India

Exclusive: भीमा कोरेगाव खटल्यात कैद सागर गोरखे यांचं आमरण उपोषण

तळोजा कारागृह प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीसंदर्भात गोरखे यांचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र.

Credit : इंडी जर्नल

कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सागर गोरखे यांनी तुरुंगात मिळणाऱ्या अपमानास्पद आणि मानवाधिकारांचं हनन करणाऱ्या वागणुकीविरोधात आमरण उपोषण सुरु केलं आहे. तुरुंगात होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध तसंच मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या लढ्याला वाचा फोडण्यासाठी गोरखे यांनी हे उपोषण सुरु केल्याचं म्हटलं आहे. सप्टेंबर २०२० पासून एल्गार परिषद-भीमा कोरगाव प्रकरणी ते मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. २० मे रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून त्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. २० मे रोजी अचानकपणे गोरखे यांच्या तुरुंगातील सेलची नेहमीच्या व्यतिरिक्त वेगळी झडती घेऊन, धाक दाखवून त्यांच्या स्वतःच्या मालकीची मच्छरदाणी कारागृह कर्मचाऱ्यांनी जप्त केल्याची तक्रार त्यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. तुरुंगात डासांमुळं वेगवेगळ्या आजारांची शक्यता असूनदेखील आणि वैद्यकीय दिरंगाई दाखवली जात असूनही गोरखे यांची मच्छरदाणी काढून का घेण्यात आली, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. 

कारागृहात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल गोरखे यांनी २० मे रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहिलं होतं, जे इंडी जर्नलकडे आलं आहे. या पत्रात गोरखे यांनी तुरुंगातील परिस्थितीचा उल्लेख करत, त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. पत्राचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे. 

महोदय,

अत्यंत खेदपूर्वक कळवू इच्छितो की, मी अर्जदार सागर तात्याराम गोरखे, एल्गार परिषद भिमा कोरेगाव खटल्यातील एक राजकीय बंदी असनू मागील कित्येक महिन्यांपासनू तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. जसेकी एल्गार परिषद खटल्यातील बंद्यांप्रती कारागृह प्रशासन पूर्वीपासून पर्वूग्रर्वहदूषित मानसिकतेने व्यवहार करीत आहे. परिणामी मी व माझ्या सहआरोपींसाठी कारागृह छळछावणी बनलेली आहे. जसेकी आपण जाणताच की कारागृह प्रशासनाच्या छळवणुकीमुळे मागील वर्षी फादर स्टॅन स्वामी यांचा कोठडी मृत्यू झालेला आहे. आजही कारागृहात आमच्या मानवी अधिकारांची पायमल्ली राजरोस सरूु आहे. सदर परिस्थिती माझ्यासाठी इतकी भयानक झाली असनू छळवणुकीमुळे मला आज आमरण उपोषणाचा वेदनादायी मार्ग अवलंबावा लागत आहे. फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूला एक वर्ष होत आल्याच्या पार्श्वभूमीवर या वेदना आणि छळवणुकीचा पाढा मला वाचावा लागत आहे, याचे खूप वाईट वाटत आहे. मी स्वतः पाठदुखी, सांधेदुखी, त्वचेची एलर्जी यासारख्या विकारांनी प्रचडं त्रस्त असनू मला कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कसलाही वैद्यकीय उपचार मुद्दामहून दिला जात नाही. कारागृह अधीक्षक वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वैद्यकीय सेवा देण्यासाठी आडकाठी करत आहेत. परिणामी मी अतिशय त्रासात आहे. न्यायालयाने बाह्यरुग्णालयात उपचारासाठी पाठवणे सदंर्भात आदेश देवनूही अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. माझे सहआरोपी गौतम नवलखा, रमेश गायचोर, सुधीर ढवळे, महेश राऊत, उठते, सुरेंद्र गडलिंग, आनदं तेलतुंबडे तथा हनी बाबू हे विभिन्न गंभीर आजारांनी त्रस्त असनू या सर्वांना उपचार करण्यास जाणीवपूर्वक हयगय केली जात आहे. नातलग व वकीलांमार्फत देऊ केलेली औषधे (खासकरून आयुर्वेदिक) स्वीकारली जात नसनू सर्व प्रकारे कोंडी केली जात आहे.

मागणी क्र.१: कृपया मला व माझ्या सर्व एल्गार खटल्यातील सहआरोपी बंद्यांना त्वरित वैद्यकीय सुविधा देण्यात यावी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केले प्रकरणी कारवाई करण्यात यावी.

मी व माझ्या सहआरोपींनी पाठवलेले प्रत्येक पत्र बेकायदेशीरपणे स्कॅन करून कारागृह अधिक्षकांमार्फत तपासी यंत्रणांना पाठवण्यात येते. घटनेने दिलेल्या खाजगीपणाच्या अधिकाराची व कायद्याने घालनू दिलेल्या नियमांची उघड पायमल्ली करून कारागृह प्रशासन गुन्हा करीत आहे. येणारे प्रत्येक पत्र माझ्यासमोर उघडण्याऐवजी फोडून Unseal करून देण्यात येते. परिणामी पत्रातील सोबत असलेली सहपत्रे, पुस्तके, टपाल तिकिटे काढून घेऊन बेमालमूपणे चोरले जातात. तसेच जाणारे पत्र माझ्यासमोर seal करण्याऐवजी तसेच स्कॅनिंग  करिता पाठवले जाते.

