India

मुलाखत: अस्तित्वाच्या शोधातला समलैंगिक राजकुमार

मानवेंद्रसिंघ गोहिल यांची मुलाखत

Credit : facebook

आजपर्यंत तुम्ही अनेक राजा-महाराजांच्या बद्दल ऐकले असेल, पण हा जरा वेगळा आहे. हा राजकुमार मूळचा गुजरातचा राजपिपला भागातला. अंगाने सडपातळ आणि ऊंच हया राजाला मोठ-मोठया मिश्या नाही, रंगाने सावळा वय झाल्यामुळे मनक्यातुन हलकासा वाकलाय पण त्याचे साम्राज्यापेक्षा समाजावर प्रेम, राहनीमान आणि पोशाख मात्र याचा राजासारखा पण मुंबईत असताना मोत्याच्या माळा आणि दागिन्याचे वजन याच्या गळयात दिसत नाही, गुजरातमध्ये राजवाड्यात असला की परंपरेप्रमाणे साज असतो अंगावर.

या राजकुमाराचे नाव मानवेंद्रसिंह गोहिल. २३ सप्टेंबर १९६५ ला यांचा जन्म झाला.  महाराना रघुवीर सिंह राजेंद्र सिंह आणि महारानी रूकमिनी देवी या दोघांचा हा पुत्र. पण या दोघांनी कधीही त्याला सामान्य लोकांमध्ये तसेच 'खालच्या' जातीच्या लोकांमध्ये मिसळू दिले नाही. वयात येतायेता मानवेंद्रला कळाले की तो समलैंगिक आहे आणि १४ मार्च २००६ ला त्याने तसे सर्वांसमोर घोषित केले आणि ही बातमी गुजरातच्या सर्वच वर्तमान पत्रातून राज्यात आणि देशात पसरली. तिथून सुरु झालेला प्रवास आणि मग त्याची समलैंगिक समाजबद्दलची जाणीव हया मुलाखतीद्वारे मांडली आहे.

 

तुम्हाला कधी कळाले की तुम्ही समलैंगिक आहात आणि तो काळ कसा होता?

मी एका राजघराणयात जन्माला आलो होतो , त्यामुळे माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नियम, बंधने  होती, माझी खुप काळजी घेतली जात होती. मला समाजाला माझ्याबद्दल सांगायचे होते आणि या सर्व बंधनातून मुक्त व्हायचे होते, मी लहानांपासून जसजसा मोठा होतहोतो, तसतसे माझे आकर्षण इतर मुलांकडे, पुरूषांकडे होत होते पण मला या आकर्षणाचे नाव माहित नव्हते. मी गे आहे का? मी कोण आहे असे अनेक प्रश्न मला पडत होते. मला स्वतःला स्वतः चे लिंग ओळखता येत नव्हते. तसेच भारतात आणि राजघराण्यात सदैव स्त्री-पुरुष विभाजन झाले आहे. मग ते राहण्यापासुन ते मोकळा वेळ घालवण्यात आपण सदैव दोन गट पाडले आहे. आपल्या देशात लोकांना सोशल होमोफोभिया आहे , ऊदा. कित्येक राजघराण्यात आणि राजवाड्यांमध्ये स्त्रीयांच्या जागा वेगळया आहेत आणि पुरूषांच्या वेगळया. दोघांना एकमेकांच्या हद्दीत जायला बंदी असते, तसेच लोक दोन पुरूषांना किंवा दोन महिलांना एकत्र बघुन कोणी काही बोलत नाही, पण एक पुरुष आणि एक महिला एकत्र दिसले की आक्षेप घेतला जातो. 

लहान पणी आणि वाढत्या वयातल्या काळात माझी काळजी पुरुष कामगारांनीच घेतली आणि त्या गोष्टींचा मला लळा लागला, मला पुरुषांबद्दल आकर्षण होते. जेव्हा जेव्हा  ते मला स्पर्श करायचे तेव्हा तेव्हा मी खुलुन जायचो, आमच्यात कालांतराने शारीरिक संबंध सुध्दा झाले. पण या सर्व अनुभवाला समलैंगिक संबंध म्हणतात हे मला माहिती नव्हते कारण हे माझ्यासाठी सामान्य होते, पण कालांतराने मला कळाले मी जे बालपणात केले त्याला समलैंगिकता म्हणतात आणि हे मला ऊशिराच कळाले.

