Quick Reads

नव्या जगासाठी प्रवेगवादी राजकारणाचा जाहीरनामा

The Accelerationist Manifesto चा मराठी अनुवाद

Credit : The Guardian

ऍलेक्स विल्यम्स आणि निक सरनीचेक यांनी मांडलेला प्रवेगवादाचा जाहीरनामा. प्रवेगवाद असं तत्वज्ञान आहे, जे आपल्याला अशा आधुनिक भविष्याकडं ढकलू पाहतं जी आधुनिकता नव-उदारमतवादामध्ये बंदिस्त होऊन संकुचित झाली आहे. हा प्रवेगवादाचा जाहीरनामा खालीलप्रमाणे. 

१. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या सुरवातीला जागतिक समूह एका नव्या भयावह परिस्थितीला सामोरं जात आहे. येणारं संकट हे राष्ट्र, राज्य, भांडवलशाहीचा उदय अणि अभूतपूर्व युद्धांच्या वेळी ज्या धारणा व् संघटनात्मक संरचना निर्माण झालेल्या त्या सगळ्यांचा उपहास करतं. 

२. यामधील सर्वात महत्वाचं संकट म्हणजे आपल्या पृथ्वी नावाच्या ग्रहाची तापमान व पर्यावरणाची रचना कोलमडून पडणं. निसर्गाचं हे अरिष्ट संपूर्ण मानव जातीसाठी धोकादायक ठरत आहे. पर्यावरणाचं हे अरिष्ट आजच्या मानवी समूहासमोरील सर्वात भयावह अरिष्ट असलं, तरीही त्यासोबत इतर कही अरिष्टं मानवी समाजासमोर उभी आहेत. दुर्मिळ संसाधनांचा जो ऱ्हास होत आहे, विशेषतः पाण्याचा व् उर्जेचा जो ऱ्हास होत चालला आहे, त्यामुळं संपूर्ण मानवजातीवर उपासमारीचं संकट येऊ शकतं. याशिवाय, सद्यकालीन आर्थिक व्यवस्थेचा अस्त आणि सततची युद्धं हे गंभीर स्वरुपाचे प्रश्न आज माणसासमोर उभे आहेत. याव्यतिरिक्त, सततच्या आर्थिक अरिष्टामुळं सरकारांनी स्विकरालेली कपातीची आर्थिक धोरणं, सामाजिक सुविधांचं खाजगीकरण, वाढती बेरोजगरी, घटते श्रम-मुल्य इ. प्रश्न मानवी समूहासमोर आज उभे आहेत. उत्पादन प्रक्रियेचं वाढतं यांत्रिकीकरण, बौद्धिक श्रमाचा  वाढता वापर इत्यादि गोष्टी सुध्दा भांडवली अरिष्टाचा भाग आहेत. आजच्या काळात जो ग्लोबल नॉर्थचा मध्यमवर्ग ज्या दर्जाचं जीवन जगत आहे, ते जीवन उद्या या अरिष्टामुळं कुणालाच लाभणार नाही, किंवा परवडणार देखील नाही. 

 

३. या प्रवेगशील अरिष्टाविरोधातील जे राजकारण आज आहे, ते होऊ घातलेल्या विध्वंसाला रोखण्यासाठी अणि भिडण्यासाठी नविन संकल्पना अणि संस्थात्मक उभारणी करण्यासाठी अपयशी ठरत आहेत. जेव्हा आपल्या समोरच्या समस्या गती पकडत आहेत व शक्तिशाली होत आहेत, आपलं राजकारण मात्र कमकुवत होऊन माघार घेत आहे. राजकीय कल्पकतेच्या या अभावानं आपलं भविष्य स्थगित केलं आहे.  

४. १९७९ सालापासून जागतिक राजकीय विचारसरणी ही नव-उदारमतवाद आहे. ही विचारसरणी आपणास जगाच्या सर्वच महासत्तांमध्ये आढळते. पतधोरणाचं अरिष्ट, वित्तीय अरिष्ट, आर्थिक अरिष्ट या सारख्या जागतिक आरिष्टानंतरही नव-उदारमतवाद अधिकच खोलवर रुजत गेला आहे. नवउदारमतवादाचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी नव्याने सरंचनिय समायोजन करत आहे ज्यातून समाजवादी लोकशाही सुविधांमध्ये खाजगी क्षेत्राची आक्रमक घुसखोरी होत आहे. यामुळं निर्माण होणाऱ्या तत्कालीन आर्थिक नुकसान किंवा सामाजिक परिणामांचा किंवा दूरगामी होणाऱ्या परिणामांचा विचार न करता हे केलं जात आहे. 

