Quick Reads

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : निकोला टेस्ला

एका अद्वितीय संशोधकाची कहाणी

Credit : teslarati.com

अल्बु,ओप्पु, हैजुनंतर मला प्रेमाचा high voltage झटकाच मिळाला...आणि अर्थातच तो देणारा होता निकोला टेस्ला....त्याचं झालं असं होतं कि B.Sc T.Y च्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मी घरी गेलेले तेव्हा छोट्या भावानं म्हणजे आमच्या अनि ने मला त्याच्या सायन्स प्रोजेक्टसाठी जंग जंग पछाडलं होतं...प्रोजेक्ट होता 'stories of scientists..'...आणि त्यात भेटला हा... पक्का येडा म्हणजे येडा..आणि तेवढाच जिद्दी...अगदी माझ्यासारखाच... स्वतःचं म्हणणं बरोबर असेल तर ते प्रुव्ह करुनच शांत बसणारा.... मग जरा या अट्टल जिद्दीबद्दल जाणुन घेणं तर गरजेचं होतंच....

ऑस्ट्रियातील स्मिलजनमधील एका चर्चमधील प्रिस्ट आणि गृहिणी आईच्या पोटी १८५६ मध्ये जन्म घेतलेलं ५ पैकी चौथं अपत्य म्हणजे माझा लाडका निकोला! मोठ्ठा भाऊ आणि तीन बहिणी होत्या याला, पण घोडेस्वारीच्या एका अपघातात त्याचा मोठ्ठा भाऊ डॕनी मारला गेला. तेव्हा निकोला फक्त ५ वर्षाचा होता. आपल्या लाडक्या भावाच्या जाण्यानं पुरता हादरुन गेलेला बिचारा. या घटनेचा फार मोठ्ठा परिणाम त्याच्यावर झाला. यावर उपाय म्हणजे शाळा. त्याच्या लौकिकार्थानं शिक्षण न घेतलेल्या आई वडिलांनी त्याला प्रायमरी स्कुलमध्ये घालण्याचा निर्णय घेतला. प्रायमरी स्कुलमध्ये बीजगणित, धर्म आणि जर्मन भाषेचं शिक्षण यावर अधिक भर दिला गेला.

जेव्हा निक्कु ७ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांना गोस्पिक मधील एका खेड्यातील चर्चमध्ये जावं लागलं. त्यामुळं संपूर्ण टेस्ला कुटुंब लागलीच शिफ्ट झालं. त्या वयातही निकोलाची मेमरी भयंकरच भारी होती, अगदी फोटोग्राफिक मेमरी आणि क्रियेटिव्ह किडे. आता तिथं राहुन यानं प्रायमरी आणि माध्यमिक शिक्षण  पुर्ण केलं झटक्यात आणि १८७० हा निघाला कैट्लव्हैकला उच्च शिक्षणासाठी. स्कुल कुठलं तर रियल जीम्नेझियम. जगात भारी ना बॉस! एक तर इथं मुलांची शैक्षणिक तयारी तर करुन घेतली जायचीच पण उच्च शिक्षणासाठी पण तयार केलं जायचं. आणि आधीच निक्कु दुनियाचा हुशार पोट्टा. अख्खंच्या आख्खं पुस्तक पाठ असायचं याचं. नवनवीन भाषा शिकण्याची धडपडही अफाट याची. मग या अशा आयटमवर प्रेम नाही बसणार तर काय होणार?

त्यातच तो सगळी कॅल्क्युलेशन्स डोक्यातल्या डोक्यात म्हणजे ऑन द स्पॉट करायचा. त्यामुळं शिक्षकांना वाटायचं हा कॉपी करतो. पठ्ठ्यानं चार वर्षाचा अभ्यास तीनच वर्षात पुर्ण केला. भौत हार्ड ना भाय! आणि तिथंच त्याला त्याच्या शिक्षकांकडुन Electricity बद्दल थोडीशी माहिती मिळाली आणि हा माझ्यासारखाच...पुर्णच जाणुन घ्यायचंच या हट्टानं पेटलेला... तेवढ्यात पदवी पुर्ण झाली म्हणून परत गावी आला. गावी आला न् कॉले नं बेजार करून टाकलं याला. याला कॉलरा आणि मला टायफॉईड झालेला. दोघं एकत्र दवाखान्यात. माझं फावलं, ड्रीम बॉय समोरच! या काळात याला जाणून घ्यायचा अतोनात प्रयत्न करु लागले. हा नऊ महिने कॉलेराशी लढत होता. घरच्यांनी तर आशाच सोडुन दिलेली. कसाबसा नीट झाला आणि  थोडेदिवस जरा बाहेर राहिला. या काळात वाचन मात्र अफाट केलं!

