Sonal Raut

Disabled students

भारतातील उच्च शिक्षण आणि विकलांग व्यक्तींचे स्थान

Opinion
भारतात अपंग असलेल्या २१ दशलक्ष लोकसंख्येपैकी केवळ ०.१२ दशलक्ष पदवीधर आहेत, म्हणजे एकूण संख्येच्या १ टक्का देखील नाहीत. एनसीपीईडीपी, या अपंग व्यक्तीच्या मूलभूत हक्कावरती काम करण्याच्या अग्रगण्य एनजीओने २०१५ साली उच्च शिक्षणातील अपंग विद्यार्थ्यंची संख्या यावर सर्वेक्षण केले . त्यामध्ये उच्च शिक्षनातील २५० संस्थेपैकी केवळ १५० संस्थांनी प्रतिसाद दिला. या आयआयटी आणि आयआयएमसह उच्च शिक्षण संस्थांच्या पॅन-इंडिया सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की १५,२१,४३८ विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४४९ अपंग विद्यार्थी आहेत, जे एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त ०.५६ टक्के आहेत.