५. जगभरातील उजव्या विचारसरणीची सरकारं, अ-शासकीय संस्था, कॉर्पोरेट संस्था इत्यादी लोक हा नव-उदरमतवादाचा प्रोजेक्ट पुढे रेटण्यात यशस्वी झालेले आहेत कारण नव-उदारीकरणाच्या या ३० वर्षाच्या इतिहासात डाव्या राजकारणाचा अभाव निर्माण झाला आहे. ३० वर्षांच्या नव -उदारमतवादी कालखंडात, डाव्या राजकारणात कोणताही मूलगामी परिवर्तनक्षम विचार उरलेला नाही आणि त्यांची लोकशाही प्रक्रियेतील लोकप्रियता सुध्दा कमी होताना दिसत आहे. या सगळयाची प्रतिक्रिया म्हणून डावे आपल्या या सामूहिक अरिष्टाविरोधात भाष्य करताना केन्सच्या अर्थशास्त्राकडे परत जाण्याची भूमिका मांडताहेत, परंतु त्यांना हे दिसत नाही की युद्धोत्तर काळात समाजवादी लोकशाहीच्या निर्मितीसाठी जी परिस्थिती कारणीभूत होती, ती परिस्थिती आज उपलब्ध नाही. या काळात आपण सामूहिक फोर्डवादी उत्पादन पद्धतीकडे परत जाऊ शकत नाही. 

या काळात अगदी दक्षिण अमेरिकतेतील नव-समाजवादी  राज्यसंस्था व बोलीवारियन क्रांती, जी त्यांच्या क्षमेतेनुसार सध्यकालीन भांडवलशाहीविरुद्ध लढत असतानाच, ही क्रांतीसुद्धा विसाव्या शतकातील समाजवादाच्या प्रारूपापलीकडे गेलेली दिसत नाही आणि म्हणून ही क्रांती भांडवलशाहीला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे. नव-उदारमतवादातील बदलत्या स्वरूपाद्वारे संघटीत श्रमातच बदल घडताना दिसून येत आहेत. संघटनात्मक पातळीवर संघटित क्षेत्र दृढीभूत होताना दिसत आहे, परंतु नवीन पर्यायी अर्थशास्त्राची निर्मिती करण्यासाठी काही संरचनीय उपाययोजना करण्यात संघटित श्रम असफल होताना दिसत आहे. तसेच हे नवीन बदल उलथवून टाकण्यासाठी एकात्मक संरचना आवश्यक आहे, ती निर्माण करण्यातही असफल ठरत आहे. म्हणून असे श्रम आज काही प्रमाणात कार्यविहीन ठरत आहे. शीतयुद्धाच्या अंतानंतर जन्माला आलेलया नव्या सामाजिक चळवळींना २००८च्या अरिष्टानंतर पुनश्च संजीवनी मिळालेली आहे, या चळवळी सुद्धा नवीन राजकीय धोरण देण्यात अपयशी ठरत आहेत. याउलट या चळवळींची बहुतांश ऊर्जा अंतर्गत थेट लोकशाही  प्रक्रिया व आत्ममग्न स्व-गौरविकारणात खर्च होत आहे व याचसोबत या चळवळी नव्यानं प्रस्थापित होणारा उथळ स्थानिकवाद पुढं रेटत आहेत. 

६. नवीन सामाजिक, राजकीय, संस्थात्मक, आर्थिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे उजव्या विचारांची जी प्रभुत्वाची ताकद आहे, ती पुराव्यानं सिद्ध केलं तरी त्यांची संकुचित कल्पना व सिद्धांतन तशीच रेटत आहे. या अवस्थेत डावा विचार काही प्रमाणात होऊ घातलेल्या आक्रमणांचा विरोध करू शकतो. पण हा प्रकार म्हणजे हिमनगाचे टोक उडवण्यासारखा आहे. जर आपणाला नवीन वैश्विक डावं प्रभुत्व निर्माण करायचं असेल, तर आपल्या भूतकाळात हरवलेल्या भविष्याच्या शक्यतांना नव्यानं हस्तगत करावं लागेल व त्याचसोबत एकूणच भविष्याला कवेत घ्यावं लागेल. 

 

मध्यांतर: प्रवेगवादासंबंधात आणखी 

१. भांडवली व्यवस्था ही एकच अशी व्यवस्था आहे जी प्रवेगाशी संबंधित आहे. भांडवलशाहीची मूलभूत प्रक्रिया आर्थिक विकासावर आधारित आहे, त्याचसोबत व्यक्तिगत भांडवलदारांमधील स्पर्धा आणि आणि तंत्रज्ञानात्मक विकास याद्वारे भांडवलशाही स्वतःचा स्पर्धात्मक फायदाही करून घेत आहे. तिच्या नव-उदारमतवादी अवतारात ती स्वतःला ऊर्जेच्या सर्जनशील विध्वंसाला मुक्त करण्याद्वारे प्रकट करत आहे. व त्याचसोबत सर्वच तंत्रज्ञानांना व सामाजिक शोधांना प्रवेगीत करत मुक्त करत आहे. 

