India

ऐका: देशाच्या एकमेव शहरी जंगलाला वाचवण्याचा लढा, आरे!

ऐका कशी लढली गेली आरे वाचवण्याची लढाई, त्यातील सहभागी कार्यकर्त्यांसोबत.

Credit : Shubham Patil

तुम्ही हा रिपोर्ट इंडी रेडियोवर देखील ऐकू शकता.

 

मुंबईच्या आरे जंगलाचं वैशिष्ट्य हे, की ते भारतातील एकमेव शहरी जंगल आहे. शेकडो हेकटरवरती पसरलेल्या या जंगलात अनेक वन्य जीव आणि जैवव्यवस्था अस्तित्वात आहेत. २०१९ मध्ये या जंगलावर मोठं संकट ओढवलं होतं, ते म्हणजे इथं होऊ घातलेल्या मेट्रो कारशेडचं. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं स्थानिकांच्या, आरेमधील आदिवासींच्या तसंच राज्यच नव्हे तर देशभरातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या विरोधाला, आंदोलनांना न जुमानता, कारशेड आरेमध्येच होणार, हा त्यांच्या निर्णय पुढं रेटला. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं कारशेडची जागा बदलली, आणि कांजूरमार्गमधली जमीन त्यासाठी निश्चित केली. मात्र गुरुवारी आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदांची शपथ घेतल्या घेतल्या काही तासांतच मेट्रो कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा तेच संकट आरेवर येऊ घातलंय. ऐका हे जंगल वाचवण्याची लढाई पहिल्यांदा कशी लढली गेली, त्यातील सहभागी कार्यकर्त्यांसोबत.

वार्तांकन: प्राजक्ता जोशी
संपादन: प्रथमेश पाटील

ऐका इंडी रेडियोचा ऑडिओ रिपोर्ट: