India

व्यापार आणि वाहतूक व्यवसायातील संघटनांतर्फे उद्या भारत बंद

उद्या २६ फेब्रुवारी रोजी देशभरातील वाणिज्य आणि वाहतूक संबंधी घडामोडी मंदावणार आहेत.

Credit : PTI

उद्या २६ फेब्रुवारी रोजी देशभरातील वाणिज्य आणि वाहतूक संबंधी घडामोडी मंदावणार आहेत. वाढत्या पेट्रोल किमती, वस्तू सेवा कर, तसंच सरकारनं ई-वे संदर्भात आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात देशभरातील चाळीस लाख ट्रक शुक्रवारी कडकडीत बंद पाळनार आहेत.

भारतभरातील व्यापार व्यवसायासाठी काम करणाऱ्या संघटना तसंच कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. ऑल इंडिया ट्रान्स पोर्ट वेलफेअर असोसिएशन संस्थेनं या बंदला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

२६ फेब्रुवारी रोजी देशभरातील शहरांमध्ये चक्का जाम करण्याचं तसंच विविध प्रकारच्या आंदोलनांचं आयोजन संघटनेनं केलं आहे. देशभरातील वाणिज्य विषयक कामं करणाऱ्या संस्था यावेळी बंद राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खाजगी वाहतूक तसंच दळणवळणाच्या सोयींवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील विविध १,५०० ठिकाणी धरणे आणि बंद तसंच निषेध सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. वस्तू सेवा कराच्या स्वरूपात काही मूलभूत बदल करण्यात यावेत तसेच इंधनाच्या किमतीत वाढ झाली असल्यानं सरकारनं त्यावर ठोस पाऊल उचलावं, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

मुदत संपली असलेल्या ई बिलाला घेऊन जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या चालकांना ठोठवल्या जाणाऱ्या दंडात नव्या कायद्यानुसार वाढ करण्यात आली असल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे. २०१७ या वर्षात वस्तू सेवा कराच्या स्वरूपात ही तरतूद करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून खाजगी वाहतूक करणाऱ्या चालकांना व वाहनांवर भुर्दंड पडणार आहे.