२. निक लँड या तत्ववेत्त्याने भांडवलाचं हे वरील स्वरूप जाणलं आहे व त्यानं असंही म्हटलं आहे, की भांडवलाची गती हीच जागतिक अवस्थांतराला तंत्रज्ञानात्मक जोड देऊन एकत्वाकडे घेऊन जाईल. यामधील मूळचे मुद्दा म्हणजे लँड यांचा नव-उदारमतवाद हा  वेगाला/गतीला प्रवेग मानण्याची चुक करतो. आपण वेगानं विकसीत होत आहोत, परंतु हे भांडवलाच्या निश्चित मर्यादित धारणेनुसार विकसित होणं आहे आणि भांडवलाची ही धारणाच मुळात डळमळीत आहे. आपण फक्त स्थानिक किंवा तात्काळ दृष्टिक्षेपात वेग वाढताना अनुभवत आहोत, जे मृतप्राय मेंदूनं एखादा तात्पुरता उत्साह अनुभवण्यासारखं आहे. भांडवलाचा हा वेग, प्रवेगानं अथवा निश्चित उद्देशानं निर्धारित नाही, त्यामुळं उपलब्ध विश्वातील नव्या शक्यतांबद्दल प्रयोगात्मक प्रक्रियेचा अभाव आढळून येतो. आम्ही असं मानतो, की प्रवेगाला निश्चित धारणा आहे आणि प्रवेगानं उपलब्ध विश्वातील शक्यतांना घेऊन नव्या शक्यतांचा शोध लावावा हा विचार प्रवेगाचा मूळ गाभा आहे.    

३. याहून वाईट हे आहे की डेल्युज आणि गुटारी यांनी सांगितल्या प्रमाणे भांडवल एका बाजूला जे मुक्त करतं, ते त्याचवेळी दुसऱ्या बाजूला बंदिस्त देखील करतं. विकास हा अतिरिक्त मूल्य, श्रमिकांची आरक्षित कुमक आणि भांडवलाचा मुक्त संचार एवढ्यातच संकुचित केला जातो. संरचनात्मक आधुनिकतेला आर्थिक विकासात घटीत केलं आहे आणि सामाजिक संशोधनाला आपण आपल्या जुनाट सामूहिक इतिहासाच्या उथळ संकल्पनांनी मर्यादित केलं आहे. थॅचर-रीगन यांचा निर्बंधहीनतेचा मार्ग व्हीकटोरीयन पारिवारिक व धार्मिक मान्यतांमध्ये सुस्थापित होतो.

४. आपल्या समोरील गहण प्रश्न म्हणजे: नव-उदारमतवादाचं स्वतःला आधुनिकतेचा वाहक माननं आणि स्वतःला आधुनिकतेच्या समान मानणं आणि कधीच शक्य न होणारी स्वप्नं दाखवणं हे आहे. नव-उदारमतवाद विकसित होतोय असं दिसत असलं तरीही प्रत्यक्षात मात्र हा विकास व्यक्त योगात सर्जनशीलतेला बढावा देताना दिसत नाही. याउलट नवउदारमतवाद बौध्दिक नाविन्यता, पूर्वेकडील नव-फोर्डवादी उत्पादनव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. नव-उदारमतवाद  स्वतःला जरी गरजेची ऐतिहासिक अवस्थता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असली तरीही प्रत्यक्षात मात्र १९७० मध्ये निर्माण झालेल्या मूल्याच्या अरिष्टाचं आकस्मिक पाल्य आहे. नव-उदारमतवाद हा मुळात सत्तरच्या अरिष्टाचं उच्चाटन नसून ते या अरिष्टाचे परिवर्तित रूप आहे. 

५ प्रवेगवादाचा लँडव्यतिरिक्त खऱ्या अर्थानं मूलभूत विचारक हा खरंतर मार्क्स आहे. आपण मुळात हे समजून घेतले पाहिजे की मार्क्सनं जग बदलण्यासाठी आणि समजण्यासाठी अतिप्रगत सैद्धांतिक तंत्रांचा वापर केला आहे. मार्क्स हा आधुनिकतेला विरोध करणारा तत्ववेत्ता नसून मार्क्स हा आधुनिकतेच्या विषमतेचं विश्लेषण करून त्या विषमतेत हस्तक्षेप करू पाहणारा तत्त्ववेत्ता आहे. त्याला हे समजत होतं की, भांडवलशाहीच्या सर्व प्रकारच्या शोषण पद्धती आणि भ्रष्टाचारी व्यवस्था मान्य करून आपणाला हे देखील मान्य करावे लागेल की भांडवलशाही ही आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वात प्रगत अवस्था आहे. या प्रगत अवस्थेचे फायदे नाकारून चालणार नाहीत तर त्यांना भांडवली मूल्य-स्वरूपापलीकडे प्रवेगित करत न्यावं लागेल.

६. लेनिनदेखील 'डावा बालिशपणा' या १९१८ मधल्या त्याच्या लिखाणात नमूद करतो, की आधुनिक संशोधनावर आधारित मोठ्या प्रमाणातील भांडवली प्रद्योगिकीकरणाशिवाय समाजवाद वास्तवात आणणं अशक्य आहे. यासाठी लाखो लोकांना एका विशिष्ट उत्पादन व वितरण यंत्रणेत सामील करणारी सुनियोजित राज्य व्यवस्था हवी. आम्ही मार्क्सवादी नेहमीच याचा उल्लेख करत आलो आहोत, आणि (अराजकवादी आणि मोठ्या प्रमाणात डावे समाजवादी क्रांतिकारक) यांच्यासारख्या इतकंही न समजणाऱ्यांशी याबाबत वितंड घालत बसण्यात काहीच अर्थ नाही.  

