Quick Reads

माझी विज्ञानवादी प्रेमप्रकरणं : गॅलिलियो

आधुनिक भौतिकशास्त्राच्या नायकाची ओळख

Credit : BBVA openmind

हल्ली हल्ली मिलिंद सोमणच्या लग्नानंतरच मला 'शुगर डॅडी' ही concept कळाली. पण ती आपल्यालाही रिलेट होते हे मात्र कळालं तेव्हाच जेव्हा मी बारावीच्या वर्गावर Gravitation शिकवत होते. आता बारावीच्या वर्गावर जायचं तर तयारी करावीच लागणार. तयारी करत असताना एका म्हातारबाबाचा उल्लेख आला. म्हणलं शिकवताना जरा स्टोरी वगैरे सांगता येईल पोरांना याची म्हणून हिस्ट्री काढायला सुरुवात केली याची. जसं जसं याची कथा वाचत गेले तसं तसं हा माणुस मला त्याच्या पाशात ओढत गेला. आणि आता मी 'तुला पाहते रे' ऐवजी 'तुला वाचते रे' आणि 'तुझ्याचबद्दल शिकवते रे' या डेली ड्रीम सोपमोडमध्ये आहे. तिसऱ्याच दिवशी लेक्चर होतं. वर्गावर गेले आणि ही तीन दिवसांपुर्वीपासुनची पुरातन शुगर डॅडीवाली लव्हस्टोरी ऐकवायला सुरुवात केली....

"गुड मॉर्निंग क्लास...!!!"

"गुड मॉर्निंग टीचर.."

"आज अभ्यास बिभ्यास काही नाही. आज तुमच्यासाठी खास काहीतरी.तुम्हाला कधी वाटत नाही का तुमच्या टीचरचं अफेयर असेल वगैरे??"

"......"

"अरे!! नो जवाब.!! ठीकै,चला मीच सांगते माझी प्रेम कहानी. अगदी ताजी ताजी आहे बरं!! परवाच प्रेमात पडलेय मी. हो हो,माहितेय लग्न झालंय पण प्यार तो प्यार है! कभी भी हो सकता है.

तर झालं असं, की परवा मी वाचत बसले होते तुमचाच चॅप्टर. तर हा हळुच डोकावला.म्हणलं बघुयात कोणै ते, तर आला ना समोर हा चाप्टर. अभ्यासु माणुस राव हा तर. याला भेटायला गेले मी पिसा, इटली ला. तीच ती सात आश्चर्यांपैकी एक असलेली बांधकाम बिघडलेली वाकडी बिल्डींग. तर तिथं रहायचा हा. १५ फेब्रुवारी १५६४ ला तिथंच जन्मलेला. पप्पा त्याचे प्रसिद्ध ल्युटेनिस्ट, संगीतकार आणि संगीत सिद्धांतवादी विन्सेंझो गॅलिली. आपला हिरो पण पप्पांमुळंच एक यशस्वी ल्युटेनिस्ट बनला. पण येडा पप्पांनाही भांडला. मोजुन मापुन वाद्य तयार केलं की संगीत छान येतं म्हणे. पुराव्यानिशी साबित पण केलं ना राव.  तोच येडछाप म्हणजे तुमचा माझा गॕलिलिओ. अरे तोच टेलीस्कोपवाला.

हा माझा पहिला गॕलीबॉय मरीना गाम्बासोबत लग्न केला. दोन मुली न् एक मुलगा. छोटा परिवार सुखी परिवार. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जिथं ही अशी येडछाप लोक असातात तिथं काय ना कायतर महान होतंच असतंय. जसं की याचं नाव. फ्लोरेंसाला याचा पूर्व, ज्याचंही नाव गॅलिलियो होतं, तो शिकयला होता, तिथं त्याला लाडानं गॕलीली म्हणाय लागले. तेच त्यानं आडनाव म्हणून स्वीकारलं.  १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वंशजांनी त्यांचे कौटुंबिक नाव बोनाईटी बदलुन गॅलीली च वापराय सुरुवात केली. हेच नाव याचं पण झालं ना. गॅलिलियो गॅलिली."