 

तुम्ही या राजघराण्याचे एकलुते एक वारसदार! तसेच राजघराण्यात जन्म घेणे किंवा जन्म झाला की वेगवेगळ्या परंपरा, प्रथा अंगावर लादल्या जातात, या सर्व गोष्टींना तुम्ही कसे तोंड दिले?

माझे आयुष्य जरा वेगळेच होते. एक तर माझा जन्म राजघराण्यातला आणि सामान्य माणसाला आमच्या घराकडुन अनेक प्रकारच्या अपेक्षा होत्या. लोक आमच्याकडे त्यांचे प्रतिक म्हणून पाहत होते. तसे पाहता आता आमच्या पदाला आता काही वैधता नाहीये पण तो सर्व आमच्या ईतिहासाचा भाग आहेच. राजघराणं हे पुर्वजांपासुन माझ्यापर्यंत चालत आल होत. आमची वंशावळ तसं पाहता खूप जुना भारतीय राजवंश आहे. १३व्या शतकात आमच्या राजवंशाची सुरुवात झाली, म्हणजे ६०० वर्षाहुन जास्त आमचा ईतिहास आहे. ही सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर येणार होती, आणि हा इतिहास आणि वंशावळ घेऊन मला समाजात वावरायचे होते. अशा वेळी समाजासमोर स्वतःच्या समलैंगिक अस्तित्वाला घेऊन बाहेर येणं ही माझ्या आयुष्यातली एक मोठी गोष्ट होती.

खाजगीत समलैंगिकता आणि दुसरीकडे राजेशाही अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची आयुष्यं एकावेळी जगायला मी सुरुवात केली होती. असे जगताना खुप काही गोष्टी हातातून निसटून जात होत्या. मी राजघराण्याच्या अनेकश्या प्रथा, परंपरा मोडल्या. राजघराण्याचे नियम मोडले. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बद्दलला कारण मला दोन्ही प्रकारचे आयुष्य जगायचे होते. म्हणून आता जेव्हा मी समलैंगिक किंवा लोकांच्या भाषेत 'गे' आयुष्य जगतो तेव्हा मी विसरून जातो की मी राजघराण्यातुन आहे आणि जेव्हा मी राजेशाही आयुष्य जगतो तेव्हा मी विसरुन जातो कि मी 'गे' आहे. हे सर्व आव्हानात्मक आहे , पण मला दुसरा पर्याय नाही.

 

आता समाजात समलैंगिकतेकडे थोडेफार समजूतदारपणे पहिले जात असले तरी त्यावेळी हा संवाद शक्यच नव्हता. अशावेळी तुम्ही समाजाला कसे सामोरे गेलात?

जेव्हा मी उघडपणे माझ्या समलैंगिकतेबद्दल सांगितले तेव्हा खुप वाद-विवाद झाले. एकतर मी जगातला पहिला समलैंगिक राजकुमार होतो. लोकांना जेव्हा माझ्याबद्दल कळाले, तेव्हा त्यांना धक्का बसला. लोकांच्या मते समलैंगिकता ही काही विशिष्ट वर्गांमध्येच असावी अशी समजूत होती. एका 'उच्चकुलीन' व्यक्तीचं समलैंगिक असणं हे त्यामुळे त्यांना पचवणं अवघड गेलं. हा त्यांना धक्काच होता, मग एकदमच लोक माझ्या विरुद्ध झाले. माझा निषेध करु लागले.

त्यांच्या मते, मी घराण्याची नव्हे तर संस्कृतीची लाज घालवली. मी समाजाचा अपमान केला. त्यांच्या निषेधात त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या, मला समाजातुन हाकलून दिले पाहिजे, वाळित टाकले पाहिजे, राजघराण्यातुन बेदखल केले पाहिजे, माझ्यावर बहिष्कार टाकला पाहिजे अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकिय प्रकार समाजाने माझ्या निषेधात केला. माझे चित्र, पुतळेसुद्धा जाळले समाजाने. 

