Chittatosh Khandekar

Jae C. Hong / Associated Press

हाँगकाँगचा संघर्ष ‘लोकशाही’साठी?

Asia
लोकशाही म्हणजे फक्त मतदान आणि लोकांना शासनाचा अधिकार नव्हे. जिथे अल्पसंख्यांक सुरक्षित असतात, जिथे सर्वांना समान संधी मिळते, सर्वांना मानव म्हणून समान अधिकार मिळतात, सर्वांना आपली बाजू मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते ती खरी लोकशाही. यासाठीचा संघर्ष म्हणजे लोकशाहीचा संघर्ष अन्यथा सगळे संघर्ष हे सत्तासंघर्षच असतात.
Asia Times

दक्षिण चिनी समुद्रातील चिनी गलबतं आणि खलबतं

Quick Reads
दक्षिण चिनी समुद्राचा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या समुद्राच्या दक्षिणेला ऑस्ट्रेलिया आहे तर उत्तरेला रशिया. पश्चिमेला भारत, आफ्रिका आणि युरोपला जोडणारा अजस्त्र हिंदी महासागर आहे तर पूर्वेला अमेरिकेला जोडणारा प्रशांत महासागर! जगात सर्वात जास्त मासेमारी होते अशा काही भौगोलिक प्रदेशांपैकी एक भाग हा दक्षिण चिनी समुद्राचा तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या कितीतरी पट किमतीचा व्यापार या समुद्रातून होतो. आजही जगातला बहुतांश व्यापार हा या समुद्रमार्गे होतो.
Navesh Chitrakar/Reuters

नेपाळ-भारत संबंधांच्या बिघडण्याला नक्की काय कारणीभूत ठरलं?

Asia
नेपाळमध्ये कम्युनिस्टांचे सरकार आहे. त्यामुळे नेपाळच्या कथित 'अरेरावी'ला चीन खतपाणी घालत असल्याची ओरड ऐकू येते आहे. पण त्याला काही अर्थ नाही. कारण चीनने अगोदरच भारत-नेपाळमधील समस्या दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चेतून सोडवाव्या आम्ही त्यात ढवळाढवळ करणार नाही असं म्हणत हात वर केले आहेत. मग नेपाळ सारखा मित्र भारताचा शत्रू असल्यासारखी भाषा का करतो आहे?