"आधीच गॅलि बॉयला माझ्या डॉक्टर व्हायचं होतं. म्हणून मग १५८० मध्ये पीसा विद्यापीठात एडमिशन घेतला. शिकत असतानाच एकदा काय झालं तो बसलेला असाच चर्चमध्ये प्रेअर का काय ते करत. तिथं त्यानं वाऱ्याच्या झुळकीनं हलणारं झुंबर बघितलं. इकडुन तिकडं न् तिकडुन इकडं फिरत होतं ते. मग त्येनं म्हणला चला बघुत तर किती वेळ लागतो या झुंबराला इकडुन तिकडं न् तिकडुन इकडं व्हायला. त्येनं हाताच्या नसंच्या ठोक्यावर बघितलं. हैला तेव्हा कुठं घड्याळी बिड्याळी होत्या. तेवढ्यात वारा वाढला अन् ते झुंबर अजुन जरा लांबवर सरळ रेषेत इकडून तिकडं कराय लागलं. परत ह्येनं टाईम चेक केला तर साला तेवढाच टाईम. भुताटकी झाली की काय म्हणला. घरी आला अन् एक लोखंडाचा गोळा घेतला. त्याला दोरा बांधला अन् लागला त्याची दोलनं करायला. मग टाइम मोजाय लागला. अंतर वाढवुन बघाय लागला. सेमच रिझल्ट. मग लोखंडाऐवजी तांब्याचा गोळा घेतला. परत सेम केलं तरी रिझल्ट बदलीना. त्याचं म्हणनं होतं की वजन बदललं की टाईम बदलाय पाहिजे. दोलनाचं अंतर बदललं की टाईम बदलाय पाहिजे. काहीच होईना. दमला गडी. म्हणला आता शेवटचं एकदाच त्या दोरीची उंचीच बदलतो. अन् घावलं की सोलुशन. टाईम बदलला ना आता. याच्यावरनं घड्याळ बनवाय घेतलं यानं. याला कै नै जमलं पण दुसऱ्या एकानं बनवलेलं टॉटोक्रोन पद्धतीनं अचूक टाइमपीस तयार करण्यासाठी वापरला गेला."

जरावेळ गणितापस्नं लांब राहिलेला. परत अकॅडेमियाला शिक्षक म्हणुन लागला कामाला. तिथं त्याला चित्रकला आवडली. जास्ती करुन चंद्राचीच चित्रं आवडाय लागली काढायला. मग परत १५९८ मध्ये त्यांना पीसा येथील गणिताचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. १५९२ मध्ये ते पदुवा विद्यापीठात जम बसवला त्यानं. मस्तपैकी  १६१० पर्यंत भूमिती, Mechanics आणि खगोलशास्त्र शिकवत होता. या काळात गॅलीबॉय pure basic science  (म्हणजे motion आणि खगोलशास्त्रातील कायनेमॅटिक्स) तसंच applied science  या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण शोध लावत होताच.. म्हणलेलं कि नै कि हुश्शार खडा काढालाय आपण."

१६१५ मध्ये कार्डिनल बेलार्मिन म्हणलेला की "सूर्य पृथ्वीभोवती फिरत नै तर पृथ्वी फिरते सुर्याभोवती." हेच कोपर्निकस पण बोललेला, पण साला याच्याकडं नव्हते पूरावे. मग गॅलिबॉय गप बसेल काय. लोकांचं म्हणनं होतं की जर का पृथ्वी फिरत असल तर आपण उडी मारली की पृथ्वी फिरली तर पडु की आपण पृथ्वीबाहेर. गॅलिलियो गेला समुद्रात. बॉल घेतला आणि टाकला समुद्रात. तर बॉल मागं कुठंतर पडायला पायजे कारण जहाज तर पुढं चालतंय. पण गॕली बोलला की गतीमान वस्तु तिच्यावर असणाऱ्या वस्तुला स्वतःची गती देती."

"या आधी पण एक गंमत त्यानंच सांगितलेली. आर्किमिडीज आजोबा म्हणलेकी जर वरनं तुम्ही दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तु खाली फेकला तर जाड वस्तु आधी खाली येईल. ते पेंडुलमवाला प्रयोग करत असताना गॅलिबॉयच्या डोक्यात आलेलं की वस्तुचं वजन नै मॅटर करत. मग त्यानं जरा प्रयोग केले. एक दंतकथा पण फेमसै याबाबतीत. असं म्हणतेत की हा प्रयोग सिद्ध करण्यासाठी गॕली बॉय आमचा पिसा टॉवरवर चढला आणि तिथनं त्यानं दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तु फेकल्या. अगदी थोडासाच फरक पडला. खरंतर त्यानं एक पक्ष्याचं पीस आणि दगड घेऊळृ प्रयोग केला. परंतु हवेच्या घर्षणानं त्यांच्या खाली पडण्याच्या वैळेत थोडासा फरक जाणवु लागला. मग काय हाच प्रयोग पठ्ठ्यानं निर्वात पोकळीत केला आणि त्याला हवा असलेला रिझल्ट आला.