मागणी क्र. २ : अधीक्षकांमार्फत केले जाणारे व तपासी यंत्रणांना पाठविण्यासाठी केले जाणारे स्कॅनिंग त्वरित बदं करण्यात यावे. व सदर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

कारागृह नियमावलीनुसार प्रत्येक बंद्याला १३५ लिटर पाणी मिळणे आवश्यक असनू अकार्यक्षर्यम तळोजा म. कारागहृ प्रशासनामार्फत प्रत्येक बंद्याला एक बादली पाणी म्हणजेच केवळ १५ लिटर पाणी पुरवण्यात येते. तुरुंगात अधिकाऱ्यांमार्फत अक्षरक्षः पाणी तटुवडा करून पाणी विक्री केली जाते. केवळ १५ लिटर पाण्यात बंद्यांनां जगण्यास बाध्य केले जात असनू परिणामी कारागृहातील बॅरेक्स म्हणजे घाणीचे साम्राज्य झाली आहेत. माझ्यासहीत कित्येक बंद्यांनां त्वचेचे रोग झाले असनू माशा, डासांचे भर उन्हाळ्यात प्रमाण वाढले आहे.

मागणी क्र. ३ : कारागहृात पाण्याचा कृत्रिम तटुवडा निर्माण करणे आणि पाणी विक्रीसारखा या अमानवी विकृत प्रकार त्वरित थांबविण्यात यावा व प्रत्येक बंद्यास १३५ लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा व्हावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी.

कारागृहात मुलाखत घेण्यासाठी वकील व बंदी नातलग असे प्रतिदिन ५०० च्या वर नागरिक येत असतात. नाव नोंदणी केल्यापासनू मुलाखत मिळेपर्यंत ५ ते ६ तासांचा कालावधी जुनाट कार्यपद्धतीमुळे लागतो. या वेळेत साधी थांबण्यासाठी/बसण्यासाठी प्रतिक्षालय उपलब्ध नाही. तेथे पिण्याजोगेपाणी, पंखे, इतकेच काय सार्वजनिक शौचालय देखील नाही. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या माझ्या नातलगांसाठी एक मुलाखत घेणे अकार्यक्षम कारागृहापायी प्रचंड त्रासदायक ठरत आहे.

मागणी क्र. ४ : कारागृहाबाहेर त्वरित पक्के बांधकाम असलेले प्रतिक्षालय बांधण्यात यावे. तथा पिण्याचे स्वच्छ पाणी, पंखे, बसण्यासाठी आसनव्यवस्था उपलब्ध करून मुलाखतीची अद्ययावत टोकण यंत्रणा तयार करण्यात यावी.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनामार्फत सर्व प्रकारच्या/वर्गातल्या बंद्यांनां दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मी देखील 'नक्षलवादाच्या' आरोपात बंदिस्त असूनदेखील संपूर्ण करोना कालावधीत कुटुंबियांशी व वकिलांशी फोनवर संभाषण केले आहे. खबरदारीच्या सर्व उपाययोजना करून / फोन नंबरचे व्हेरीफिकेशन करून इतरांप्रमाणेच मला देखील दूरध्वनी सुविधा दिली गेली होती. माझ्यावरील आरोपांचा विचार करूनच मला सुविधा देण्यात आली होती. सध्या मला मिळणारी दूरध्वनी सुविधा बदं करण्यात आली असनू कारण विचारल्यावर कारागृह व सुधारसेवा, अपर पोलीस महासंचालकांच्या (जा. क्र. न्यावि / कॉइन बॉक्स / दूरध्वनी सुविधा / 1411 / 2019 कक्ष- 9 (ब) पुणे-1, दि . 12-02-2019) या परिपत्रकाचा संदर्भ दिला जात आहे. व मुद्दा 3 नुसार - दहशतवादी कारवाया / देशद्रोह / नक्षलवाद / टोळीयुद्ध / संघटित गुन्हेगारी / सराईत गुन्हेगार वगळून' इतर न्यायाधीन बंद्यांनां दूरध्वनी सुविधा देय राहील.' असे सांगितले जात आहे. वस्तुतः कोणताही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणाही व्यक्तीस गुन्हेगार माननू त्याप्रमाणे वागणकू देणे त्या व्यक्तीच्या मानवी अधिकाराचे हनन ठरते. त्यामुळेच जोपर्यंत माझ्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मला वा कोणालाच गुन्हेगार म्हणनू निर्बंधित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे कारागृह व सुधारसेवा यांनी काढलेले उपरोक्त उल्लेखित परिपत्रक न्यायाधीन बंद्यांसाठी अन्यायकारक ठरते.

मागणी क्र. ५ : उपरोक्त उल्लेखित परिपत्रक रद्द करून समान न्यायाच्या तत्त्वानुसार सर्वप्रकारच्या न्यायाधीन व सिद्धदोष बंद्यांना करोना कालावधीत दिलेल्या दूरध्वनी सुविधेप्रमाणेच व्हेरीफिकेशन करून, तसेच गुजरात व तेलंगणा राज्य कारागृह टेलिफोन फॅसिलिटी पॅटर्न नुसार दूरध्वनी सुविधा देण्यात यावी.

मा. महोदय,

उपरोक्त उल्लेखित मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करून, सदर मागण्या मान्य करून 'कारागृह व सुधारसेवा विभागास' आदेश देण्यात यावे, ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी

सागर तात्याराम गोरखे

MB - 335, कक्ष.5

अतिसुरक्षा विभाग,

तळोजा मध्यवर्ती कारागृह

इंडी जर्नलने या पत्राची तपासणी करून हे प्रकाशित केलं आहे.