India

जागावाटपापेक्षाही काँग्रेसने संघाला संवैधानिक विरोध करावा ही आमची मागणी : प्रकाश आंबेडकर

इंडी जर्नल इन फोकस: प्रकाश आंबेडकर

Credit : इंडी जर्नल युट्युब

देशात अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वर्तुळात युती, आघाडी, राजकीय समीकरणं, एक्झिट पोल्स या साऱ्यावर तुफान चर्चा गल्लीतल्या चहाच्या टपरीपासून ते दिल्लीतल्या रायसिनाच्या गोटात झडत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  ‘वंचित बहुजन आघाडी’च्या माध्यमातून स्वायत्त आंबेडकरी राजकारणाची पायाभरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा देशाच्या राजकीय घडामोंडीमधला एक महत्वाचा भाग आहे.

आंबेडकरी समाज, मुस्लीम समाज ते लहान लहान जातसमूहांच्या एकत्र येऊन राजकीय संघर्ष करण्याचं एका बाजूला मोठ्या प्रमाणावर कौतुक होतंय तर दुसऱ्या बाजूला या आघाडीवर पुरोगामी मतं विभाजित करण्याचा आरोपही काही वेळा करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी इंडी जर्नलला दिलेल्या या मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीची राजकीय गरज, निर्मितीप्रक्रिया, युतीबाबत त्यांची कॉंग्रेस, डाव्या पक्षांबाबत असलेली भूमिका, धनगर - आदिवासींमधला आरक्षणावरुन निर्माण करण्यात आलेला तिढा यावर भाष्य केलं. आदिवासींच्या नेमक्या समस्या - आदिवासींसाठी असलेल्या बजेटमधला घोटाळा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आघाडीच्या जाहीरनाम्यात काय असणार आहे इ. गोष्टींवर त्यांनी नेमकं भाष्य केलं आहे.

संपूर्ण मुलाखत पहा

सोबतच, इंडी जर्नलचे युट्युब चॅनेल 'इंडी व्हिज्युअल' ला सबस्क्राईब करायला विसरू नका.