७. मार्क्सला एक स्पष्ट ज्ञान होतं की भांडवलशाही ही प्रवेगाची खरी वाहक असू शकत नाही. त्याचप्रमाणे डाव्या राजकारणाची तंत्र-सामाजिक प्रवेगाविरोधातील प्रतिमादेखील पुर्णतः चुकीची आहे. जर डाव्या राजकारणाला स्वतःचं काही अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्यांना जास्तीत-जास्त प्रमाणात या दबलेल्या प्रवेगावादी तत्वांचा अंगीकार करावा लागेल.

 

जाहीरनामा: भविष्याबाबत 

१. आम्ही असं म्हणतो की, आजचे डावे राजकारण दोन विभागांमध्ये विभागले गेले आहे, एका बाजुला ते लोक आहेत जे लघुकेंद्री स्थानिक राजकारण करण्यात मग्न आहेत व हे लोक थेट कृती आणि कठोर समांतरवादाला मानणारे आहेत. यांच्या व्यतिरिक्त जो दुसरा समहू आहे त्याला आपण प्रवेगवादी राजकारण असे म्हणू शकतो. हा समुह प्रामुख्याने अमूर्ततेची आधुनिकता, विकटता, वैश्विकता व तंत्रज्ञान या गोष्टी अंगिकारतो. यामधील पहिल्या समुहाने अ-भांडवली नात्यांचं लघु आणि तात्पुरत्या स्वरूपाचं विश्व निर्माण केले आहे, व त्याच सोबत हा समुह स्वतःला मूलतः अ-स्थानिक, अमूर्त आणि रोजच्या पायाभूत सुविधांमध्ये खोलवर रुतलेल्या प्रश्नांपासून स्वतःला वर्जित करत आहे. या उलट प्रवेगवादी राजकारण उत्तर भांडवली व्यवस्थेतील फायदे जपत भांडवलाच्या मूल्य व्यवस्थेच्या पलीकडे तिच्या सरकारी संरचनांच्यापलीकडं जाण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

२. आपणा सर्वांनाच किमान काम करायचं असतं. हे अनाकलनीय आहे की का युद्धोत्तर काळातील जगातील अर्थशास्त्रज्ञानी अशी कल्पना केली की सजग भांडवल आपल्याला कमी श्रम गरजेच्या भविष्याकडं घेऊन जाईल. In Economic Prospect of our Grandchildren या पुस्तकात केन्स यांनी भाकीत केलं होते की भविष्यातील भांडवली अवस्थेत श्रम हे तीन तासांवर घटित केलं जाईल. पण प्रत्यक्षात मात्र श्रम आणि जीवन यांच्यातील दरी समाप्त होतांना दिसत आहे आणि श्रम जीवनाच्या प्रत्येक भागात शिरकाव करताना दिसत आहे. 

३. भांडवल तंत्रज्ञानाची उत्पादन शक्ती सीमित करत आहे किंवा निरुपयोगी संकुचित ध्येयाकडे वळवत आहेत आहे. पेटंट युद्ध आणि मक्तेदारी या सध्यकालीन गोष्टींनी आपणस हे दाखवून दिले आहे की भांडवलानं स्पर्धेच्या पलीकडे जाण्याची गरज आहे आणि तंत्रज्ञानाप्रति असणारा प्रतिगामी दृष्टिकोन बदलणंसुद्धा गरजेचं आहे.

नव-उदारमतवादाच्या प्रवेगानं आपले श्रम कमी करून आपल्याला अवकाशगमन, फ्युचर-शॉक किंवा क्रांतिकारी तंत्रज्ञानात्मक शक्यतांकडं नेण्याऐवजी आपल्याला साधारण उपभोग्य तंत्रज्ञानाच्या ठेंगण्या विकासात मर्यादित केलं आहे. एकाच उत्पादनाच्या एकामागून एक नवीन प्रारूपांच्या गर्दीत, मानवी प्रवेगाच्या शक्यता हरवून बसल्या आहेत. 

 

४.फोर्डवादी अर्थव्यवसस्थेत आपणाला परत जायचे नाही आणि फोर्डवादी पद्धतीकडे पार्ट जाण्याचा प्रश्नही येत नाही. भांडवलाचा सुवर्णकाळ हा प्रामुख्यानं कारखान्यातील उत्पादन व्यवस्थेवर आधारित होता आणि या व्यवस्थेत विशेषतः पुरुष कामगारांना आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षितता आणि चांगलं जीवन बहाल केलं जायचं, पण त्याचसोबत आयुष्यभसरासाठी निरसपणा आणि सामाजिक दुय्यमत्व देखील बहाल केलं आहे. ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय वसाहतींची उतरंड, त्यांचा साम्राज्यवाद, अविकसित प्रदेश, वंशवाद, लिंगवाद इत्यादी सारख्या देशांतर्गत उतरंडी, कौटुंबिक कामांत तसेच स्त्रियांचे दमन इत्यादी सारख्या गोष्टीवर आधारित होती. म्हणूनच या व्यवस्थेबद्दलची ज्या लोकांना सुप्त ओढ आहे, ते नक्कीच कबुल करतील की ही व्यवस्था अवांछित आहे आणि प्रत्यक्षात या व्यवस्थेकडं परत जाणंसुध्दा अशक्य आहे. 