माझ्या स्वतः च्या पालकांनी निषेध केला, माझ्याबद्दलचा राग वर्तमानपत्राद्वारे  जाहिराती बातम्या देऊन व्यक्त केला. त्यांनी चक्क अशी बातमी दिली होती की 'आम्ही मानवेंद्रला राजघराण्यातुन काढुन टाकले आहे, राजघराण्याच्या आणि पुर्वजांच्या ईस्टेटीवर त्याचा काही हक्क नाही, आम्ही त्याला नाकारले आणि सर्वानी त्याला नाकारले पाहिजे. पण मी सगळ शांतपणे अंगावर घेतल, माझ्याबद्दल केलेल्या गोष्टींचा मला राग नव्हता, पण समलैंगिकतेकडे पाहण्याच्या आडमुठ्या दृष्टिकोनावर माझा राग बसला होता. कालांतराने मी लोकांना शिकवू लागलो, समलैंगिक समाजाचे अस्तित्व सांगू लागलो आणि मग जे लोक माझ्याविरुद्ध उभे होते ज्यांना होमोफोभिया होता, त्यांनी मला आणि समलैंगिकांना पाठिंबा देण्यास सुरुवात केले आणि मला आहे तसे मान्य केले.

 

यावर्षी तुम्हाला न्युयाँर्कच्या प्राईड मार्चला अतिथी म्हणून बोलावले होते, तसेच मागील काही वर्षापासून तुम्ही मुंबई प्राईड मार्चला उपस्थिती दाखवत आहात. तुम्ही या दोन्ही प्राईडला कसे बघतात आणि या दोन शहरात कोणतीप्राईड तुम्हाला जास्त सक्रिय वाटते?

अमेरिकन एलजीबीटी चळवळ १९६९मध्ये सुरू झाली , म्हणजे जवळजवळ ४०-५० वर्षाआधी. मुंबईत चळवळ १९९० च्या मध्यांतरास सुरुवात झाली, याच काळात भारतात एचआयव्ही आला. भारत सरकारच्या एचआयव्ही प्रतिबंधांच्या प्रयत्नात समलैंगिकतेबाबत सतर्कता निर्माण झाली आणि एचआयव्ही जणु काही एलजीबीटी समुदायासाठी उजाळा देणारा ठरला. भारतीय चळवळीला २५ वर्षे पुर्ण झाली. 

आपल्या देशात असा कोणताही कायदा नाही की समलैंगिक 'असणे' म्हणजे गुन्हा ठरेल मात्र अमेरिकेत आहे असे मी बोलतो कारण अमेरिकेची धार्मिकता सनातनी ख्रिस्ती आहे आणि तिथे बऱ्याच प्रमाणात होमोफोभिया दिसतो. अमेरिकेत ओबामा पंतप्रधान असताना समलैंगिक विवाहांना मान्यता मिळाली पण ट्रान्सजेंडरच्या बाबतीत त्यांचा अजूनही संघर्ष आहे  याउलट भारताने २०१४ मध्ये ट्रान्सजेंडरना अधिकार दिले. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत शस्त्र ठेवण्याचा परवाना पठकन मिळतो आणि तेथील लोक खुपच हिंसक आहेत. होमोफोभिया असल्यामुळे तेथील लोक एलजीबीटी सामुदायावर हल्ले करतात, अत्याचार करतात, शस्त्रानी जीवे मारतात, पण भारतात असे नाही. होमोफोभिक लोक भारतातपण आहेत, पण भारतात हिंसा खुप कमी आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे आपले संविधान जे धर्म-जात, वर्ग, वंशवाद, पंथ हयांचा विचार करून लिहीले आहे, यात प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि मी नशिबवान आहे की मी असे संविधान असलेल्या देशाचा नागरिक आहे.

आपल्याकडे समलैंगिकतेला संस्कृतीचा वारसा देखील आहे. वात्स्यायनाचा 'कामसुत्र' नावाचा ग्रंथ आपल्याकडे आहे, तसेच आपल्याकडे खजुराहो आहे. आपल्या देशातल्या मंदिरांवर समलैंगिक संबंधांचे चित्रण असणारे कोरीवकाम, नक्षीकाम आहे. अमेरिकेच्या संस्कृतीत असे काहीही घटक नाही जी त्यांना सांगु शकेल की समलैंगिकता त्यांच्या इतिहासाचा, संस्कृतीचा भाग आहे.

rajkumar

लक्ष्य ट्रस्ट नावाची एक संस्था तुम्ही चालवत आहात, ही संस्था नेमके काय आणि कोणासाठी काम करते?