त्याचं ना साला माझ्यासारखं होतं. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. प्रयोग पाहिजेच. यानंतरही केप्लरच्या ग्रहांच्या कक्षेसंदर्भातल्या अभ्यासावरुन चंद्र पृथ्वीभोवती फिरण्यानं लाटा येतात हे सिद्ध केलं. अफाट ज्ञानी आणि अभ्यासु माणुस. त्याच्या अभ्यासाचा अभ्यास न्युटन अन् अल्बुनं केला. आजपण यावर अभ्यास सुरुच आहे. धुमकेतुबद्दलचा वादही असाच फेमसै. १६२३ मध्ये गॅलीलियोने 'द असीअर'  प्रकाशित केले. यालाच विज्ञानाचा जाहीरनामा म्हणलं तरी चालेल. त्याआधीच  १६१८ नोव्हेंबरमध्ये उशिरा दिसलेल्या धूमकेतूच्या स्वरूपावर चर्चा केली होती. ग्रॅसीने निष्कर्ष काढला की धूमकेतू एक अग्निमय गोळा आहे जो पृथ्वीवरील स्थिर अंतरावर एका मोठ्या गॕलेक्सीच्या एका टोकासह फिरला होता. आणि तो चंद्रापेक्षा आकाशात हळू हळू चालत असल्याने ते जास्त दूर गेले पाहिजे.

यावर गॅलीलचा युक्तिवाद आणि निष्कर्ष 'डिस्कोर्स ऑन कॉमेट्स'मध्ये गॅलीलियोच्या शिष्यांपैकी एक नावाने प्रकाशित केलेले, फ्लोरेंटाइन वकीलाने आक्षेप घेतला. गॅलीलियो आणि ग्युडुची यांनी धूमकेतुच्या स्वरूपावर स्वत: चा कोणताही निश्चित सिद्धांत मांडला नाही  जरी त्यांनी काही तात्त्विक अनुमान मांडले होते तर ते आता चुकीचे मानले गेले आहेत. गॅलीलियो आणि ग्विडुचीच्या भाषणात गिटिलो आणि ग्युडुचीच्या व्याख्यानेने अनुचितरित्या क्रिस्टोफर शिनीरचा अपमान केला आहे. आणि कॉलेजिओ रोमनोच्या प्राध्यापकांविषयी टीका केली आहे. जेसुइट्स नाखुष झाले आणि ग्रॅस्सीने लवकरच आपल्या स्वत: च्या, द ऍस्ट्रॉनॉमिकल अँड फिलॉसॉफिकल बॅलेंस ने एका पॉलेमिकल ट्रॅक्टद्वारे उत्तर दिले. साला किती ते वाद ना."

"एवढ्यावरच हे वाद संपत नाही. म्हणतात ना संकटं आली अशी हात धरुन येतात. त्यानंतरही एक वाद झालाच. सूर्योदयाबद्दल मतभेद आणि गॅलीलियोच्या लिखाणांनी वैज्ञानिक आणि धार्मिक आपत्ती एकत्र केल्या. कोपरनिकस आणि अरिस्टार्कस यांनी योग्यरित्या असे विधान केले होते की लंबमंडळ नगण्य आहे कारण तारे दूर आहेत. तथापि, टायकोने असा अंदाज दिला होता की, तारे मोजता येण्याजोग्या आकाराच्या आकाराचे असतात, जर ते तारे दूर असतील आणि त्यांचा स्पष्ट आकार त्यांच्या भौतिक आकारामुळे असेल तर ते सूर्यपेक्षा खूप मोठे असतील. (खरं तर, आधुनिक टेलिस्कोपशिवाय दूरच्या ताऱ्यांचा भौतिक आकार पाहणे शक्य नाही). टायकोच्या व्यवस्थेत तारे शनिपेक्षा किंचित दूर होते आणि सूर्य आणि तारे आकारात तुलनात्मक होते. पृथ्वी सुर्याभोवती फिरते आणि तसेच इतर अनेक ग्रहही. परंतु बायबल काही वेगळंच सांगतं, "परमेश्वराने पृथ्वीला बनवुन ठेवली आहे; ती कधीही हलविली जाऊ शकत नाही. सूर्य उगवतो आणि मावळतो.तोच रोज जागा बदलतो आणि त्याच्या जागी परत येतो"