५. प्रवेगवाद्यांना मूलतः अप्रगत उत्पादक शक्तींना मुक्त करायचं आहे. या प्रारूपात नव-उदारमतवादाचा जो भौतिक आधार आहे तो उध्वस्त करायची गरज नाही. या भौतिक आधाराला आपणास सामुहिक उद्धिष्टांकडे मार्गक्रमित करायचे आहे. आज उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा भांडवलाच्या अवस्थांप्रमाणं नष्ट करायच्या नाहीत, तर या व्यवस्था उत्तर भांडवली समाजनिर्मितीकडं झेपावण्यासाठीचा रनवे असेल. 

६. १९७० पासून आज पर्यंत आपण हे पाहिलं आहे की  तंत्रविद्यान भांडवलाच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे आणि त्यामुळं आपणस या आधुनिक सामाजिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेची कल्पना नाही. पुर्णपणे विकसित झालेल्या या तंत्रज्ञानामध्ये कोणत्या संभावना दडल्या आहेत याच आपल्यापैकी कुणाला ज्ञान आहे? आम्ही ठामपणे सांगू शकतो कि आज अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानातील परिवर्तनशील संभाव्यताना भांडवलानं अजून स्पर्शही केलेली नाही. 

७. आम्हाला तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती प्रक्रियेला प्रवेगीत करायचं आहे, पण आम्ही कोणत्याही स्वरूपाचा तंत्र-आदर्शवाद मानत नाही. आम्ही असंही म्हणत नाही की फक्त तंत्रज्ञानाचं आपणाला वाचवू शकेल. तंत्रज्ञान गरजेचं आहे पण सामाजिक-राजकीय कृतीशिवाय ते अपुरं आहे. तंत्रज्ञान आणि समाज या दोन्ही गोष्टी एकमेकांना बांधलेल्या आहेत आणि एका मधील बदल हा नक्कीच दुसऱ्या गोष्टीला प्रभावित करणारा आहे. या उलट तंत्र-आदर्शवादाला मानणारे लोक असे म्हणतात की तंत्रज्ञानाला जर प्रवेगीत केलं तर आपले प्रश्न आपोआप सुटतील. आम्ही याउलट असं म्हणतो की तंत्रज्ञानाला प्रवेगीत केलं पाहिजे कारण आपल्या सध्याच्या समाजातील संघर्षावर मात करण्यासाठी या प्रवेगीत तंत्रज्ञानाची गरज आहे. 

८. आमचा असा विश्वास आहे की कोणत्याही उत्तर-भांडवली समाजासाठी उत्तर-भांडवली नियोजन गरजेचं आहे. २०व्या शतकातील एक प्रचलित धारणा आहे की क्रांती नंतर लोक उस्फुर्तपणे एक नव्या पध्दतीची सामाजिक आर्थिक व्यवस्था निर्माण करतील आणि ही व्यवस्था भांडवलशाहीकडं परत जाणारी नसेल हा विचार मुळात एका बाजुला खूप बालीश आणि दुसऱ्या बाजुला तो टोकाचा अज्ञानी विचार आहे. आपणाला भविष्याचा विचार करत असताना आजच्या परिस्थितीचा आराखडा मांडावा लागेल त्याचसोबत आपल्याकडे भविष्यातील अर्थव्यवस्थेची  परिकल्पना असणं गरजेचं आहे . 

९. हे सर्व करण्यासाठी डाव्यांनी आजच्या भांडवली व्यवस्थेतील सर्वच प्रगत तंत्रज्ञानांचा, वैज्ञानिक शोधांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. आम्ही जाहीर करतो की प्रमाणीकरण हे नष्ट करावं अशी विकृती नसून, शक्य तितक्या परिणामकारक पद्धतीनं वापरण्याची गोष्ट आहे. आर्थिक प्रारूपाची निर्मिती यासाठी उपयोगी आहे कारण ते आर्थिक संरचनांचा किचकटपणा मेंदुला समजण्यासाठी उपयोगाची ठरेल. २००८च्या आर्थिक अरिष्टानं अशा प्रकारची मॉडेल गणितीय अंधत्वामुळे स्वीकारली गेली तर होणारं नुकसान दाखवून दिलं असलं तरी या मर्यादा गणितीय साधनांच्या नसून त्यांचा वापराची दिशा ठरवणाऱ्या अनैतिक हेतू असणाऱ्या यंत्रणेच्या आहेत.

सोशल नेटवर्क अनालिसिस, एजंट बेझ्ड मॉडेलिंग, बिग डेटा अनॅलिटीक्स आणि असंतुलनवादी आर्थिक प्रारूपं या सर्वात उपलब्ध असणारी साधनं ही आधुनिक अर्थव्यवस्थेची जटिलता समजून घेण्याची संसाधनं आहेत. प्रवेगवादी डाव्या राजकारणानं या सर्व साधनांमध्ये साक्षर व्हायला हवं.  