लक्ष्य ट्रस्ट आम्ही १९ वर्षापूर्वी स्थापन केले, स्थापन करण्यामागचा हेतू होता की लोकांना एक मंच, एक माध्यम मिळावे त्यांच्या गोष्टी सांगण्याकरता, तसेच समलैंगिक लोकांच्या समस्या कशा सोडवता येतील, त्यांना एकत्र कसे करता येईल, त्यांच्यावर असलेले लग्नाचे दबाव, होत असलेला किंवा झालेला छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव, अपमान, एचआयव्हीच्या समस्या आणि वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचे काम लक्ष ट्रस्ट करते. महत्त्वाचे म्हणजे एचआयव्ही पसरु नये तसेच एलजीबीटी समुदायाचे सशक्तिकरण करण्याचे काम आम्ही करत आहोत.

आता आम्ही एचआयव्ही चाचणी आणि त्यावरचे उपाय ट्रस्ट मध्ये सुरु केले आहे. एलजीबीटी समुदायातील ८०% लोक दबावखाली येवुन लग्न करतात त्यांच्या समस्या आम्ही सोडवत आहोत. आम्ही मानसिक समस्यांवर उपाय करण्याचे प्रयत्न करतो. महिलांवर होणारे हिंसाचार थांबवण्यासाठीही आम्ही कार्यरत आहोत. मग त्यात महिला, लेस्बियन महिला किंवा ट्रान्सजेंडर पुरुष यांच्यावर होणारा हिंसाचार आणि अत्याचार थांबवण्याचे आणि त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम आम्ही करत आहोत. गुजरात मध्ये आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड बनवला आहे. त्याद्वारे गुजरातमधील ट्रान्सजेंडर समूहाच्या सामाजिक कल्याणाचे काम सुरु आहे.

 

तुमच्या राजवाडयावर पँलेसवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तुम्ही मनभरुन स्वागत करता, त्यात वेगवेगळ्या लिंगभावाचे लोक असतात, तसेच तुम्ही त्यांना समाजात स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यास आणि समलैंगिकतेवर टिकून राहण्यास मदत करता...

मला समुदायाच्या लोकांबद्दल जाणीव आहे आणि ही जाणीव मला भुतकाळातील घटनांमुळे झाली आहे. मला स्वतःच्या घरच्यांनी घराबाहेर काढले, समाजाने बहिष्कार ठाकला, जे माझ्यासोबत झाले ते समाजातील कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ शकते, आणि या सर्व गोष्टिंचा विचार करुन मी एलजीबीटी समुदायातील व्यक्ती साठी एक 'कँम्पस' बनवायचे ठरवले, जिथे ते त्यांच्या हक्काच्या घरात राहतात असे राहतील. माझ्या घरी येणाऱ्या लोकांचे मी आनंदाने स्वागत करतो कारण त्यांनी समाजाकडून त्रास सहन केलेला असतो आणि मी त्यांचा कोणी आपला आहे म्हणून ते माझ्या घरी येत असावे. ते मला आपल मानतात याचा मला आनंद होतो आणि मी त्यांचे आदराने स्वागत करतो. माझ्याकडे आलेल्या लोकांना मी पुन्हा एकदा सामाजिक आणि आर्थिक बाजूनी त्यांच्या पायावर पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतो. 

 

तुमची राजकीय मते काय आहेत. तुम्हाला आत्ताच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत समूहाच्या हिताच्या दृष्टीने?

माझी एकदम साधी मागणी आहे सरकारकडे. त्यांनी फक्त भारताचे संविधानाचे अनुसरण केले पाहिजे, तसेच सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले पाहिजे. आपण जर नीट पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की भारताची नियोजन करण्याची पद्धत चांगली असते पण अंमलबजावणी मध्ये आपली परिस्थिती बिकट आहे. माझी एकच मागणी आहे जेवढ्या योजना बनवल्या गेल्यात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे , त्यामुळे समानता येईल. आम्हाला समूह म्हणून कुठलेही आरक्षण नको आम्हाला फक्त संविधानात लिहिल्याप्रमाणे समान हक्क हवेत, आम्ही पण भारताचे लोक आणि आम्हाला पण सर्वांसारखे सन्मानाने जगायचे आहे.