galie

गॅलीलियोने १६०९ मध्ये  खगोलशास्त्रीय निरीक्षणांचा आधार घेत सूर्योदयाचा बचाव केला. डिसेंबर १६१३ मध्ये फ्लोरेंसच्या ग्रँड ड्यूशेस क्रिस्टीना यांनी गॅलीलियोच्या मित्रांना आणि अनुयायांपैकी एक, बेनेडेटेटो कॅस्टेलिला पृथ्वीच्या हालचालीबद्दल बोलायला सुरुवात केली आणि धार्मिक संकटाला आमंत्रण दिलं. या घटनेच्या उत्तरार्धात गॅलीलियो यांनी कास्टेलि यांना लिहिलेले एक पत्र लिहिले ज्यात त्याने असा युक्तिवाद केला की, सूर्योदय म्हणजे वास्तविक बायबलच्या ग्रंथांच्या विरोधात नाही आणि बायबल हे विश्वासावर नव्हे तर विश्वास आणि नैतिकतेवर अधिकार आहे. याचाच अर्थ आम्ही बायबलच्या विरोधी नाही परंतु काही गोष्टी पुराव्यांनी सिद्ध होत आहेत."

"१६१५पर्यंत, गॅलिलियोने सूर्योदयावर लिहिलेल्या लेखांची तपासणी करून फादर निकोलो लॉरीनी यांच्यासमोर सादर करण्यात आले होते. परंतु फादर ऐकलेच नाही. त्यांचं म्हणणं होतं गॅलीलियो आणि त्याचे मित्र बायबलचे पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करीत आहैत आणि , जे ट्रेंट कौन्सिलचे उल्लंघन असल्याचे मानले जाऊ शकते.  यावर उत्तर देण्यासाठी तो रोमला गेला. बरेच चढउतार येऊनही गॕली जिथं होता तिथंच राहिला. त्याला चौकशीची शिक्षा देण्यात आली. कारण तो धर्माच्या, पोपच्या विरोधात बोलत होता.चौकशीच्या प्रसंगावर त्याला औपचारिक तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. दुसऱ्याच दिवशी त्याला अटक झाली.त्याच्या लिखाणावर, प्रकाशनावर बंदी घातली. मुस्टकदाबी तेव्हापासुनच सुरु झाली ना. पर आँधी रुकती नहीं. तो जेलमध्येही भिंतीवर लिहीतच होता. एका चित्रकाराने ते जगासमोर आणले आणि  गालिलीओला त्याच्या मृत्यूनंतर श्रेय दिले गेले."

"गॕलीचा मित्र असक्कन पिकोकोमिनी (सिएनाचे मुख्य बिशप) यांच्या मैत्रीमुळं गॕलीला १६३४ मध्ये आर्केट्रिनेर फ्लॉरेन्स येथे त्याच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, जिथे तो बराच काळ नजरकैदेत होता. गॅली जेव्हा नजरकैदेत होता तेव्हा त्याने  'टू न्यू सायंसेस' लिहिलं. अल्बूनं या पुस्तकाचं भरपुर कौतूक केलं आहे. यामुळंच माझा  गॅली 'आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक' झाला. पण सुख काय जास्त काळ राहतं का?? १६३८ मध्ये तो पूर्णपणे आंधळा झाला. म्हणून त्याला वैद्यकीय सल्ल्यासाठी फ्लोरेंसला जाण्याची परवानगी देण्यात आली. तिथंच तो कायमचा डोळे मिटता झाला."

"खरं सांगायचं तर हा असा टाकीचा घाव सोसुनही त्याला देवपण नाही आलं. अगदी परवा परवा एका पोपने गॕलीची त्याला दिलेल्या वागणुकीबद्दल माफी मागितली. याला काय अर्थै राव! अमानुष छळ सोसुनही जगाच्या कल्याणासाठीचे महत्त्वपुर्ण शोध देऊन गेला माझा गॕली बाॉय...!"