 

१०. कोणत्याही सामाजिक बदलात आर्थिक सामाजिक प्रयोगशीलतेचा सहभाग हवा. Cybersyn हा चिलीमधील प्रकल्प या प्रयोगवादी  मानसिकतेचे  द्योतक आहे - यामध्ये आधुनिक सायबरनेटिक तंत्रज्ञानास किचकट आर्थिक प्रारूपांची जोड देऊन तत्वज्ञानाच्या पायाभूत आराखड्यात लोकशाहीची तत्व गुंफली होती. अशा प्रकारचे प्रयोग १९५०-६० च्या काळात सोव्हिएत अर्थशास्त्र करत होते, ज्यात सायबरनेटिक्स आणि एकरेषीय लिनियर प्रोग्रामिंगचा वापर, पहिल्या-वाहिल्या कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेसोबत उद्भवलेल्या नव्या समस्यांचं निवारण करण्यासाठी केला गेला होता, परंतु हे दोन्ही प्रयोग अपयशी ठरले व त्याची कारणं ही तत्कालीन राजकीय व तंत्रज्ञानात्मक मर्यांदा मध्ये होती. 

११. डाव्यांनी सिद्धांतन आणि भौतिक क्षेत्रामध्ये तंत्र-सामाजिक प्रभुत्व निर्माण करणं गरजेचं आहे. ही व्यासपीठं नव्या वैश्विक समाजाच्या पायाभूत सुविधा आहेत. ते आपल्या जगण्याविषयीच्या व मूलभूत वैचारिक धारणा ठरवतात.  या अर्थानं या प्लॅटफॉर्ममध्ये आदिम भौतिक आकलन समाविष्ट असत आणि हे प्लॅटफॉर्म विशिष्ट प्रकारची कृती, नातेसंबंध इत्यादी गोष्टी  ठरवत असतात.आजच्या काळातील जवळजवळ सर्वच प्लॅटफॉर्म हे भांडवलाकडं झुकलेले आहेत. मात्र हे असेच असले पाहिजे असं गरजेचं नाही. आपणाला हे उत्पादकी, वित्तीय, वाहतुकीचे, उपभोगाबाबतचे सर्वच प्लॅटफॉर्म उत्तर भांडवली उधिष्ट समोर ठेऊन पुनर्सुधारित आणि पुनर्निर्मित करावे लागतील.

१२. वर उल्लेखित केलेली ध्येय गाठण्यासाठी  कोणत्याही प्रकारच्या थेट कृती मर्यदित स्वरूपाच्या आहेत.  नेहमीचे मोर्चे किंवा सह्यांची मोहीम अथवा विशिष्ट काळासाठी विशिष्ट  जागा व्यापणं, यासारखे राजकीय प्रकार प्रभावी/चिरंतन विजयांचा पर्याय मात्र आहेत. “आम्ही काही तरी केलं" हे  वाक्य स्वतःच्या कर्तृत्वाची शेकी मिरवत परिणामकारक कृती पासून पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या मुक्तीचा एकच निकष असतो आणि तो म्हणजे ती मुक्ती निश्चित यश प्राप्त करून देते की नाही. विशिष्ट कृतीचं विभूतीकरण करण्यापासून आपण परावृत्त होणं गरजेचं आहे. राजकारण ही गतिमान व्यवस्था आहे जी संघर्ष  आणि रणनीती बनलेली आहे. याचाच अर्थ असा की प्रत्येक विशिष्ट राजकीय कृती विशिष्ट काळानंतर आपण पर्यायी कृती अंगीकारतो तेंव्हा निरुपयोगी व बोथट ठरतात. कोणतीही राजकीय कृती ऐतिहासिकरित्या अजिंक्य नाही. विशिष्ट काळानंतर वापरत असलेल्या कृती बाद करणं गरजेचं ठरतं कारण ज्या शक्तीविरुद्ध या कृती लढत असतात त्या शक्ती विशिष्ट काळानंतर या कृतीविरोधात स्वतःचं संरक्षण कण्यात व प्रतिरोध करण्यात सक्षम झालेल्या असतात. सध्यकालीन डाव्यांना या गोष्टी आत्मसाथ करण्यात अपयश आल आहे आणि हे अपयशच सध्यकालीन अवस्थेचं मुळ आहे.

१३. लोकशाही प्रक्रियेला जो अतिरिक्त विशेषाधिकार बहाल करण्यात आला होता तो आता मागे घेणं गरजेचं आहे. खुलेपणा, समांतरता, समावेशकता इत्यादी गोष्टींचं विभूतीकरण हे आजच्या जहाल डाव्यांच्या अकार्यक्षमतेचं मूळ कारण आहे. गुप्तता, अनुलंबता, अपवर्जन या गोष्टींना राजकीय कृतींमध्ये स्थान असावं(अर्थात हे स्थान अनन्य नसावं.)