आता वेळ झाली होती आमची दोघांचीही ऍडमिशनची. मी गेले B.Ed ला आणि हा 'ग्राझ'ला. तिथं त्यानं ऍडमिशन ऑस्ट्रियन पॉलिटेक्निकला घेतलं. दोघंही मस्तपैकी कॉलेज एन्जॉय करत होतो...एकदम रॉकिंग! पहिल्याच वर्षी तो स्टार स्टुडंट झाला आणि मी त्याच्या प्रेमातली आगाऊ कार्टी. हां पण याच्या संगतीनं रिझल्ट चांगलाच येत होता. लायब्ररीतली भेट मात्र चुकली नाही कधीच. माझं B.Ed एकच वर्षाचं असल्यानं संपलं मात्र त्याच वर्षी माझे प्रोफेसर, प्रिन्सीपलशी बरेच खटके उडालेले. निकोलाकडुनं जसं मी अभ्यास करायला शिकले तर माझ्याशेजारी बांधल्यावर माझा गुण त्याला कसा नाही लागणार बरं? त्याचाही सेकंड इअरला असाताना D.C मोटर वरून एका प्रोफेसरशी खटका उडाला. त्यानं त्या मोटार डिझाईनवर पहाटे ३ ते रात्री ११ पर्यंत काम केलं. पण परिणाम असा झाला की त्याने त्याची स्कॉलरशीप गमावली आणि वयाचा दोष म्हणा किंवा पहिल्यांदाच स्टार स्टुडंटची इमेज गेल्याचा धक्का म्हणा, जुगाराच्या नादी लागला. ही गोष्ट मात्र माझ्यासाठी धक्कादायक होती. आमच्या प्रेमाला एकमेकांची जेव्हा गरज होती त्याचवेळी नेमकी मी पण M.Sc entrance च्या तयारीला लागलेले आणि हा जुगारात अडकलेला. सगळं काही संपलं याच्याकडंचं. शेवटी कधीतरी जिंकला आणि घरच्यांचे पैसे परत केले. विद्यापीठ सोडुन, घर सोडुन निघुन गेला. अपयश दाखवु शकत नव्हता. त्याच्या वडिलांनी शोधलं. घरी आणलं. त्यावेळी नर्व्हस ब्रेकडाऊनचा शिकार झालेला तो. त्याच्या जाण्यानं मात्र पुरती खचलेले मी आणि वडिलही. १८७९ ला गेले ते ही.

वडिलांच्या जाण्यानं जरा भानावर आला. परत जीम्नेझियम ला गेला. तेव्हा मात्र शिकवायला लागला तिथं. पुरेसे पैसे जमल्यावर १८८१ ला बुडापेस्टला टेलीफोन एक्स्चेंज मध्ये काम करु लागला. एके दिवशी बागेत फिरताना मात्र त्यालाही एक झटका परत त्याच्या स्वप्नाकडे घेऊन गेला. A.C मोटरची आईडिया त्याला आली. एक स्केच काढलं. फ्रान्सला गेला. काम करु लागला यावर. पण बाकी जगाला याच्या कामात काडीचाही इंटरेस्ट येईना.

निकोला उठला आणि तडक गेला तो त्यावेळच्या फेमस संशोधकाकडे. थॉमस अल्व्हा एडिसन! तो काळ एडिसनचा होता. १००च्या वरती प्रयोग करुन, शेवटी कार्बनचा वापर करुन एडिसन जगाला वीजेची ओळख करुन दिली. जवळपास अठराच्या वर पॉवर प्लँन्ट्स उभारलेले त्यानं. पण सगळेच्या सगळे होते direct current चे. म्हणजे D. C मोटरच्या मदतीनं उभारलेले. तोटा एक होता की D.C लाईट अर्ध्या मैलाच्या आतच पोहचवता यायची. म्हणजे शहराच्या मध्यावरती पॉवर प्लँन्ट उभारणं गरजेच. खेड्यांचा तर संबंधच नव्हता. एडिसन यासाठी काम करत होता. निकोला आला त्याच्याकडे.  ओळख करुन दिली. एडिसन टफ मास्तर, लगेच कसा विश्वास ठेवेल? त्यानं त्याच्या सूपरवायजरचं लेटर दाखवलं तरी विश्वास नाही ठेवला. 

