर सहकाऱ्यांनी सरकारच्या त्यांच्या प्रती असणाऱ्या वर्तवणुक आणि बंदीचा निषेध करण्यासाठी तुरुंगात असतानाच संप सुरू केला होता. 

'ग्रूप योरुम' हा गट आपल्या क्रांतिकारी स्वरूपाची आणि चळवळीची गाण्यासाठी ओळखला जातो. यातल्याच एक गायिका २८ वर्षीय हेलेन बोलेक, ह्यांचे उपोषणाच्या २८८व्या दिवशी इस्तान्बुलच्या राहत्या घरी निधन झाले व यानंतर आता इतर सदस्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. 

हेलेन आणि दुसरे सदस्य इब्राहिम गोकसेक, दोघांनी अशी मागणी केली होती की ग्रुप योरमला पुन्हा त्यांचे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, तुरूंगात असलेल्या सदस्यांना सोडण्यात यावं आणि या गटाविरूद्धचा अन्यायकारक खटला मागे घेण्यात यावा. गोकसेकच्या पत्नीसह दोन ग्रुप योरम बँड सदस्य तुरूंगात आहेत.

११ मार्च रोजी बोलेक आणि गोकसेक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचाराला नकार दिल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती अंकारा येथील मानवाधिकार संघटना किंवा आयएचडीने दिली.

आयएचडीने सांगितले की मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात तुर्कीच्या उप गृहमंत्र्यांशी भेट घेऊन उपोषण संपवू शकेल असा तोडगा काढला. असोसिएशनने सांगितले की, निषेधाची मागणी बंद करेपर्यंत सरकारने मागण्यांचे 'अवलोकन' करण्यासही नकार दिला.

ग्रूप योरम ह्यांचे संबंध 'रिवोल्यूशनरी पीपल्स लिबरेशन फ्रंट'शी जोडले जात आहेत, ज्याला अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय संघराज्य ह्यांनी अतिरेकी गट म्हणून गोषीत केला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप ताईप एर्दोगान यांच्यावर वारंवार एकाधिकारशाही प्रवृत्ती, मुस्लिम कट्टर पंथी विचारांना प्रोत्साहन व जुन्या तुर्की साम्राज्याकडे देशाला नेण्याचे, तसेच इतर प्रगतिशील विचार संपवण्याचे प्रयत्न असे गंभीर आरोप झाले आहेत.