१४. मतदान, चर्चा, सार्वजनिक सभा या लोकशाहीच्या संसाधनाद्वारे लोकशाहीची व्याख्या करता येणार नाही. खरी लोकशाही तिच्या ध्येयाने व्याखायीत होईल आणि हे ध्येय म्हणजे सार्वत्रिक स्व-प्रभुत्व होय. हा राजकीय प्रकल्प राजकारणाला प्रबोधनीय परंपरेशी जोडून घेतो, म्हणजेच आपल्या स्वतःला आणि जगाला समजण्याच्या क्षमतेमुळे आपण आपल्या स्व वर प्रभुत्व गाजवू शकतो. आपणाला जर जुलमी निरंकुश केंद्रीय सत्ता किंवा आपल्या हाताबाहेर असणाऱ्या नवनिर्मित, अस्थिर व्यवस्थेचे गुलाम बनायचं नसेल तर समांतरीय सामाजिकता वितरीत करण्यासाठी आपणाला सामुहिकरित्या नियंत्रित व सर्वमान्य अशी अनुलंबित व्यवस्था बनवणं गरजेचं आहे. अर्थात हा प्रकल्प नेटवर्क व्यवस्थेशी संलग्न असला पाहिजे. 

१५. या संकल्पनात्मक बिंदूंना मूर्तरूप देण्यासाठी विशिष्ट संघटना आदर्श असू शकते असं आम्ही मनात नाही. आज आपणाला बहुविध शक्ती आणि वेगवगेळ्या संघटनांची गरज आहे व या संघटना एकमेकांना बळ देणाऱ्या, एकमेकांच्या क्षमता व कमतरता संतुलित करणाऱ्या असल्या पाहिजेत. सांप्रदायिकता आणि केंद्रीयता या दोन गोष्टी आजच्या डाव्या राजकारणाला घातक आहेत आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या आराखड्यांचे प्रयोग करणं स्वागतार्ह मानतो. 

१६. आपल्या समोर तीन माध्यमिक ठोस ध्येय आहेत. पहिलं, आपणाला बुद्धिजीवीय पायाभुत सुविधा निर्माण कराव्या लागतील, थोडक्यात नव-उदारमतवादी क्रांती मधील Monte Pelerin समुहासारखं काहीतरी उभारावं लागेल. यामध्ये आपणाला आजच्या जगावर विराजमान असणारया कृश आदर्शाना पुनःस्थित करण्यासाठी व दाबून टाकण्यासाठी  नवी विचारसरणी, अर्थशास्त्र, सामाजिक व्यवस्था आणि सत्य दृष्टीकोन निर्माण करावा लागेल. या पायाभूत सुविधा फक्त आदर्शच निर्माण करणार नाहीत तर त्याच सोबत संस्था आणि भौतिक मार्गही निर्माण करावे लागतील जे हे आदर्श प्रत्यक्षात बिंबवतील, मुर्तस्वरूपात आणतील आणि हे आदर्श पसरविले जातील.

१७. आपणाला मोठया प्रमाणात माध्यमांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या लोकशाहीकरणानंतरही पारंपरिक मीडिया हा कथन निर्धारित करण्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. आजच्या या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी शक्य तितक्या लवकर पारंपरिक मीडिया आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टींना लोकांच्या नियंत्रणाखाली आणलं पाहिजे.

 

१८. शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे आपणास वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्गीय शक्ती पुनर्स्थापित कराव्या लागतील, ही पुनर्स्थापना आज अस्तित्वात असलेल्या जैविक वैश्विक कामागरवर्गाच्या पलीकडे जाणारी असली पाहिजे. या ऐवजी उत्तर-फोर्डवादी व्यवस्थेत अस्तिवात असलेल्या अनिश्चित स्वरूपाच्या भिन्न अर्धवट कामागरवर्गीय अस्मितांना आपण एकत्र बांधलं पाहिजे. 

१९. वेगवेगळे समूह व व्यक्ती त्याबाबत काम करत आहेत, मात्र असंवेगवेगळं काम पुरेसं नाही. याउलट या तिन्ही गोष्टीत एकत्रित येऊन एकमेकांना साहाय्य केलं पाहिजे. सकारात्मक पायाभूत सुविधा, वैचारिक, सामाजिक व आर्थिक बदलांचं अभिप्रायात्मक वर्तुळ नवीन विकट प्रभुत्व निर्माण करेल व त्याचसोबत एक नवीन उत्तर भांडवली प्लॅटफॉर्म निर्माण करेल. आपणाला इतिहासानं दाखवून दिलं आहे की रणनीती आणि संघटनांचे बृहद एकत्रीकरण व्यवस्थात्मक बदल घडवतं आणि आपणाला हे शिकलं पाहिजे.

२०. ही सर्व ध्येयं गाठण्यासाठी प्रवेगवादी डाव्यांनी नवीन राजकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या पैश्याच्या प्रवाहाचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. लोकांच्या शक्ती व्यतिरिक्त आपणाला सरकार, संस्था, वैचारिक समूह, संघटना आणि व्यक्तींकडून देखील फंड मिळवता आले पाहिजेत.

