India

धान्यापासून इथेनॉलनिर्मितीचा मार्ग मोकळा

नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्यूल्स २०१८

Credit : Government Fleet

मका, ज्वारी, बाजरी ही अन्नधान्ये आणि फळे-भाजीपाला यांच्या उपलब्धतेनूसार त्यांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी केला जाणार आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या धोरणाविषयी केंद्र सरकारने सोमवारी घेतलेल्या निर्णयानूसार २०१८-१९ या वर्षात इथेनॉल निर्मितीसाठी धान्य आणि भाजीपाला, फळे वापरता येणार आहेत. आत्तापर्यॆत भारतात साखरकारखान्यातून बाहेर पडलेल्या फक्त मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्याला परवानगी होती.  

‘नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्यूल्स २०१८’ या नव्या धोरणानूसार जास्त उत्पादन झालेल्या अन्नधान्य पीकांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याकरता नॅशनल बायोफ्यूल कॉर्डिनेशन कमिटीला अधिकार देण्यात आला आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार कृषि विभाग, सहकार  आणि शेतकरी कल्याण विभागाने संयुक्तपणे या ठरावाला मान्यता दिली असून येत्या आर्थिक वर्षात अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल निर्मतीत शिल्लक राहिलेला भाजीपाला आणि फळदेखील वापरता येण्याला मान्यता मिळाली आहे.

२०२२ पर्यंत १० टक्के उदिष्टः

इथेनॉल निर्मितीच्या या कार्यक्रमांतर्गत २०२२ सालापर्यंत तेलकंपन्यांना (ऑईल मार्केटिंक कंपनीज) यांना  पेट्रोलमध्ये किमान दहा टक्के इथेनॉल वापर करण्याचे उदिष्ट दिले आहे. आत्तापर्यंत इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुरवलेली मळी (सी मोलॅसिस) कमी पडल्याने इथेनॉल निर्मितीवर त्याचा परिणाम होत होता. इंडियन सुगर मिल असोसिएशनच्या आकडेवारीनूसार देशभरात  सरासरी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचा दर अवघा ४.०२ टक्के आहे.

बी मोलॅसिस आणि सी मोलॅसिस काय आहे?

ऊसाच्या मळीपासून जास्त प्रमाणात इथेनॉल निर्मती होऊल लागल्यास त्याचा फायदा संकटात आलेल्या साखर कारखाने आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो. सध्या इथेनॉल निर्मितीत दोन प्रकारच्या मळीचा वापर होतो. एक सी मोलॅसिस ज्यात ऊसाच्या रसाचे प्रमाण कमी असते. तसा हा साखरउत्पादनातला टाकाऊ म्हणता येईल असा उपउत्पादन (by-product) आहे. तर दुसरा प्रकार बी हेवी मोलॅसिस. ज्यात ऊसाच्या रसाचा समावेश जास्त होतो. त्यातून अधिक इथेनॉल निर्मिती करता येते. बी हेवी मोलॅसिस पासून तयार केलेल्या एक लिटर इथेनॉलची किंमत, ५२. ४३ रुपये आहे.  तर ऊसाच्या रसाचे निव्वळ मूल्य ५९. १३ रुपये आहे.

ऊसाच्या मळीपासून जैव इथेनॉलच्या उत्पादनाची सद्यस्थितीः

महाराष्ट्रासह इतर राज्यातील साखर कारखाने सी हेवी मोलॅसिस या प्रकारच्या मळीपासून इथेनॉल बणवतात. त्याचे प्रमाण नगण्य आहे. हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या यावर्षी सरकारने कारखान्यांना द्यायच्या अनुदानाची घोषणा उशीरा केल्याने आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी कारखान्यांना वेळ मिळू शकला नाही. शिवाय सी मोलॅसिस पासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया एकंच असली तरी त्यासाठी नवी यंत्रणा उभारावी लागू शकते.

इथेनॉल निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी सरकारने सहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बी मोलॅसिसपासून बणवलेल्या इथेनॉलला  मिळणारा दर ही आश्वासक आहे. यामुले ऊसापासून फक्त साखरंच तयार होते या समजुतीला फाटा बसून इथेनॉल निर्मितीत वाढ अपेक्षित आहे.

यातला कळीचा मुद्दा असा की इथेनॉल निर्मितीसाठी उभारायच्या नवीन यंत्रना उभारण्याची प्रक्रिया फार वेळखाऊ असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. दुसरा मुद्दा ही की उसाच्या मळीपासून जी दारू तयार होते तो राज्य सरकारसाठी महत्वाचा स्रोत आहे. वाढत्या इथेनॉल निर्मितीमुळे मळीची वाढलेली मागणी मद्यनिर्मितीच्या उद्योगाला धक्का लावणार नाही याची काळजीही घ्यावी लागू शकते.

ऊसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्याच्या उद्योगाची ही स्थिती असतानाच अतिरिक्त धान्यापासून इथेनॉल निर्मितीला मान्यता देणारा निर्णय आला आहे. दर हंगामात चांगलं अन्नधान्य उत्पादन झालं तरी मागणी नसल्याने शेतकऱ्यांना सहन करावा लागणारा तोटा कमी होऊन हे उत्पादनइथेनॉल निर्मितीसाठी वापरता येईल. हे करत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.  

संदर्भ: १. द हिंदू  २. हिंदू बिझनेसलाईन