 

हरिश अय्यर यांनी लोकसभा निवडणूकिच्या काळात काँग्रेस पक्षात अधिकृतपणे पदारपण केले, यावर तुमचे मत काय? तुम्हाला जर राजकारणात प्रवेश करायचा असेल तर तुमचा कल कोणत्या पक्षाकडे असेल?

राजकारणाबद्दल मी खुप न्यूट्रल आहे. मी कोणत्याही राजकिय पक्षाच्या बाजुने नाही. पण पक्षाच्या व्यक्तीचे मी समर्थन करतो, मग तो काँग्रेस, भाजप, आप, शिवसेना किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असो, जो व्यक्ती माझ्या आणि माझ्या समाजाच्या, समलैंगिकांच्या समस्या जाणतो त्यांना सोडवतो त्याचा मी समर्थक आहे, पण त्यांच्या पार्टीचा नाही. माझे  वेगवेगळ्या पक्षात मित्र आहेत आणि त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आहे. राजकारणी लोकांना माहिती आहे की एलजीबीटी समुदायचे नेटवर्क मजबूत तर आहे आणि त्यांची ताकद पण चांगलीच आहे. सगळयांना माहिती आहे आमचे नेटवर्क हेट्रोसेक्शुलपेक्षा जास्त फास्ट आहे. राजकारणी निवडणुकांच्या काळात मला भेटायला येतात. मी त्यांच्याबद्दल लोकांना प्रचार करण्याची मदत हवी असते, तसेच मी त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करतो, आणि त्याबदल्यात एकच बोलतो जेव्हा जेव्हा त्यांची मला मदत हवी असेल तेव्हा तेव्हा त्यांनी मला समूहासाठी मदत करायला हवी कोणतीही अडचण न करता.

 

जुन महिना हा प्राईड महिना म्हणून साजरा केला जातो. या वर्षी अनेक खासगी कंपन्यानी एलजीबीटी समुदायासाठी समर्थन दाखवले, तसेच त्यांच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि वेबसाईटवर ईंद्रधनुष्याचे झेंडे लावले होते, पण जसा महिना संपला तसे सगळ्याच कंपन्या सगळे काही विसरून पुन्हा आधीसारखे होतात यावर तुमचे काय मत आहे?

इंद्रधनुष्याच्या झेंडा एक एलजीबीटीक्यू चळवळीचे प्रतीक आहे. समाजात वेगवेगळ्या समुदायासोबत समलैंगिक समाज आहे हे या झेंड्यावरुन दिसते. आपल्या देशात स्वतःच्या देशाचा झेंडा संपूर्ण दिवस फडकत ठेवु शकत नाही,मग तो कितिही मोठा देशभक्त असो. माझ्या घरी, माझ्या महालावर इंद्रधनुष्याचे रंग असलेला मोठा झेंडा २४/७ फडकत असतो. माझे असे एकच घर आहे गुजरातमध्ये ज्याच्या घरावर एलजीबीटी समुदायाचा झेंडा आहे आणि तो एकदम उंच छतावर आहे सहज कुठुनही नजरेस पडेल असा. माझ्या घरावरच झेंडा लोकांना सांगत आहे की इथे समलैंगिकता स्वीकृत आहे आणि याचा मला अभिमान आहे.

 

तुम्हाला असे वाटते का की एलजीबीटी चळवळीने पुढे भविष्यात जातिविरुद्ध आणि वर्गव्यस्था विरूध्द लढा देणाऱ्यांशी हात मिळवून एकत्र काम केले पाहिजे? 

होय! असे झाले पाहिजे. एलजीबीटी समुदायाने बाकि शोषित समुदायांशी जुळवून घेतले पाहिजे, ज्यात दलित,आदिवासी, अंपग व्यक्ती, ज्यात मागासवर्गीय आणि ईतर लोक येतात, असे जेवढे जास्त सहयोगी आपण तयार करु तेवढ्या या सर्व समुदायाला मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. एलजीबीटी समुदायाने जात आणि वर्गव्यवस्था हयांच्या विरोधात लढ देणाऱ्यांशी हात मिळवला तर आम्ही त्यांच्या आणि ते आमच्या समस्या समजुन घेतील, सहयोग आणि मनुष्यबळ जास्त मिळेल आणि सर्वांचा विकास होईल.