२१.आम्ही असं जाहीर करतो की समाज आणि पर्यावरणावरील अधिकाधिक प्रभुत्वाचे प्रॉमेथीयन राजकारणच आजच्या जागतिक प्रश्नांची सोडवणूक करू शकतं किंवा भांडवलावर विजय प्राप्त करू शकतं. हे प्रभुत्व प्रबोधनाच्या प्रिय विचारवंतांपासून स्वतःला विलग करतं, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रभुत्वाला कमी लेखणाऱ्या, प्रोटो-फॅसिस्ट संबोधणाऱ्या किंवा वर्चस्वाला बेकायदेशीर ठरवणाऱ्या उत्तर-आधुनिकतेच्या अवशेषाशी काही जवळीक साधतो. याउलट आम्ही असं जाहीर करतो की आपल्या ग्रहाला व मानवजातीला भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे आपणाला प्रभुत्वाला नूतनिकृत करून समन्वित स्वरूपात नव्यानं मांडावं लागेल.

आपल्या कृतीचे निश्चित परिणाम आम्ही भाकीत करू शकत नाही परंतु आम्ही संभावतः आमच्या कृतीचे परिणाम निर्धारित करू शकतो. उत्तर-भांडवली व्यवस्थेसाठी जे पारंपरिक विधान केले जाते ते आपणाला पुनर्जीवित करावे लागेल: भांडवलशाही ही अन्यायी व विकृत व्यवस्था आहे पण त्याचसोबत भांडवलशाही ही प्रगती रोखणारी व्यवस्था आहे. आपला तंत्रज्ञानात्मक विकास भांडवलशाहीने जितका मुक्त केला आहे तितकाच तो दडपला देखील आहे. प्रवेगवाद असे जाहीर करतो की भांडवली समाजानं लादलेल्या मर्यादांच्या पलीकडं तंत्रज्ञानाची क्षमता जाऊ शकते आणि या मर्यादांच्या पलीकडे आपणाला या क्षमतांना घेऊन गेलं पाहिजे. आपली चळवळ जी सध्यकालीन बंधन तोडून पुढं जाते, ती चळवळ विवेकी वैश्विक समाजासाठीचा लढा आहे. आम्ही असं मानतो की ही चळवळ १९व्या शतकापासून ते नव-उदारमतवादाच्या उदयापर्यंत जा स्वप्नाने सर्वांना संमोहित केले होते त्या स्वप्नांची पुनरप्राप्ती करणारी ही चळवळ आहे. ही चळवळ होमो सेपिअन्सना पृथ्वीच्या मर्यादांच्या पलीकडे व आपल्या शाररिक मर्यांदाच्या पलीकडे नेण्याचं स्वप्न पुनर्स्थापित करते.

हा दृष्टीकोण निरागस क्षणांचा अवशेष मात्र मनाला जातो. तरीही ते आपल्या काळातील कल्पनेच्या आश्चर्यकारक अभावाचे निदान करतात व त्याच सोबत उत्साहवर्धक भविष्याचे व बुद्धिजीवीय उत्साही भविष्याची खात्री देतात. हा असा उत्तर भांडवली समाज आहे जो प्रवेगीय राजकारणामुळे शक्य झाला आहे, जो विसाव्या शतकाच्या मध्यातील स्पेस प्रोग्राम चे स्वप्न प्रत्यक्षात उतरवेल, जो किमान श्रेणी सुधारणांच्या जगाच्या पलीकडे जाऊन सर्वंसमावेशक बदल प्रत्यक्षात आणेल. हा उत्तर-भांडवली समाज आवश्यक व सक्षम अश्या भविष्याकडे घेऊन जाईल जो आपल्या सामूहिक स्व प्रभुत्वाचा काळ असेल. हा भांडवली समाज आपणाला स्व-टीकेच्या स्व-प्रभुत्वाच्या प्रबोधनात्मक प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाईल.

२३. आपल्या समोर जी निवड उपलब्ध आहे ती भयावह आहे : एकतर वैश्विक उत्तर भांडवली व्यवस्था किंवा आदीमतेकडे जाणारं संथ विखंडन, शाश्वत अरिष्ट आणि संपूर्ण ग्रहाचा पर्यावरणीय नाश.

२४. भविष्याची रचना करावी लागेल. भविष्य नव-उदारवादी भांडवलानं उध्वस्त केलं आहे व त्याचसोबत अधिकाधिक असमानता, संघर्ष आणि अनागोंदी यामध्ये घटित केलं आहे. भविष्याच्या संकल्पनेचा पाडाव हा आपल्या प्रतिगामी ऐतिहासिक काळाच्या रोगसुचकतेमुळे झाला आहे. प्रवेगवाद अधिकाधिक भविष्य आपल्या समोर सादर करतो व त्याचसोबत पर्यायी आधुनिकतेला जन्म देतो, जे नव-उदारमतवादाला मूलतः जन्माला घालता आले नाही. आपल्या मर्यादांच्या पलीकडच्या विश्वाला गवसणी घालत आपण भविष्याला त्याच्या कोषातून मुक्त केले पाहिजे.