त्यानं निक्कुला एक टफ काम दिलं. एका रात्रीत निकोलने ते काम करुन सकाळी एडिसनच्याच लॅबसमोर एडिसनचीच वाट बघत बसला.अपना आयटम था. एक बार किया तो किया ना बॉस अपना काम! आणि एडिसनसाठी जे काम अवघड हौतं ते निक्कुसाठी बाँये हाथ का खेल! आता मात्र एडीसनचा विश्वास बसलाच. दोघंही अशा रितीनं एकत्र आले. बिच्चारा माझा निकोला माझ्याकडेही लक्ष देईना. सतत कामात. मी तर वैतागून गेले राव. पण त्याचं झपाटलेपण बघुन भई मै तो पिघल गईं. D. C मोटरला खुप लिमिटेशन्स होते. निकोला सांगत होता आपण A.C मोटर वापरु. मी बनवतो पण एडिसन तो एडिसन था. सुनता नहीं था ना.

"High voltage असतो A. C...जाळुन टाकशील शहर. तु गप आता D.C motor कशी सुधारीत करता येईल बघ मी तुला ५००० डॉलर्स देतो..."

निकोला करु लागला काम...केलंही त्यानं...आणि जाऊन पैसे मागितले....त्यावर एडिसन बोलला,
"तुला अमेरिकन जोक्स कळत नाहीत...पैसे बिसे काही नाही..जा!"

याला असल्या चेष्टेचा मात्र राग आला. त्यानं लॅब सोडली. एक फायनान्सर शोधला. A.C मोटरवर काम केलं आणि अल्पावधीतच एडिसनच्या समोरच स्वतःची कंपनी काढली. त्यावर एडिसन निकोला कसा चुकीचाय हेच सिद्ध करत बसला. पण निकोला मात्र तिकडं मस्तपैकी ट्रान्सफॉर्मर्स वगैरे वापर A. C मोटरचं वरदान जगाला देत होता.

तिकडं एडिसन मात्र माझ्या निकोलाची पाठ सोडत नव्हता. त्याची कंपनी एडिसनला आता चांगलीच टफ देत होती आणि याचा त्रास एडिसनला खुपच होऊ लागला. तो लोकांना, पत्रकारांना AC VOLTAGE मुळं होणारे तोटे सांगत फिरु लागला. त्यसाठी त्याने काही प्रयोगही केले कुत्र्यांवर, जे नंतर पेपरमध्येही पब्लिश होऊ लागले. AC/DC ही लढाई आता खरोखरच वेगळ्या उंचीवर पोहोचलेली. एडिसनला आता प्राण्यांच्या पुढं जायचं होतं. न्यु यार्क प्रशासनाची परवानगी घेऊन त्याने पहिली इलेक्ट्रिक खुर्ची तयार केली आणि एका गुन्हेगाराला AC voltage देऊन जगाला दाखवुन दिलं की AC म्हणजे अक्षरशः मरण करंट आहे. पण हार मानेल तो निक्कु कसला. मरणालाही हरवुन आलेला पठ्ठा हा. तेवढ्यातच नायगारा फॉल्स पॉवरचं contract निघालं. नेहमीप्रमाणे एडिसनही तिथं गेला. पण तिथल्या बोर्ड कमिटीनं निक्कुचा AC च निवडला...या करंट युद्धात निकोलाचा हा विजय निर्विवाद होता.

करंट वॉरनंतर याने स्वतःला अनेक संशोधनांमध्ये, पेटंट्स मध्ये बुडवून घेतलं. जग झपाट्यानं बदलत होतं. निकोलाही बदलत होता. रेडिओ लहरींशी संबंधित अनेक संशोधनामध्ये त्याने काम केलं. Radio wave coils, पाणबुडीसाठिही ac वापरता येते, यासारखे अनेक शोध स्वतःच्या नावी केले.

पण आयुष्य तेवढंही दिलदार नसतं. त्यानं लग्न कधीच केलं नाही, जरी एकत्र राहता नाही आलं तरीही त्याच्या प्रेमाची मी नेहमीच दुसरी वाटेकरी राहिले. पहिलं अर्थातच AC होतं ना. आयुष्याचा शेवटच्या काळात तो पूरता दिवाळखोर झाला होता. अचानकपणे एकटाच जगत होता. हॉटेल न्यु यॕर्करच्या खिडक्यांमधल्या कबुतरांबरोबर उगिचंच स्वतःला रिलेट करुन बघत होता. ७ जानेवारी १९४३ रोजी दुसरं महायुद्ध इरेस पेटलं असताना जगभरासाठीचं सगळ्यात मोठ्ठं करंट वॉर जिंकलेला माझा इलेक्ट्रिक मॅन मला मात्र झटका देऊन तडपवुन गेला! आज त्याच्या विजेच्या तंत्रामुळे जग निव्वळ धुमाकुळ घालतंय पण माझ्या मनात मात्र अजुनही माझा निकोलामात्र शांतपणे प्रेमकरंटचं वहन करतोय!

भेटुया पुढच्या आठवड्यात पुढच्या अफेयरबरोबर.....!!!!!